Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग एक

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
Mon, 11/01/2021 - 09:08
💬 8 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्च अभिरुचिसंपन्न वाचक हा, बाहेर कितीही करमणुकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी त्याची वाचनसाधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. त्याला प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसाय यांतून वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. तो त्यातल्या त्यात फट काढतोच काढतो व तो वेळ वाचण्यास देतो. अभिरुचिसंपन्न वाचक हा एकतर उच्च अभिरुचीसंपन्न वाचक बनतो अथवा त्याच पायरीवर अधूनमधून वाचन करत राहतो... संपूर्ण लेख : http://sudhirdeore29.blogspot.com/2021/11/blog-post.html संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

प्रतिक्रिया द्या
3738 वाचन

💬 प्रतिसाद (8)
क
कंजूस Mon, 11/01/2021 - 11:35 नवीन
शिवाय त्याच्याकडे वेळ आणि पैसा हवा. दुष्काळ ठराविक विषयाला अधिकच असतो.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/01/2021 - 14:30 नवीन
ओ सर, संपूर्ण लेख येथेच टाकत चला ना. ही दुसरी सुचना आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 11/01/2021 - 16:52 नवीन
???
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/01/2021 - 18:06 नवीन
हाच प्रश्न त्यांच्या ब्लॉगलाही लागू पडतो ना? उगाचच मुख्य प्रश्नाला फाटे फोडू नका. एकतर लेख संपूर्ण टाका अन्यथा येथे अर्धवट लेख अन वरतून खाजगी लिंका द्यायच्या हे योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
स
सुक्या Mon, 11/01/2021 - 19:52 नवीन
देवरे सरांच्या ब्लॉगला वाचकांचा दुष्काळ बघावा लागतो आहे हे जरी खरे असले तरी कुणी तिथे जाउण वाचन करावे असेही काही दिसले नाही. मी मुद्दाम हा लेख तिथे जाउन वाचला तर केवळ उसासे व्यतीरिक्त काही सापडले नाही .. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाला मोकळा वेळ जसा कमी झाला आहे तसेच करमणुकीची बरीच ईतर साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचन हेच एक परमोच्च करमणुकीची / विद्या अर्जनाचे साधन आहे आणी बाकी बाबी फोल आहेत हे ग्रुहीतक चुकीचे आहे. जे ज्ञान मी ३० मिनीटांची डॉक्युमेंटरी बघुन मिळवु शकतो त्यासाठी ४ तास वाचन करण्याची मला गरज वाटत नाही ... बाकी सरांचे याला वेळ आहे / त्याला वेळ आहे पण वाचनाला वेळ नाही हा नकारार्थी सुर बघुन परत त्या ब्लॉग वर मी जाइल की नाही याची शाश्वती नाही ... आवांतर : संपूर्ण लेख येथेच टाकावा या सुचनेशी सहमत ..
  • Log in or register to post comments
स
सुरिया Tue, 11/02/2021 - 03:14 नवीन
अरेवा. ब्लॉगवर जाऊन वाचला लेख. सुक्यारावानी म्हणल्याप्रमाणे उसासे वगैरे आहेतच. आणि सूर ही फारसा पटला नाही. ज्याला जे करावे वाटते ते करू द्यावे असा सध्याचा फंडा आहे. उगी लोकांची अभिरुची संपन्नता वाढवायची हा उद्योग आपण लेखनातून करावा. वाचक तसे झाले तर ठीकच आहे पण ते दुसरेच काहीतरी करत असल्यास दोष वाचन नाही असा ढकलता येणार नाही. किंबहुना हा दोषच नाही असे वाटते. असो. लेख पूर्णपणे इथेच टाकावा ह्या सुचानेशिही सहमत. बादवे ते शेवटी लिहिलात ते थिंक महाराष्ट्र चालू आहे काय अजून? ते वाचले की आमच्या तात्याचे ब्रॉडबँड बुड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळणे फक्त आठवते. ;)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 11/02/2021 - 04:29 नवीन
तुम्ही किती का आरडाओरड करा, त्यांच्यालेखी मिपा फक्त जाहिरात फलक असून त्यावर ते एक अवाक्षर इथं बोलणारही नाहीत अन लिहिणारही नाही. Image removed. त्यांना कदाचित मिपा वगैरे प्रकरणे त्यांच्या लेव्हलची वाटत नसतील, जे काही असेना का, पण एकंदरीतच त्यांना माझ्या चार वर्षे सभासदत्व काळात कोणालाच प्रतिसाद देताना, मनमोकळे बोलताना, व्यक्त होताना बघितले नाहीए.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 11/02/2021 - 07:44 नवीन
त्यांना प्राध्यापक, डॉक्टर पदाची स्वतंत्र पदवी मिळाली असल्याने प्रत्येक लेखाचा स्वतंत्रपणे अभ्यास करत असावेत. व अभ्यासात व्यत्यय नको म्हणून इतरांचे लेखन महत्वाचे मानत नसावेत. खॅ खॅ खॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा