जे न देखे रवी...

संभाव्याच्या अब्ज छटांतून

Primary tabs

संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?

भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते

कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते

गॉडजिला

आवडली.

इरसाल

छान आहे कविता.

सतीश "गाज" हा शब्द मराठी नाही त्यांनी गाजी चा काना वेलांटी खोडुन स्वतःच्या मनासारखा एक शब्द तयार केलाय.

आवडली

"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते

क्या बात है, सुंदर कल्पना,

पैजारबुवा,