Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पायातली वहाण..

J
Jayagandha Bhatkhande
Wed, 11/03/2021 - 06:50
💬 3 प्रतिसाद
पायातली वहाण... तुला फक्त येते, श्रीखंड अन् पुरी.. आवडत नाही तुला, राईस अँड करी.. आम्ही जातो केळवणाला, तू बस घरी.. कसं आहे, पायातली वहाण, जरा पायातच बरी... येऊ का रे ऑफिसला..? मारते एक फेरी.. क्रेडिट आणि डेबिट मधलं, कळतं का काहीतरी..? घरी बस तुझी तिथेही, कटकट नको भारी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. लाव ना रे आजीला फोन, तिची तब्येत नाही बरी.. इतक्या वेळा शिकवलं तुला, पण विसरतेस तरी.. कधी तुझं तुला जमणार? बावळट आहेस खरी.. पायातली वहाण तू, पायातच बरी.. दोन पिढ्यांमधील अशीच, वाढत जाते दरी.. हीच परिस्थिती सध्या, तिला दिसते घरोघरी.. समजून घ्यावं ज्याचं त्यानं, गोष्ट आहे खरी.. पायातली वहाण ती, पायातच बरी.. कुठलीशी ही दिवास्वप्नं, ती घेऊन बसते उरी.. छोटीशी इच्छाही तिची, कधी झाली नाही पुरी.. आता मात्र वाटतं आतून, ती बाजूला झालेलीच बरी.. कारण नक्की समजलंय तिला, पायातली वहाण पायातच बरी..... जयगंधा.. २-११-२०२१.

प्रतिक्रिया द्या
1812 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
सुक्या Wed, 11/03/2021 - 19:27 नवीन
नाही . . . जग इतकंही वाईट नाहीये . . .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/05/2021 - 13:15 नवीन
:(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 11/05/2021 - 19:54 नवीन
दोन पिढ्यांमधील अशीच, वाढत जाते दरी
इथे स्त्री पुरुषांतलं अंतर म्हणायचंय की दोन पिढ्यांतलं ? की माझ्या समजण्यात काहीतरी गल्लत होतेय ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा