दाऊद इब्राहीम कासकर ला बहुतेक गुन्हेगारी जगतात करीअर करायचे होते.म्हणून तो असा वागला.कितीही झाले तरी तो एका पोलीस शिपायाचा मुलगा तसेच तात्यांच्या कोकणातील सुपुत्र होता.त्याने कोकणचो नाव मातीत मिळवल्यान.
यातील एक "सुपुत्र" हा मी मुद्राराक्षसाचा विनोद म्हणत सोडून देतो. पण बाकी माझे तेच म्हणणे आहे. दाउदने बाँब उडवले ते बाबरीमशिदी मुळे नाही. एका अर्थी आपण तेच म्हणत आहात असे समजायचे का?
मला तर वाटते आहे बाबरी तोडल्याचा संबंध बॉम्बस्फोटाशी लागू नये या साठी आपण प्रयत्नशील दिसत आहात. दाऊद ने स्फोट केले ते बाबरीमुळे नाही हे आपण एकवेळ मान्य केल तरी त्याचा पुरेपुर उपयोग पाकिस्तानने करून घेतला हे तर सत्य आहे.
दाऊदने त्यांच्या सांगण्यांप्रमाणे टायगर मेमनला हाताशी धरून दंगलीत झळ पोहोचलेल्यांना किंवा पेटून उठलेल्या तरूणांना संघटीत करून स्फोट केलेच ना. ते तरुण असे काम करण्यासाठी का तयार झाले कारण दंगलीत सर्वात जास्त झळ मुस्लीमांनाच बसली होती. बाबरी मशीद तोडल्याची आणी दंगलीची प्रतिक्रीया म्हणजेच १९९३ चे मुंबई बाँम्बस्फोट असे मान्य करायला जागा आहे(बदल्याची तीव्र भावना) आणि दंगलीची झळ पोहोचलेल्यांनी दाऊद कडून कशावरून मदत मागीतली नसेल.
अवांतर-दाऊद टोळी मुंबईत जेव्हा जोमात होती तेव्हा टोळीत दोन्ही धर्माचे गुंड होते .
मला तर वाटते आहे बाबरी तोडल्याचा संबंध बॉम्बस्फोटाशी लागू नये या साठी आपण प्रयत्नशील दिसत आहात
त्यांच्या प्रयत्नांच्या आड येण्याचा प्रयत्न मी सोडून दिला आहे!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
त्यांच्या प्रयत्नांच्या आड येण्याचा प्रयत्न मी सोडून दिला आहे!!
प्रयत्न वाटून आड येयचे नसेल तर नका येऊ पण वस्तुस्थिती अलीप्तपणे लक्षात घ्याल अशी आशा करतो.
मला तर वाटते आहे बाबरी तोडल्याचा संबंध बॉम्बस्फोटाशी लागू नये या साठी आपण प्रयत्नशील दिसत आहात.
हा प्रयत्न नाही आहे पण जेंव्हा अर्धसत्य हे पूर्णसत्य म्हणून सांगितले जाते तेंव्हा त्यामागचे खरे कारण काय असते ते सांगण्याचा प्रयत्न आहे. मी अजूनही तेच म्हणत आहे जे सुरवातीला म्हणले, बाबरी मशिद प्रकरणामुळे दाउद अथवा इतर कुठल्याही मुस्लीम अतिरेकी संघटनांनी त्या विरोधात मुंबईत बाँब उडवण्याचे कृत्य केले असे म्हणलेले नाही. कारण तो उद्देश नव्हता.
सुनीलने म्हणल्याप्रमाणे, कदाचीत काही आरोपींनी तसे कोर्टात म्हणले असेल पण बचावासाठी काही बोलले जाऊ शकते. त्यातूनही एखादा प्रामाणिकपणे म्हणला असेल आणि म्हणून आपण म्हणता तसे परत दंगलीची झळ पोहोचलेल्यांनी दाउद कडे मदत मागितली असेल. बाबरी मशिदीपेक्षा नंतरच्या रमाबाई चाळीत अनेकांना जिवंत जाळल्यावर जेंव्हा ४८ तास, सरकार कडून काही केले गेले नाही, (किंबहूना निर्णय घेण्यावरूनपोलीसांचे हात बांधलेलेच ठेवले होते) तेंव्हा झालेल्या दंगलीत जो काही हिंसाचार झाला आणि त्यात जेंव्हा दोन्ही धर्मातील निरपराध व्यक्तींना त्रास झाला, त्याचा फायदा घेऊन काही मुस्लीम तरूणांना जर दाऊदने चिथावले असेल हे मान्य आहे. पण सर्वप्रथम ते दंगलीमुळे झाले, ज्याचे कारण राधाबाई चाळ आणि नंतरचा पहील्या ४८ तासातील एकतर्फी हिंसाचार होता राधाबाई चाळीचे कारण हे आपल्याला माहीत असेलच पण नुसते धार्मिक नव्हते (कदाचीत नव्हतेच) तर बिल्डर हे होते. (तिथे अजून चाळ आहे का हे माहीत आहे का? मला माहीत नाही, हा केवळ प्रश्न आहे...) थोडक्यात बाबरी हे कारण नव्हतेच. परत याचा अर्थ असा घेऊ नये की हे दंगलीचे समर्थन आहे. मी कुठल्याही नागरी हिंसेच्या विरोधातच आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही, तरी स्पष्ट करतो.
अवांतर-दाऊद टोळी मुंबईत जेव्हा जोमात होती तेव्हा टोळीत दोन्ही धर्माचे गुंड होते .
अगदी १००% मान्य आहे आणि आपण मी जे सुरवातीपासून म्हणत आहे त्यालाच पुष्टी देत आहात. म्हणूनच जेंव्हा "कडवे हिंदू" वगैरे अपशब्द वापरत असे लिहीले जाते, "काही लाख लोक जमून अयोध्येला जातात, बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत." तेंव्हा त्यात पूर्णसत्य सोडा अर्धसत्य पण नसते ही वस्तिस्थिती दाखवण्याचा उद्देश या लेखात आहे.
बाबरी हे कारण नव्हते मग दंगली कशामुळे भडकल्या केवळ जोगेश्वरीतील ती चाळ जाळल्याने. तर नाही.कारण दंगल होणारच होती त्याची तयारी आधीपासूनच झालेली होती.जर तुम्ही म्हणत असाल १९९३च्या स्फोटानंतर बाबरी मशिद प्रकरणामुळे दाउद अथवा इतर कुठल्याही मुस्लीम अतिरेकी संघटनांनी त्या विरोधात मुंबईत बाँब उडवण्याचे कृत्य केले असे म्हणलेले नाही. कारण तो उद्देश नव्हता. मग उद्देश काय होता.
बॉम्बस्फोट ही दंगलीची तसेच बाबरी पाडल्याची प्रतिक्रिया होती .स्फोटात सहभागी असणार्यांनी योग्य ते प्रशिक्षण घेतले होते.इथे अतिरेकी संघटनांचा उल्लेख होत नाही कारण यातील बहुसंख्य गुन्हेगार दाऊद धरून स्थानिक(कोकण रायगड,रत्नागिरी जिल्हा)होते. त्यांनी केवळ संघटीत होऊन(अर्थात त्यांच्यात असुरक्षीततेची भावना निर्माण झालीच असणार)सुडाने पेटून उठून हे कृत्य केले.
आहे. क्षणभर असे मानून चालू की बाबरीमुळे मुंबईची दंगल उसळली. मग पुढे उसळलेल्या अनेक दंगलींचे काय?
(एक निरीक्षण: अलिकडे भारतात उसळलेल्या अनेक दंगलींचे खापर, तथाकथित सर्वधर्मसमभाव- पुरस्कर्त्यांकडून गोध्रावर फोडले जायचे. पण आता तो स्त्रोत परत बाबरीपर्यंत जाऊ लागला आहे. गेल्या वर्षीच्या निवडणूकीत मोदींचा झालेला सणसणीत विजय तर ह्या बदलाला कारणीभूत नव्हे?)
विकी, भारताबाहेरही अनेक ठिकाणी मुसलमानांतील काही जण दहशतवादी कृत्ये करत असतात, त्यांबद्दल मी येथे लिहीले होते, ते वाचा.
विकास तुम्ही पुन्हा पुन्हा तेच मुद्दे शद्बांवर शब्द रचुन मांडत आहात.
बाबरी मशीद उध्वस्त करणे तसेच कडव्या हिंदूंच्या इतर कारवाया ह्यांचा सध्याच्या भारतातील दहशतवादात काहीच इन्फ्लुएन्स नाही का? ह्याचे कृपया स्पष्ट उत्तर द्या.
तुमच्या ह्या लेखाचा उद्देश 'दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत भारतातील अंतर्गत घडामोडींचा काहीही संबध नाही' असे काहीसे मांडण्याचा आहे असे वाटते. "दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारतात घुसला पण इथल्या कडव्या हिंदूंच्या करामतींमूळे तो घट्ट मूळे रोवत आहे." ह्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ते सांगा.
विकास तुम्ही पुन्हा पुन्हा तेच मुद्दे शद्बांवर शब्द रचुन मांडत आहात.
सत्य एकच आहे, फार तर वेगवेगळ्या शब्दात ते सांगता येईल इतकेच. :-) मुद्दा चुकीचा वाटतो का ते सांगा.
बाबरी मशीद उध्वस्त करणे तसेच कडव्या हिंदूंच्या इतर कारवाया ह्यांचा सध्याच्या भारतातील दहशतवादात काहीच इन्फ्लुएन्स नाही का? ह्याचे कृपया स्पष्ट उत्तर द्या.
बाबरी मशिद, १९९३ ची हिंदू-मुसलमान दंगल आणि अगदी गोध्रा रेल्वेकांडानंतर उसळलेली दंगल याचा परीणाम म्हणून काही व्यक्तिगत पेटून हिंदूंच्या विरुद्ध गेले असते तर आपण म्हणता ते बरोबर आहे. जर संघटना हिंदूंच्या विरुद्ध उठल्या असत्या तर आपण म्हणता ते बरोबर आहे. मात्र दिसताना काय दिसते? ज्या काही दहशतवादी घटना घडल्या त्या कुठल्याही निव्वळ हिंदू म्हणता येईल अशा ठिकाणी झाल्या नाहीत तर सार्वजनीक ठिकाणी झाल्या आणि त्यात, अगदी कालच्या दहशतवादी कारवायात पण निष्पाप मुसलमान धर्मियांनापण आपले प्राण गमवावे लागले. मला सांगा बरं असे धर्माच्या कारणावरून दुसर्या धर्माच्या विरुद्ध (चूक-बरोबर, कारणे काही असोत) जे उठले त्यांनी असे सार्वजनीक ठिकाणी खुले आम दहशतवाद करत स्वतःच्या धर्मबांधवांना पण कसे मारले? खुले-आम अशासाठी म्हणत आहे कारण जर स्वतःची ओळख लपवून करायचे असते तर नक्की स्वतःच्या धर्मातील व्यक्तींना पण मुद्दाम मारले असते.
दुसरा भाग असा, गेल्या १७-१८ वर्षात दोन दुर्दैवी अपहरणे झाली ज्यात काही अतिरेक्यांना सोडवण्यात आले. ते अतिरेकी कोण होते? एकतर पाकीस्तानी अथवा काश्मिरी मुजाहीदीन... तसे म्हणाल तर कंदहार प्रकरणाच्या वे़ळेस मुंबई स्फोटातील अटक झालेल्या मुसलमान धर्मियांना तुरूंगात राहून ६-७ वर्षे झाली होती. तरी देखील त्यांना सोडवण्याचा प्रयत्न का बरे झाला नाही? कारण साधे आहे, त्यांना मुंबई आणी मुसलमान धर्माचे काही पडलेले नव्हते, आपण म्हणत असलेल्या कडव्या हिंदूंचे काही पडले नव्हते. त्यांना त्यांच्या तस्करीचे आणि फारतर काश्मिरचे पडले होते/आहे. बाकी धिंगाणा घालत स्वतःच्या द्वेषात भारतीयांना जाळायचा प्रयत्न मग ते कोणच्या का धर्माचे असेनात. याला अपवाद एकच आहे - अक्षरधाम आणि तो का आहे हे स्पष्ट आहे.
तुमच्या ह्या लेखाचा उद्देश 'दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत भारतातील अंतर्गत घडामोडींचा काहीही संबध नाही' असे काहीसे मांडण्याचा आहे असे वाटते. "दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारतात घुसला पण इथल्या कडव्या हिंदूंच्या करामतींमूळे तो घट्ट मूळे रोवत आहे." ह्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ते सांगा.
मी आपण करीत असलेल्या विधानाशी सहमत नाही. दहापेक्षा जास्तवेळेस सांगून झाले... दहशतवादाला धर्म नसतो. दहशतवाद फोफावायला कडू-गोड-आंबट-तुरट हिंदू आणि तसेच मुसलमान जबाबदार नाहीत तर त्याला जबाबदार आहेत सरकारची कचखाउ धोरणे आणि व्होट बँक पॉलीटीक्स. धर्मांध मुस्लीम, कडवे हिंदू यांच्यामुळे फारतर सामाजीक तणाव निर्माण होऊ शकतात आणि तसे झाले देखील होते, आहेत आणि अजूनही होतील. ते इतर प्रकारच्या समाजभेदात पन होतात. उ.दा. राज ठाकरे विरुद्ध बिहारी, कधीकाळची शिवसेना विरुद्ध दाक्षिणात्य, औरंगाबाद विद्यापिठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, वगैरे वगैरे... पण हिंदू-मुसलमान तणाव रहायचे कारण माझ्या लेखी वेगळे आहे. ते आहे सुडोसेक्युलर्स ज्यांनी माध्यमांचा वापर करून दोन समाजात दरी निर्माण केली. परीणामी जशी काही मुसलमानांची प्रतिक्रीया टोकाची झाली तशीच काही हिंदूंची कालांतराने झाली. पण ती प्रतिक्रीया जरी मुसलमानांना कधी भोगावी लागली असली तरी त्याला मूळ कारण आहे सुडोसेक्युलर्स.
पुन्हा एकदा शब्दांचे बुडबुडे प्रसवित आहात तुम्ही. कडवे हिंदू आणि धर्मांध मुस्लिम हे दोन्हिही तेढ वाढवण्यास कारणीभूत आहेत असे तुम्ही मान्य करता पण तुम्हाला ते पटत नाही असा काहीसा विचित्र युक्तिवाद आहे तुमचा. सरकारची कचखाऊ धोरणे दहशतवादाला पूर्णपणे जवाबदार आहेत असं भासवता तर खापर स्युडो सेक्युलर लोकांवर फोडू इच्छिता. (सरकार हे हिंदू विचारसरणीच्या भाजपाचे देखिल होते हे लक्षात घ्या.) आणि तसेही स्युडो सेक्युलर लोक हे ढोंगीच असतात कडवे हिंदुत्ववादी आणि धर्मांध मुस्लिमांइतकेच, त्यामुळे त्यांना सोडून द्या. खरे सेक्युलर आणि हिंदुत्ववादी ह्यांची तुलना करा आणि तुम्हाला काय वाटले ते सांगा.
मात्र दिसताना काय दिसते? ज्या काही दहशतवादी घटना घडल्या त्या कुठल्याही निव्वळ हिंदू म्हणता येईल अशा ठिकाणी झाल्या नाहीत तर सार्वजनीक ठिकाणी झाल्या आणि त्यात, अगदी कालच्या दहशतवादी कारवायात पण निष्पाप मुसलमान धर्मियांनापण आपले प्राण गमवावे लागले. मला सांगा बरं असे धर्माच्या कारणावरून दुसर्या धर्माच्या विरुद्ध (चूक-बरोबर, कारणे काही असोत) जे उठले त्यांनी असे सार्वजनीक ठिकाणी खुले आम दहशतवाद करत स्वतःच्या धर्मबांधवांना पण कसे मारले? खुले-आम अशासाठी म्हणत आहे कारण जर स्वतःची ओळख लपवून करायचे असते तर नक्की स्वतःच्या धर्मातील व्यक्तींना पण मुद्दाम मारले असते.
ह्या युक्तिवादातुन तुम्हाला अतिरेकी हे सेक्युलर होते असे दर्शवायचे आहे का?
भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ बाबरीत (अथवा गोध्र्यात) आहे असे म्हणणे एकांगी वाटते. बाबरीने ठिणगी निर्माण केली हे खरे आहे, पण विकास ह्यांनी दर्शवलेल्यानुसार आजूबाजूच्या देशातील घडामोडींमुळे गोळाबारूद अगोदरच तय्यार होते, ठिणगीची आवश्यकता होती, ती मिळाली व पहिली मोठ्ठी दंगल झाली. ह्या अगोदरपासूनच काश्मिरमध्ये खून, बलात्कार, हिंदूंना देशोधडीस लावणे हे सुरू झालेले होतेच. बाबरीच्या दंगलीने सर्वांचे लक्ष तसल्या घटनांकडे ठळकपणे गेले इतकेच. आणि बाबरी नसती तरी दुसर्या कुठल्याही निमीत्ताने धार्मिक दंगे झालेच असते.
जगतील मुस्लिमातील धर्मांधांचे कधीपासूनच नेटवर्क बांधणे सुरू आहे. त्यामुळे अनेक देशांतील मुस्लिमांत धर्मविषयक माहितीची देवाण घेवाण होत राहिली आहे. त्यातूनच दहशतवादी एका देशांतून दुसर्या देशात जाणे सुरू झाले, व ह्यापुढेही ते तसे होत राहील. इथे हेही लक्षात घेऊया की, हे धर्मांध असली माहिती पुरवतांना कसली बातमी पुरवायची व ती कशी पुरवायची ह्याबद्दल पूर्ण जागरूक असतात. ह्यामुळे काही निवडक घटना त्यांच्या कह्यातील तरूणांना सांगितल्या जातात, त्यांचे हॅमरिंग केले जाते. ह्यात अर्थातच अमेरिका, ब्रिटन, युरोपातील इतर राष्ट्रे आली, रशियातील चेचेन आले, फिलीपिन्समधील मिंदानाओ आले (कालच बातमी वाचली की तेथे एका बांग्लादेशी तरूणाला दहशतवादासाठी अटक करण्यात आली आहे). पण चीनमधे शिंजांगात तेथील मुस्लिमांची जी शतकांनू शतके फुटिरवादी 'चळवळ' सुरू आहे, त्याबद्दल ह्या तरूणांना काहीही माहिती नसते. कारण आर्थिकदृष्ट्या व राजकिय दृष्ट्या चीन हे मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांना व पाकिस्तानला दोस्त राष्ट्र वाटत आलेले आहे, तिथे काहीही गडबड करून चालणार नाही. म्हणूनच पाकिस्तानी धर्मांध मुस्लिम तेथील लढ्याबद्दल मूग गिळून आहेत. तुलनेने भारत हे अगदी 'सॉफट टार्गेट'. ही दहशतवादाची खुल्ली प्रयोगशाळा आहे, इथे खेळ खेळणे तुलनेने सोपे आणि कुणी पकडले गेले तरी त्यांची सुंदर व्यवस्था येथील सरकार पहाते. तेव्हा इथे बाहेरून धर्मांध तरूणांना दहशतवादासाठी पाठवणे सोपे. म्हणजे केवळ इथे भारतात धर्माची अस्मिता डिवचली गेली, म्हणून एक मोठी दंगल झाली, व पुढेही त्या त्याच कारणामुळे होतच राहिल्या आहेत, हे म्हणणे प्रश्नाचे सोप्पीकरण आहे.
चेचेन्याच्या निमीत्ताने रशियातही ह्या धर्मांध मुस्लिमांनी दंगेधोपे घडवून आणलेले आहेत अथवा प्रयत्न केलेले आहेत. बेसलानबद्दल सगळ्यांना माहिती आहेच. पण त्यांना २००६ साली से. पीट्सबर्ग येथे जी. ८आ च्या कॉन्फरनसच्या वेळी आता मुंबईत झाले तसेच मोठ्ठ्या प्रमाणात घडवून आणायचे होते. त्यात स्थानिकांचा बरोबरीनेच अनेक रशियाबाहेरील तरूणांचाही अंतर्भाव होता. पण रशितातील संरक्षणयंत्रणेने वेळीच ठाम पावले उचलली, व हा संभाव्य हल्ला उधळून लावला. तिथेही अर्थातच चेचेयातील फुटिरांच्या मागे 'बाबरी' प्रमाणेच काहीतरी कारण उभे केले असावे.
ह्या मुंबईच्या दहशतवादाइतकाच एक खेळ काही वर्षांपूर्वी इंडोनेशियातील बाली येथे खेळला गेला. बाली त मुख्यत्वे हिंदू जनता आहे, आणि तेथे टूरिझम हा मुख्य व्यवसाय आहे. आजूबाजूच्या सर्वच देशांतून व विशेषतः ऑस्ट्रेलियातून तिथे टूरिस्ट जात असतात. २००२ साली तिथे जेमा इस्लामिया ह्या एल. ई. टी. च्या भाईबंद संघटनेने जोरदार स्फोट घडवून आणले, २०० च्या वर माणसे मृत्युमुखी पडली. त्यातील मुख्य आरोपींना पकडून त्यांच्यावर खटला चालला, त्यांना दोषी ठरवले गेले व मृत्युदंडाची शिक्षा सुनवण्यात आली. त्यांनी केलेल्या अपिलाची सुनावणी होऊन ही शिक्षा कायम करण्यात आली. आपल्या येथील सर्वच वर्तमानपत्रांनी ह्याविषयी काही बातमी दिली नाही, पण त्यांच्या ह्या शिक्षेची अंमलबजावणी गेल्या महिन्याच्या ९ तारखेस करण्यात आली. लक्षात घ्या, इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक जास्त मुस्लिम लोकसंख्येचा मुस्लिम देश आहे, व अलिकडे तेथील मूलतत्ववाद वाढीला लागला आहे. आरोपींनी सर्व अपिले हरल्यावर निदान आमच्या शरियानुसार शिरच्छेद व्हावा, अशी मागणी केली होती, तिही फेटाळली गेली व कायद्यानुसार त्यांच्या देहांत शिक्षेची अंमलबजावणी बंदुकीच्या गोळींनी झाली. तेथील सरकारने दंगेधोपे होतील म्हणून जय्यता तयारी ठेवली होती, पण काहीही विपरित झालेले नाही. हे सगळे आपल्याकडे अफझल गुरूच्या संर्भात जो घोळ चालू आहे, त्यावर उठून दिसते (म्हणून इथे सविस्तर लिहीले).
भारतातील आधुनिक दहशतवाद भारताला जगापासून वेगळे करून पहाता येणार नाही. मुस्लिम धर्मांधाचे नेटवर्क, माहितीच्या आदानप्रदानाची नवनवी साधने जसजशी उपलब्ध होत आहेत, तसतसे जास्त एकसंध होत राहिल. शस्त्रात्रांची वाढती आंतरराष्ट्रिय उलाढाल ह्यामुळे असले प्रयोग होत राहतील असे वाटते.
स्थानिक मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपणही काही प्रामाणिक पाऊले उचलली पाहिजेत. ह्यासाठी आपल्या देशाचे नेतृत्व कुण्या खंबीर व दूरदर्शी व्यक्तिकडे असावेच, पण मुस्लिमांतूनच कुणी दूरदर्शी नेता निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आपल्यावर येथे निव्वळ अन्यायच होत राहिला आहे, ही नकारात्मक भावना सोडून त्या समाजास सकारात्मक विचारांकडे व कृतिंकडे वळवण्याची जरूरी आहे. हे त्याच्च्यातीलच कुणी नेता करू शकतो, इतर बाहेरून कॅटॅलिस्टचे कार्य करू शकतात.
इतका लांबलचक प्रतिसाद देउन तुम्ही काय साधलेत तेच कळले नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत हे मला देखिल पूर्ण मान्य आहे, पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली. आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कार्ट असा पूर्वग्रह ठेवू नका.
आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कार्ट असा पूर्वग्रह ठेवू नका.
ह्या वाक्यात तुम्हाला जे अभिप्रेत आहे, ते साफ चुकिचे आहे, व मी त्याचा निषेध करतो. एकाध्या व्यक्तिचा धर्म ही त्याची वैयक्तिक बाब आहे व म्हणून ती घरापुरतीच मर्यादित ठेवावी, असे मी समजतो. येथील माझ्या कुठल्या वक्तव्याचा आधार घेऊन आपण हे लिहीले आहे, हे मला समजले नाही. लिहीण्याच्या (अथवा कॉपी अँड पेस्ट करण्याच्या) नादात तुम्ही हे लिहीले असेल असे समजून मी हे सोडून देत आहे. (ह्याबाबत अधिक चर्चा करायचीच असेल तर ती व्य. नि. अथवा खरडीतून करावी, कारण त्याचा ह्या चर्चाप्रस्तावाशी काहीही संबंध नाही).
आपण सर्वच येथे शक्य तेव्हढ्या अलिप्तपणे ह्या प्रश्नाकडे बघत आहोत, असे मी तरी मानतो. मला वाटते आपल्यात मतभेद आहेत ते दोन मुद्द्यांविषयी. पहिला हा की भारतात सर्रास दहशतवाद कधीपासून सुरू झाला असे म्हणावे. व दुसरा, दंगलीच्या मागील दिल्या जाणार्या कारणांना कितपत वजन द्यावे हा.
एका मोठ्ठ्या शहरात एकाच वेळी अनेक हल्ले केले म्हणजेच दहशतवाद होतो असे नाही. मुंबईच्या दंगलीच्याही काही वर्षे आधी भारतात, काश्मिरात दहशतवाद इंपोर्ट झालेला होता (सुमारे १९८९ सालापासून). तेव्हा तर बाबरी हे कारण नव्हते.
दुसरा मुद्दा धार्मिक अस्मिता दुखावणे आणि / किंवा आपल्या धर्माच्या माणसांची केलेली छळणूक ही कारणे आपल्याला वारंवार दिली जातात त्यात वास्तव किती व अतिशयोक्ति किती ? (मी हे अगोदरच मान्य केले आहे, की बाबरीचे मुंबईच्या दंगलीला निमीत्त मिळाले, प्रश्न आहे तो पुन्हा पुन्हा होणार्या दंगलींच्या मागे तेच कारण दिले जाते तेव्हा).
मी चीनचे उदाहरण अशासाठी दिलेले होते की तेथे अनेक शतकांपासून ह्या दोन्ही गोष्टी सुरू आहेत, पण धर्मांध मुस्लिमांचे राजकिय, आर्थिक हितसंबंध तेथे गुंतलेले आहेत तसेच तिथे सरकारची संरक्षण यंत्रणा अत्यंत खंबीर आहे. तेव्हा हीच कारणे देण्यासारखी असूनसुद्धा तिथे दहशतवाद इंपोर्ट करण्यात आलेला नाही. तेथील स्थानिक विघुरांनी काही तुरळक स्फोट वगैरे बैजिंग ऑलिंपिक्सच्या आधी देशाच्या पश्चिम प्रांतात (गांसू, शिन्ज्यांग इ.) घडवून आणले खरे पण सक्षम संरक्षण यंत्रणेमुळे ते तेव्हढ्यावरच निभावले.
रशिया, इंग्लंड इतर युरोपीय देश व अमेरिका ह्या सगळ्या देशातही काही पहिल्या दंगली असल्याच कारणांमुळे केल्या गेल्या (अफगाणीस्तान, अर्थात भाईबंदांवर हल्ले) . पण तेथील सरकारांच्या प्रतिबंधक योजना व चोख संरक्षणयोजनांमुळे परत परत दंगली घडवता आलेल्या नाहीत. अगदी प्रेषिताची व्यंगचित्रातून विटंबना करण्यात आली होती, तरीही तेथे पुढे कसलीही दहशतवादी कृत्ये 'घडवता' आलेली नाहीत.
इंडोनेशियातील जेम्मा मिलीयाने बालीतले बाँबस्फोट घडवून आणण्यातही तेथीला हिंदूंनी केलेल्या कुठल्याही कृत्याचे उट्टे काढणे हे कारण नव्हते. (जेम्मा ही इंपोर्टेड दहशतवादी संघटना आहे). पण मी अगोदर लिहील्याप्रमाणे तेथेही सरकारने खंबीर पाउले उचलून दहशतवाद्यांना टक्कर दिलेली आजतरी दिसते.
राहता राहिले फिलिपिन्स, थायलंड व भारत. ही तिन्ही अत्यंत सॉफ्ट टार्गेट्स. येथे काहीही करा, काहीही कारणे द्या व परत परत तेच करत रहा, असे चाललेले आहे.
थोडक्यात ही जी कारणे आपल्या तोंडावर फेकली जातात, तद्सदृश्य कारणे कमीजास्त प्रमाणात अन्यत्र असूनसुद्धा एकतर तेथे अस्थैर्य निर्मांण करण्याची जरूरी भासली नाही अथवा ते सहजसाध्य नाही, तिथे दहशतवाद्यांनी स्पॉन्सर केलेल्या दंगली पुन्हा पुन्हा होत नाहीत. त्यामुळे अर्थातच त्या समाजांतर्गत 'आपण ते अमुक तमुक केले होते त्याची ही फळे आजवर भोगतो आहोत' अशा अर्थाच्या चर्चा तेथे होण्याचे कारणच संभवत नाही.
उघड उघड बाबरी तोडल्याचे समर्थन करताना दिसत आहेत .त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात तसे दिसून येते.
एक वाक्य दाखवा ज्यात मी समर्थन केले आहे. नाही मिळाले तर तसे लिहून वरील प्रतिसाद गाळायला जाहीरपणे सांगा. माझे म्हणणे इतकेच आहे की आज जे काही झाले आहे त्यासंबंधी लिहीत असताना निष्कारण त्यात हिंदूंना गोवण्यासाठी बाबरी मशिद मधे आणणे हे अयोग्य आहे.
मी तुमच्या प्रतिसादावरून आणि लेखावरून असा निष्कर्ष काढला अर्थात लेख वाचून कोणाला ही तेच वाटेल.असो.
मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की बाबरी तोडणारे कोण होते तर हिंदू.मी माझ्या एका प्रतिसादात लिहीलेच आहे की बाबरी तोडल्यावर जी हिंदुत्वाची लाट आली व नंतर ज्या दंगली झाल्या त्यानंतर भाजप या देशात वाढू लागला.जसजसा भाजप वाढू लागला तसतसा दहशतवादही या देशात वाढल्याचे दिसून येते(पहा निरीक्षण करून).याला कारण काय मुसलमानांतील असुरक्षीतता.
मी तुमच्या प्रतिसादावरून आणि लेखावरून असा निष्कर्ष काढला अर्थात लेख वाचून कोणाला ही तेच वाटेल.असो.
मला एक वाक्य दाखवा हे मी आधीपण म्हणालोच आणि आत्ता पण तेच म्हणत आहे...
मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की बाबरी तोडणारे कोण होते तर हिंदू.
इतके स्पष्टपणे जेंव्हा मुंबईतील बाँबस्फोट असो, काश्मिरमधील दहशतवाद असो, होतो तेंव्हा ते करणारे मुसलमान असे म्हणता का? मग येथेच हिंदू असे का म्हणता?
मी माझ्या एका प्रतिसादात लिहीलेच आहे की बाबरी तोडल्यावर जी हिंदुत्वाची लाट आली व नंतर ज्या दंगली झाल्या त्यानंतर भाजप या देशात वाढू लागला.जसजसा भाजप वाढू लागला तसतसा दहशतवादही या देशात वाढल्याचे दिसून येते(पहा निरीक्षण करून).याला कारण काय मुसलमानांतील असुरक्षीतता.
तसे असते तर भाजप-सेना युतीचे सरकार असताना मुंबईत एकही दंगल अथवा दहशतवादी कृत्ये का झाली नाहीत? आसाम आणि पुर्वांचल प्रदेशांमधे ज्या काही घातपाती घटना होत आहेत, नक्षलवादी घटना यांचा संबंध भाजपाशी कसा लावणार? बरं घटकाभर असे म्हणू की आपण म्हणता त्यात तथ्य आहे. पण मग सरकारची जबाबदारी काय असते? ती सरकार (कुठलेही, त्यात भाजपचे/ रालोआचे पण आलेच) त्यांनी ठोस पावले उचलली का? म्हणून माझ्या वरील मूळ लेखाचा निष्कर्ष परत वाचा:
थोडक्यात आधीपण इतरत्र म्हणलेले आहेच पण पुनरुच्चार करत मला काय वाटते ते सांगतो, " आजच्या दहशतवादाचे आणि दहशवाद्यांचे मूळ हे जसे आंतर्राष्ट्रीय सीमेच्या सभोवताल होत असलेल्या भूराजकीय घटनांशी जोडलेले आहे, तसेच त्याचा वेळीस अंदाज न घेता योग्य निर्णय न घेण्याच्या कमकुवत नेतृत्वाशी आणि "आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्या समाजवृत्तीशी आहे."
विकासजी तुम्ही माझ्या मुद्द्यांना उत्तरे देणे मात्र टाळले आहे. कडव्या हिंदूंचा देखिल सध्याच्या परिस्थिती चिघळवण्यात इतकी विकोपाला नेण्यात काहीच हात नाही असा अपप्रचार तुम्ही गोल गोल विधाने करुन मांडत आहात.
माझ्या वरील प्रतिसादाचा प्रतिवाद तुम्ही कसा करता ते बघायची उत्सुकता होती. पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली. आपला तो बाब्या आणि दुसर्याचं ते कार्ट असा पूर्वग्रह ठेवू नका.
विकासजी तुम्ही माझ्या मुद्द्यांना उत्तरे देणे मात्र टाळले आहे.
मी आणि प्रतुत्तर देण्याचे टाळतो? अहो इथे असलेले माझे वैचारीक विरोधक पण हे मान्य करणार नाहीत, अगदी मी आता उत्तरे देण्याचे टाळले तर, 'हुश्श! एकदाची कटकट संपली!', असे म्हणत त्यांना कितीही आनंद झाला तरी. :-) तसे म्हणायलाच गेलो तर आधीच्या चर्चांमधे, आपल्या वादविवादात मलाच आपल्याकडून परत उत्तरे आली नाहीत...:-( पण ते आता राहूंदेत...मी आपल्याला काल दोनदा उत्तरे लिहायला लागलो होतो, आणि अचानक "मिपावरील अतिरेकी हल्ले" माझ्या उत्तराला भोगावे लागले... असो.
कडव्या हिंदूंचा देखिल सध्याच्या परिस्थिती चिघळवण्यात इतकी विकोपाला नेण्यात काहीच हात नाही असा अपप्रचार तुम्ही गोल गोल विधाने करुन मांडत आहात.
आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. हे म्हणत असताना, आपण विचारलेल्या या प्रश्नाचे: "ह्या युक्तिवादातुन तुम्हाला अतिरेकी हे सेक्युलर होते असे दर्शवायचे आहे का? " उत्तर, सोपे आहे - नाही! आजचा हल्ला हा हिंदुत्वाला अथवा हिंदूना प्रतिक्रीया म्हणून झालेला नसून तो भारतावर झाला. म्हणून त्या संदर्भात मी आपल्याला दिलेल्या "एकम सत" प्रतिक्रीयेत, अक्षरधामचे उदाहरण दिले आहे, ज्या संदर्भात आपण म्हणत असलेला मुद्दा लागू होतो. पण २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ला हा एका पारशाच्या मुसलमानी नाव असलेल्या हॉटेलावर झाला आणि त्यात सर्वधर्मियांना मरण आले आहे.
आजचे दहशतवादी जनावर हे वेगळे आहे आणि त्याचा भारतातील धार्मिक मुलतत्ववाद्यांशी संघटनात्मक संबंध आहे असे अजूनपर्यंत बाहेर आलेले नाही. अर्थात परत याला अपवाद काश्मिरमधील दहशतवादी टोळ्या असू शकतात आणि असतीलही.
बरे आपण म्हणता ते जर मान्य केले की, "त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली." तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की या दहशतवादास केवळ भारतातील मुसलमान मदत करतात. हा आरोप मला अमान्य आहे. जी कोणती अंतर्गत मदत या दहशतवाद्यांना झाली आहे ती केवळ मुस्लीमांची आहे असे म्हणणे अन्याय्य आहे. जी मदत झाली आहे ती भ्रष्टाचारी नोकरशहा आणि राज्यकर्त्यांकडून झाली आहे. अर्थातच त्यांना त्याचे भिषण परीणाम माहीत नसणार, पण स्वतःचे पोट भरताना, पेट्या गोळा करताना थोडाफार कानाडोळा झाला तर काय बिघडले या हावरट आणि हिन वृत्तीच्या माणसांणि ती मदत केली आहे. दहशतवादाप्रमाणेच भ्रष्टाचारास धर्म नसतो असे जरी म्हणले तरी वस्तुस्थितीत अशा व्यक्ती कुठल्यान कुठल्या धर्माच्या असतातच. त्यात केवळ मुसलमान नसणार तर हिंदू आणि इतर धर्मिय पण असू शकतात असे माझे म्हणणे आहे. आता हे म्हणताना तुम्हाला मी बाब्या कुणाला म्हणतो आणि कार्टे कुणाला म्हणतो हे जर समजत नसेल तर माझ्या त्या मर्यादा मानाव्या लागतील :-(
आता थोडे अजून आपल्या वरील आधीच्या प्रतिक्रीयेसंदर्भातः
आपण म्हणालात - आणि तसेही स्युडो सेक्युलर लोक हे ढोंगीच असतात कडवे हिंदुत्ववादी आणि धर्मांध मुस्लिमांइतकेच, त्यामुळे त्यांना सोडून द्या. खरे सेक्युलर आणि हिंदुत्ववादी ह्यांची तुलना करा आणि तुम्हाला काय वाटले ते सांगा.
सर्वप्रथम, आपल्या, "स्युडो सेक्युलर लोक हे ढोंगीच असतात" शेर्याबद्दल धन्यवाद! आजतागायत सुडोसेक्युलर्स नावाचे काही प्रकरण अस्तित्वात असते हेच मान्य न करणे अथवा त्याकडे दुर्लक्ष करणारे मी पाहीलेत. आपण मला पहीलेच असे म्हणणारे भेटला आहात.
आता आपला मुद्दा, "सेक्युलर आणि हिंदुत्ववादी" ह्यांची तुलना या संदर्भात - आणि ती पण भारतीय व्यक्तींशी मर्यादीतः
जर दोघे प्रामाणिक असतील तर त्यांच्यामधे एक धार्मिक नाव हा फरक सोडला तर विशेष फरक जाणवणार नाही. सेक्युलर आणि हिंदुत्ववादी हे धर्माच्या चौकटीतून कोणाकडे बघणार नाहीत. तसे नसते तर बाळ ठाकरे नर्गिस दत्तचे पण स्नेही नसते आणि शबाना आझमीचे प्रमोद महाजनशी मैत्रीचे संबंध नसते (यात मी त्यांचे इतर राजकारण अथवा वागणे या संदर्भात बोलत नाही आहे, उदात्तीकरण तर लांब राहूंदेत! ).
मग फरक कुठे असेल? कदाचीत (चांगल्या अर्थाने) "कडवा" सेक्युलर हा निधर्मी असेल आणि कदाचीत त्या नादात तो जी काही हिंदू म्हणा अथवा भारतीय (परत चांगली) सांस्कृतिक ठेव ही आपली म्हणून जपणार नाही. याचा अर्थ हिंदूत्ववादी घरात दिवाळीत सात्विक वातीचे दिवे लावतील असे नाही :-) किंबहूना तसे मुद्दामून/जाणिवेने अजिबात करणार नाहीत... पण आपली संस्कृती, त्यातील घेण्यासारख्या अनंत गोष्टी, त्यात अभिमानास्पद असणार्या गोष्टी यांचा रास्त मान राखेल आणि तो जगाला तसे न लाजता सांगेल. ...
>>आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा अर्थाअर्थी काही संबंध नाही.
हे कुणी ठरवले? कशाच्या जोरावर असली विधाने ठोकून देता? सध्याच्या अतिरेकी कारवाया ह्या पाकिस्तानकडून फूस लावल्याने होत असल्या तरी त्यांना भारतीय मुसलमानांचा पाठींबा असल्या शिवाय हे शक्य नाही. हे तरी मान्य आहे का? मग इथल्या मुसलमानांना ही पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करण्यासाठी कोण पेटवत आहे? त्यांच्या मनात असुरक्षीततेची आणि सुडाची भावना कुणामुळे धिक जोपासलि जात आहे?
>>आजतागायत सुडोसेक्युलर्स नावाचे काही प्रकरण अस्तित्वात असते हेच मान्य न करणे अथवा त्याकडे दुर्लक्ष करणारे मी पाहीलेत. आपण मला पहीलेच असे म्हणणारे भेटला आहात.
मग मी काय करू? हे मला कशाल सांगताय?
>>सेक्युलर आणि हिंदुत्ववादी हे धर्माच्या चौकटीतून कोणाकडे बघणार नाहीत.
हा तर विनोदच आहे. धर्माच्या चौकटीतून बघत नसतील तर ते कसले बोडक्याचे (कुठलाही)धर्म वादी??
नेहमी प्रमाणे शब्दबंबाळ एकांगी प्रतिक्रिया
तरी वाचाविशी वाटली सर्व काही पावले... :-)
>>> आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा
अर्थाअर्थी काही संबंध नाही. हे कुणी ठरवले? कशाच्या जोरावर असली विधाने ठोकून देता?
विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही. जे हल्ले ते जगभर करत आहेत त्याच हल्ल्यातील हा एक भाग आहे. मग ते अमेरिका असोत अथवा लंडन/माद्रीद आणि इतरत्र फसलेले हल्ले असोत.
>>>सध्याच्या अतिरेकी कारवाया ह्या पाकिस्तानकडून फूस लावल्याने होत असल्या तरी त्यांना भारतीय मुसलमानांचा पाठींबा असल्या शिवाय हे शक्य नाही.
तुमचे म्हणणे मान्य नाही. त्यांना पाठींबा केवळ मुसलमानांचा मिळाला असे मला वाटत नाही तो कुठल्याही लाचखोर भारतीयाचा मिळाला ज्यात केवळ मुसलमानच नाही तर हिंदूंसकट इतर कुठल्याही धर्माचे असू शकतात. थोडक्यात यातील पाठींबा हा धर्माधारीत नसून "अर्था"धारीत होता आणि काही बाबतीत पोलीसांच्या निष्का़ळजीपणाचा पण होता. आठवते, डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीने ऑक्टॉबरच्या सुमारास पोलीसांना तिच्या मित्राकडून जिहाद संदर्भात आलेला एसएमएस दाखवून काळजी व्यक्त केली होती आणि दुर्लक्ष झाले होते ते?
>>>हा तर विनोदच आहे. धर्माच्या चौकटीतून बघत नसतील तर ते कसले बोडक्याचे (कुठलाही)धर्म वादी??
विनोद नाही वास्तव असायला हवे. सेक्युलर जर निधर्मी असतात तर त्यांनी त्यापद्धतीनेच विचार करायला हवा आणि हिंदुत्ववाद हा राष्ट्रवाद आहे धर्मवाद नाही, हे आपण तो काय होता हे मुळातून वाचल्यास कळेल. दुर्दैव असे आहे की आंधळे हिंदुत्ववादी आणि त्याचे आंधळे विरोधक दोघेही ते वाचत नाहीत आणि सोयीस्कर अर्थ काढत मुक्ताफळे उधळतात.
असो. बाकी एक विनंती, पहा जमल्यास - आता ही चर्चा मोठी झाल्याने ट्रॅक करणे अवघड जाते, यावर अधिक चर्चा करायची असल्यास एक तर नवीन चर्चा चालू करा अथवा खरड पाठवा.
धन्यवाद.
विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही.
ज्यांनी गोळीबार केला त्या अतिरेक्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वत: गुजरात मध्ये केलेल्या हिंसाचाराच बदला अस उल्लेख केलेला आहे. आणि तुम्ही काय म्हणता प्रतिक्रिया म्हणून केलेल नाही?
हा एक जागतिक पातळीवरील प्रश्न असल्याने त्याची उत्तरे प्रामाणिकपणे शोधायची तर इतरस्त्रही बघावयास हवे, नुसते भारतातील काही घटना घेऊन चालणार नाही. ह्याबद्दल मी अगोदरच बरेच काही येथे लिहीले आहे. त्यावर तुमचे काहीही भाष्य नाही. तरी परत आपण 'बाबरी', 'गुजरातेतील हिंसाचार' ह्यात गुंतून पडला आहात. कारण तसे करणे सोपे आहे.
विकास ह्यांना: " ...या आठवड्यात तुम्हाला चिथावणार्या प्रतिसादांना तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटेल. प्रामाणिकपणे तुम्ही संदर्भ तपासून, वाक्ये योजून लांबलचक प्रतिसाद लिहाल आणि तुमचे विरोधक "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असे तर होत नाही आहे ना?
तेव्हा ह्या फुटकळ प्रतिसादांना ह्यापुढे उत्तरे न देणे हेच उत्तम. चर्चा खरोखरीच सुरू ठेवायची असेल, तर जे काही मांडले गेले आहे, त्याविषयी दुसर्या व्यक्तिचेही ठोस भाष्य हवे. नुसती पळापळ नको.
" ...या आठवड्यात तुम्हाला चिथावणार्या प्रतिसादांना तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटेल. प्रामाणिकपणे तुम्ही संदर्भ तपासून, वाक्ये योजून लांबलचक प्रतिसाद लिहाल आणि तुमचे विरोधक "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असे तर होत नाही आहे ना?
प्रदीप इथे येउन असलं काहितरी बरळेल ह्याचा अंदाज होताच. पण विकास तू देखिल लगेच सहमतीचा होकार टाकून अंग काढून घेतलेस ते अनपेक्षीत होते. असो, असले ऍटीट्यूड दाखवल्यावर मलाही चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही.
धन्यवाद!
असो. बाकी एक विनंती, पहा जमल्यास - आता ही चर्चा मोठी झाल्याने ट्रॅक करणे अवघड जाते, यावर अधिक चर्चा करायची असल्यास एक तर नवीन चर्चा चालू करा अथवा खरड पाठवा.
यायची काय जरूर होती? संयम सुटला? माझा इथला वावर पहाता कुणालाही मी 'असे काही बरळत' असेन असे वाटले ह्याचेही आश्चर्य वाटते!! मी जे सविस्तर मुद्दे (उदाहरणासकट) लिहीले त्याला तुमचा काहीही प्रतिवाद नाही. का तेही 'बरळणे' वाटले?
आणी आता तर तुम्ही कमालच करत आहात. बाहेरील कुणी अतिरेकी आले, निरपराध्यांना सरसकट मारू लागले व मीडियाचे त्यांच्याकडे लक्ष जाताच (हेच त्यांना अपेक्षितही असावे) त्यांनी नेहमीची 'गुजरात' वगैरे रेकॉर्ड लावली. त्याला तुम्ही किती क्रेडन्स देता आहात? हे असे करणे तुम्हाला सोप्पे आहे, कारण आजूबाजूस बघण्याची, एक मोठे चित्र पहाण्याची तुमची तयारी नाही, अथवा कुवत नाही.
संयम कुणाचा सुटला हे दिसतेच आहे. विकासची आणि माझी चर्चा चालू असताना त्यात तोंड घालून "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असली शेरेबाजी करणे ह्याला बरळणे म्हणत नाहीत काय?
आणि राहता राहिलं वादा विषयी तर माझं वाक्य/भुमिका अशी आहे;
पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली.
असे पुन्हा पुन्हा सांगुनही, "हा एक जागतिक पातळीवरील प्रश्न असल्याने त्याची उत्तरे प्रामाणिकपणे शोधायची तर इतरस्त्रही बघावयास हवे, नुसते भारतातील काही घटना घेऊन चालणार नाही." हे तुमचे पालुपद आणि वर माझी कुवत काढता?
मी गुजरातचा उल्लेख केला तो विकासच्या ह्या "विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही." ह्या वाक्याला. त्यावरुन सोयीस्करपणे मी फक्त हिंदूंवरच खापर फोडतो आहे असले अर्थ काढणारे धर्मांधच म्हणायचे.
कौंतेय
विकासची आणि माझी चर्चा चालू असताना त्यात तोंड घालून...
हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे आणि चर्चा पण सार्वजनीक आहे. कोणीही कुठेही लिहू शकतो. नाहीतर तुम्ही देखील माझ्या आणि विकीच्या चर्चेत तोंड घातले असे म्हणता येईल...अनलेस तुम्हीच विकी असाल तर गोष्ट वेगळी...
पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली.
१००% असहमत. म्हणूनच कुठल्याही आंतर्राष्ट्रीय दहशतवादी दुष्कृत्यांनंतर "कडव्या धर्मांध हिंदूंनी" एकही दंगल चालू केली नाही की स्थानीक मुसलमानांना दोष दिलेला नाही. तसेच तुमच्या सारखे सुडोसेक्युलर्स सोडल्यास मुस्लीमांनी पण असे म्हणत झालेल्या दुष्कृत्यांचे समर्थन केलेले नाही, फक्त निषेधच केला आहे...
असो हा येथील शेवटचा प्रतिसाद. आता आपण जर चालू केलीत तर नवीन चर्चेत प्रतिसाद देण्यासाठी उत्सुक!
सर्वप्रथम मी ते जे लिहीले ते माझे स्वतःचे नव्हते तर ते ह्या 'टंग- इन-चीक' लिखाणावरून घेतलेले होते. विकास ह्यांना ते समजले व ते आपल्याला माहिती असेल असे वाटले होते. तसे नसल्याने आपण दुखावले गेला असाल, तर माफ करावे.
दुसरे, अशा चर्चा सर्वांनाच खुल्या आहेत, तेव्हा कुणीही 'नाक खुपसू' शकतात. तसे नको असेल तर व्य. नि. तून पत्रव्यवहार करावा.
आता माझ्या 'पालुपदा'बद्दल.
ते पालुपद मूळ चर्चाप्रस्तावाशी निगडीतच आहे. आपला रोख 'भारतातच इतके दहशतवादी हल्ले होतात, ह्याचे कारण इथे मुस्लिमांना असुरक्षित वाटत रहाते, त्यांच्यात एक वैफल्याची भावना आहे' असा दिसतो. तेव्हा मी जे प्रतिपादन करत आहे ते थोडक्यात असे:
१. जगात अनेक ठिकाणी मुस्लिम धर्मांधांची तेथील समाजांशी भांडणे सुरू आहेत.
२. तरीही त्यातील किमान एका ठिकाणी (चीन) दहशतवादाचे प्रयोग अत्यंत अल्प झाले,कारण तेथे सरकारचा प्रचंड वचक आहे, आणि राजकिय परस्पर संबंध गुंतल्याने बाहेरील दहशतवादी तिकडे काणाडोळा करतात.
३. इतरस्त्र जिथे असे हल्ले झाले, (रशिया,. स्पेन, ब्रिटन, नेदरर्लँड, अमेरिका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया) ते आपल्या येथल्याप्रमाणे पुन्हापुन्हा होत राहिले नाहीत ह्याचे कारण सुरूवातीच्या हल्ल्यानंतर तेथील सरकारांनी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला आणि कायद्यात व न्यायनिवाड्याच्या तातडीत जरूर ते बदल केले.
४. जिथे सरकारे खंबीर पावले टाकावयास निष्प्रभ ठरली आहेत (भारत, थायलंड, फिलीपाईन्स), तेथे हे हल्ले परत परत होतच राहिले आहेत.
हे सर्व पहाता, ह्या तीन ठिकाणीच असे हल्ले सुरूच आहेत व तसेच रहाण्याची शक्यता आहे, तेथे एका धर्मियांवर तेथील बहुधर्मिय इतर जगाच्या मानाने जास्त अन्याय व जुलूम करता आहेत, असे मानणे चुकिचे आहे. (भारताचे एक वेळ जाऊ द्या, पण बौद्धधर्मिय व अगदी मवाळ प्रकृतिचे थाई तसे करतात असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.२००४ सालापासून तेथे सुमारे ३,००० बळी गेले आहेत).
म.टा मधला एक दुवा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3789760.cms
अवांतरः ब्लॅक फ्रायडे हा एक रद्दि चित्रपट होता. मी झोपा काढलेल्या मला अजुनही आठवतात.
विकासजी, उत्तम लेख आणि प्रतिसादही.
अनिताताई, अर्धा तास वाचल्यावर तुम्हाला ही चर्चा वाफ आहे याचा साक्षात्कार झाला?? आवडत नसेल, तर चर्चा वाचण्याची बळजबरी नाही आहे मिपावर. :)
- बाबरी मशिद, १९९३ ची हिंदू-मुसलमान दंगल आणि अगदी गोध्रा रेल्वेकांडानंतर उसळलेली दंगल याचा परीणाम म्हणून काही व्यक्तिगत पेटून हिंदूंच्या विरुद्ध गेले असते तर आपण म्हणता ते बरोबर आहे. जर संघटना हिंदूंच्या विरुद्ध उठल्या असत्या तर आपण म्हणता ते बरोबर आहे. मात्र दिसताना काय दिसते? ज्या काही दहशतवादी घटना घडल्या त्या कुठल्याही निव्वळ हिंदू म्हणता येईल अशा ठिकाणी झाल्या नाहीत तर सार्वजनीक ठिकाणी झाल्या आणि त्यात, अगदी कालच्या दहशतवादी कारवायात पण निष्पाप मुसलमान धर्मियांनापण आपले प्राण गमवावे लागले. मला सांगा बरं असे धर्माच्या कारणावरून दुसर्या धर्माच्या विरुद्ध (चूक-बरोबर, कारणे काही असोत) जे उठले त्यांनी असे सार्वजनीक ठिकाणी खुले आम दहशतवाद करत स्वतःच्या धर्मबांधवांना पण कसे मारले? खुले-आम अशासाठी म्हणत आहे कारण जर स्वतःची ओळख लपवून करायचे असते तर नक्की स्वतःच्या धर्मातील व्यक्तींना पण मुद्दाम मारले असते.
- दुसरा भाग असा, गेल्या १७-१८ वर्षात दोन दुर्दैवी अपहरणे झाली ज्यात काही अतिरेक्यांना सोडवण्यात आले. ते अतिरेकी कोण होते? एकतर पाकीस्तानी अथवा काश्मिरी मुजाहीदीन... तसे म्हणाल तर कंदहार प्रकरणाच्या वे़ळेस मुंबई स्फोटातील अटक झालेल्या मुसलमान धर्मियांना तुरूंगात राहून ६-७ वर्षे झाली होती. तरी देखील त्यांना सोडवण्याचा प्रयत्न का बरे झाला नाही? कारण साधे आहे, त्यांना मुंबई आणी मुसलमान धर्माचे काही पडलेले नव्हते, आपण म्हणत असलेल्या कडव्या हिंदूंचे काही पडले नव्हते. त्यांना त्यांच्या तस्करीचे आणि फारतर काश्मिरचे पडले होते/आहे. बाकी धिंगाणा घालत स्वतःच्या द्वेषात भारतीयांना जाळायचा प्रयत्न मग ते कोणच्या का धर्माचे असेनात. याला अपवाद एकच आहे - अक्षरधाम आणि तो का आहे हे स्पष्ट आहे.
तुमच्या ह्या लेखाचा उद्देश 'दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत भारतातील अंतर्गत घडामोडींचा काहीही संबध नाही' असे काहीसे मांडण्याचा आहे असे वाटते. "दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारतात घुसला पण इथल्या कडव्या हिंदूंच्या करामतींमूळे तो घट्ट मूळे रोवत आहे." ह्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ते सांगा. मी आपण करीत असलेल्या विधानाशी सहमत नाही. दहापेक्षा जास्तवेळेस सांगून झाले... दहशतवादाला धर्म नसतो. दहशतवाद फोफावायला कडू-गोड-आंबट-तुरट हिंदू आणि तसेच मुसलमान जबाबदार नाहीत तर त्याला जबाबदार आहेत सरकारची कचखाउ धोरणे आणि व्होट बँक पॉलीटीक्स. धर्मांध मुस्लीम, कडवे हिंदू यांच्यामुळे फारतर सामाजीक तणाव निर्माण होऊ शकतात आणि तसे झाले देखील होते, आहेत आणि अजूनही होतील. ते इतर प्रकारच्या समाजभेदात पन होतात. उ.दा. राज ठाकरे विरुद्ध बिहारी, कधीकाळची शिवसेना विरुद्ध दाक्षिणात्य, औरंगाबाद विद्यापिठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, वगैरे वगैरे... पण हिंदू-मुसलमान तणाव रहायचे कारण माझ्या लेखी वेगळे आहे. ते आहे सुडोसेक्युलर्स ज्यांनी माध्यमांचा वापर करून दोन समाजात दरी निर्माण केली. परीणामी जशी काही मुसलमानांची प्रतिक्रीया टोकाची झाली तशीच काही हिंदूंची कालांतराने झाली. पण ती प्रतिक्रीया जरी मुसलमानांना कधी भोगावी लागली असली तरी त्याला मूळ कारण आहे सुडोसेक्युलर्स.