Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? -३

क
कलंत्री
Tue, 12/02/2008 - 19:02
🗣 58 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
20582 वाचन

💬 प्रतिसाद (58)
क
कलंत्री Wed, 12/03/2008 - 20:08 नवीन
आज २०० मेले तेंव्हा कोणीच अशा हल्ल्याची कल्पना कोणीच केली नव्हती. यापूढे एकाही निरपराधाचे रक्त सांडावयाला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
प
पक्या Wed, 12/03/2008 - 19:43 नवीन
>>गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? --नाही भगवत गीता सांगताना साक्षात भगवान श्रीकृष्णाने 'माझ्या आप्तांवरच वार कसे करू' असे म्हणुन हातपाय गाळणार्‍या अर्जुनाला काय सांगितले आहे - समोर दिसणारे तुझे आप्त आणि मित्र हे आता शत्रू म्हणुन तुझ्यासमोर उभे ठाकले आहेत त्यामुळे त्यांच्याशी युध्द करून त्यांचा बिमोड करणे हे तुझे कर्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 12/03/2008 - 20:15 नवीन
गीतेचा माझ्या माहितीतील अन्वनार्थ. अर्जुन उवाच : मी माझ्या नातलगांना मारण्यापेक्षा भिक मागणे पसंद करेन. कृष्ण उवाच : मी मारतो हा तुझा अहंकार आहे. बघ, हे सर्व काळाच्या उदरात गडप होत आहे. तु फक्त निमित्त्यमात्र आहे. त्यामूळे क्षत्रीयाला उचित असलेले कर्तव्य तू पार पाड. जिंकला तर पृथ्वीचे राज्य आणि मारला गेलास तर स्वर्गाची प्राप्ती. ( अध्याय १ ते ९ वा विश्वर्रुप दर्शन चुभुदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
प
प्रभाकर पेठकर Wed, 12/03/2008 - 19:48 नवीन
बर्‍याच दिवसांनी मिपावर आलो आणि श्री. कलंत्री ह्यांचे तिन्ही भागातील लेखन (आणि त्यावरील प्रतिसाद) वाचून काढले. 'हल्ला करणार्‍या अतिरेक्यांच्या शस्त्रांना शस्त्रांनीच उत्तर द्यावे आणि नवीन अतिरेकी निर्माण होऊ नयेत म्हणून गांधीवादाचा आधार घ्यावा' असे कांहीसे लेखकाचे म्हणणे असावे, असे दिसते. गांधी आणि गांधीवादावर ह्या पुर्वीही मिपावर बरीऽऽऽऽऽच चर्चा झालेली आहे. त्यामुळे त्या वादात मी नवीन काही भर टाकू शकणार नाही. पण गांधीजींच्या तत्त्वांवर चालून शत्रूचे हृदय परिवर्तन होईल हा आशावाद भाबडा आहे. हे म्हणजे, कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर होमिओपॅथीच्या गोळ्यांची नुसती बाटली 'दाखवून' रोग काबूत आणण्याचा प्रयत्न केल्यासारखे होईल. मुळात, भारताला स्वातंत्र्य मिळाले ते गांधीजींच्या आंदोलनांमुळे इंग्रजांचे हृदय परिवर्तन होऊन मिळाले, हा काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार आहे. ह्या प्रचाराने, ज्या ज्या संघटनांनी जहाल मार्ग अनुसरले आणि इंग्रजांना त्राही भगवान करून सोडले त्या सर्व संघटनांचा, आंदोलकांचा, हुतात्म्यांचा आणि ज्यानी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या कुटुंबाची राखरांगोळी करून देशकार्याला वाहून घेतले त्या सर्वांच्या त्यागाचा अपमान आणि त्यांच्यावर घोर अन्याय आहे. स्वातंत्र्य प्राप्तीतील श्रेयाचा त्यांचा वाटा त्यांना द्यायलाच हवा. गांधीजी कितीही महान असले तरीही काँग्रेस व्यतिरिक्त इतर आंदोलकांना श्रेय नाकारण्याचा त्यांना हक्क पोहोचत नाही. आणि काँग्रेस इतकेच इतर आंदोलकांनाही श्रेय द्यायचे झाले तर निव्वळ गांधीवादाने, अहिंसेच्या मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येणार नाही. म्हणजेच गांधीवादानेच इंग्रजांचे हृदयपरिवर्तन झाले हे सिद्ध होत नाही. मग आता, गांधीवादात हृदयपरिवर्तनाची ताकद, किमया नसेल तर ते अतिरेकी निर्मितीच्या प्रक्रियेविरुद्धही कुचकामीच म्हणावे लागेल. मुळात दिडशे वर्ष राज्य करणार्‍या इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची उपरती नक्की कशामुळे झाली ह्यावर उहापोह होऊन त्या चर्चेच्या निष्कर्षांवर गाधीवादाची ताकद (असेलच काही तर....)तपासून पाहावी. गांधीजींना काँग्रेसने आणि इंग्रजांनीही स्वार्थासाठी 'मोठे' केले असावे असे मला वाटते. ह्याचा अर्थ गांधीजींना कमी लेखणे असा नाही. त्यांची बलस्थाने म्हणजे त्यांची पक्की राजकारणी विचारसरणी, हेकटपणा (चांगल्या ठिकाणी वापरला तेवढाच), सभेच्या हृदयाला हात घालण्याची हातोटी. (म्हणून जनाधार) हे सर्व गुण त्यांच्यापाशी होते. काँग्रेस अंतर्गत गांधीजींच्या शब्दाला असणारा मान हेरून इंग्रजांनी त्याचा वापर देश विभाजनात केला आणि भारताच्या उरावर पाकिस्तान बसविला हा त्यांचा (इंग्रजांचा) स्वार्थ. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जी सत्तेची हाव काँग्रसला सुटली त्यात त्यांनी त्यांच्याच ह्या महान आत्म्याला किनार्‍याला उभं केलं. हा काँग्रेसचा स्वार्थ होता. मुळात आपला वाद हा, गांधीवादाचा अतिरेक्यांविरुद्ध वापर करून त्यांचे हृदय परिवर्तन शक्य आहे की नाही, हा आहे. आजकालच्या बदललेल्या निती मुल्यांच्या पार्श्वभूमीवर गल्ली गुंडाचेही हृदयपरिवर्तन होणार नाही तिथे अतिरेक्यांचा विचारच करायला नको. आणि खरोखर गांधीवादाने असे होत असेल तर सगळे तुरूंग बंद करून आश्रम काढावे लागतील. ज्या ज्या गुन्हेगारांना न्यायालय सजा देईल त्यांना त्या आश्रमात 'हृदय परिवर्तना'साठी ठेवावे आणि झाले हृदय परिवर्तन की सोडून द्यावे. 'मुन्नाभाई' चित्रपटानंतर गांधीवादाचे खूळ पुन्हा वर आले होते. रहदारीचे नियम तोडणार्‍यांना कांही सेवाभावी संस्था गुलाबाचे फुल देत होत्या. काही सरकार विरोधकांनी सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गुलाब पुष्पाचा उपाय करून पेपरात आपले फोटो छापून आणले. काय झाले पुढे? काही काळा करीता गुलाबाच्या फुलांची विक्री छान झाली ह्या पलीकडे काही नाही. 'फुलही रुतावे असा दैवयोग' हल्लीच्या काळी नाही.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/03/2008 - 19:53 नवीन
'फुलही रुतावे असा दैवयोग' हल्लीच्या काळी नाही. सुंदर..! प्रभाकरपंत, एका वाक्यात अगदी नेमके बोललात...! आपला, मोहनदास अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ल
लिखाळ Fri, 12/05/2008 - 18:11 नवीन
प्रतिसाद आवडला.. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अनंत छंदी गुरुवार, 12/04/2008 - 05:42 नवीन
कलंत्री साहेबांचे हे गांधीवादी पुराण वाचून आता माझ्या मनात अतिरेकी विचार येऊ लागले आहेत. एकंदरीत पाहाता कलंत्रींना गांधीवादाचा बुरखा घेऊन पाकिस्तानी अतिरेक्यांचे समर्थन करण्याची हौस आलेली दिसते. तसे असेल तर हे लिखाण भारतात राहून पाकिस्तानी अतिरेक्यांची भलामण करणारे, अर्थात भारतातील कोट्यवधी लोकांच्या देशप्रेमाच्या भावनेशी खेळणारे म्हणजेच राष्ट्रद्रोही ठरते म्हणूनच असल्या अवसानघातकी लिखाणावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, व त्यांचे गांधीवादी विचारांचा गोंधळ घालणारे सर्व धागे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी माझी विनंती आहे. कलंत्रीसाहेब आणि त्यांचा गांधीवाद त्यांनाच लखलाभ असो. शेवटी जाताजाता ... "जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कुणीतरी किर्तने सारीकडे ..सारीकडे ज्ञानेश्वरी काळ्जी आमच्या हिताची एवढी घेवू नका जावू सुखे नरकात तेथे तरी येवू नका." (या ओळी भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीविषयी सुरू असलेल्या धाग्यातून साभार!) (त्या येथे चपखल बसतात असे वाटते म्हणून देण्याचा मोह आवरला नाही.)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 12/05/2008 - 17:40 नवीन
गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? नाही. अरे, सर्व विचार आपणच करायचा का? असे लेख पाकड्यांकडुन किती आले ते दाखवा मग गप्पा मारा अश्या. ("कुत्र्याचे" शेपुट "ऑप्रेशननेच" "सरळ" करता येते. ) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा