Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

T
Trump
Fri, 10/08/2021 - 17:32
💬 16 प्रतिसाद
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत. तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा. १. बिग बँग थियरी (BBT) सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली. शेवटचे काही भाग तर बघणे बघितलेच नाहीत. https://en.wikipedia.org/wiki/The_Big_Bang_Theory https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%97_%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80 २. सिलिकॉन व्हँली अतिशय उत्तम. कितीही वेळा बघितले तरी पुन्हा बघावसे वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Silicon_Valley_(TV_series) ३. तरुण शेल्डन बिग बँग थियरी मधील प्रमुख पात्र शेल्डनचे बालपण ह्यात दाखवले आहे. गुणवत्ता ठिक आहे. https://en.wikipedia.org/wiki/Young_Sheldon तुम्हाला जर काही मालिका असतील तुम्हीही लिहा.

प्रतिक्रिया द्या
8358 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ग
गॉडजिला Fri, 10/08/2021 - 18:31 नवीन
मस्त... शेवट जरा लांबला पणं परफेक्ट शेवट केला. ९०% स्टार्टप काय अनुभवातून जातात हे समजुन घ्यायचे असेल ते ही मिश्किलपने तर सिलिकॉन व्हॅली चांगली सुरुवात आहे...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 10/08/2021 - 19:58 नवीन
Nerd म्हणजे स्वयंकेंद्री नाही. Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो. अवांतर - Revenge of the nerds या धमाल विनोदी चित्रपटाचे दोन्ही भाग पहा.
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 10/08/2021 - 20:13 नवीन
Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो.
मराठी प्रतिशब्द द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुरिया Fri, 10/08/2021 - 20:18 नवीन
चम्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
श
श्रीगुरुजी Fri, 10/08/2021 - 20:30 नवीन
बावळट, शेळपट, बुळचट हे शब्द जवळपास जाऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
स
सुक्या Fri, 10/08/2021 - 20:57 नवीन
अभ्यासु किडा. Nerd म्हणजे एखादा माणुस / मुलगा जो अभ्यासात खुप हुशार आहे, मेहेनती आहे परंतु त्याचबरोबर इतरांशी मिळुन मिसळुन वागता येत नाही असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
क
कॉमी Sat, 10/09/2021 - 03:58 नवीन
NERD शब्द वरीलप्रमाणे वापरतात, पण हे केवळ अभ्यास किंवा पुस्तकांशीच संबंधित असते असे नाही. गेम, चित्रपट, मालिकांच्या एकनेक पात्र आणि घटनांबद्दल खडानखडा माहिती असणारी पोरं पोरी सुद्धा नर्डच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
ग
गॉडजिला Sat, 10/09/2021 - 10:54 नवीन
लौकीक द्रुश्ट्या कमालिचे अल्पसंख्यांक पण तरीही एखाद्या विषयात अतीविषेश गती, प्राविण्य/प्रभुत्व व रमायची वृत्ती असणार्‍या व्यक्तींना वापरला जातो... it is justifiable if you say saints are spiritual nerds.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
ग
गॉडजिला Sat, 10/09/2021 - 11:12 नवीन
it is justifiable if you say saints are spiritual nerds.
हे विधान मी मागे घेतो कारण गुगलबाबा म्हणतात नर्ड शब्द दोन प्रकारे वापरला जातो noun १) a foolish or contemptible person who lacks social skills or is boringly studious. verb २) engage in or discuss a technical field obsessively or with great attention to detail. यामुळे माझ्या मते संताना स्पिरीचुअल नर्ड शब्द चपखलपणे लागु होउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
स
सुरिया Sat, 10/09/2021 - 11:39 नवीन
गटणे सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
आ
आनन्दा Sat, 10/09/2021 - 08:12 नवीन
त्यातल्या त्यात घासू हाच शब्द बरोबर वाटतो.. पण हा शब्द प्रमाणभाषेत आहे का कल्पना नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
क
कॉमी Sat, 10/09/2021 - 04:02 नवीन
स्ट्रेंजर थिंग्स पाहायला नक्कीच सुखद आहे (अगदी ग्रेट वैगेरे नसले तरी.) लहान नर्ड्सच्या मैत्रीचे चित्रण मात्र छान घेतले आहे त्यात.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/09/2021 - 09:01 नवीन
हे आपण तेंव्हा अनुभवतो जेंव्हा एक अथवा एका पेक्षा जास्त व्यक्ती त्यांच्या आवडीच्या विषयावर चर्चा/विचार करत असताना सुचणार्‍या /माहित पडणार्‍या नवनवीन मुद्देसुद कल्पना जबरा मनोरंजन देतात. (Nerdgasm - a thrill of excitement felt in response to something relating to a subject in which a person has an obsessive interest. )
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 10/09/2021 - 09:07 नवीन
सुंदर ट्रायल, कोर्टरुम ड्रामा आहे. सत्य घटनेवर आधारीत आहे. गुगलने गुगल अर्थ प्रोडक्ट कसे ढापले व त्यावरील कोर्ट केस हे कथानक जरी असले तर सीलीकॉन वॅली सिलीकॉन वॅली का आहे आणी इतर देशात ती का तयार होउ शकत नाही यावर अतिशय चांगला प्रकाश इथे टाकला आहे. थोडी तांत्रीक माहिती असेल तर कथानक जास्त रंजक बनते. कोर्टरुम ड्रामा देखील सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 01/27/2022 - 18:24 नवीन
कुठे बघायला मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
T
Trump Mon, 12/20/2021 - 20:53 नवीन
आय टी क्राउड #. अतिशय उत्तम मालिका. डेली मोशनवर बरेच भाग आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा