जे न देखे रवी...

गाथा

Primary tabs

तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला

भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ

त्याची बहीण मुक्ताई
सार्‍या मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
नभ उल्लंघून जाय

"गाथा बुडवून टाक"
मला मुक्ताई दटावे
गाथा तरंगून येते
अंतर्यामी तिला ठावे

गाथा रक्तात भिनते
गाथा वज्रलेप होते
शब्द रोकडे बोलत
पुन्हा पुन्हा पछाडते

सुरसंगम

जबरदस्त सगळ्या संतांना एकच मझलेत मस्त गुंफलंत तुम्ही.

ज्ञानोबाराया माझा,
कुणी मांतरीक नाही,
ज्ञानेशाच्या अभंगाला,
तुकाराम पुढे नेई,

पाया रचिला माउलिने
तुका बांधितो कळस,
त्यांच्या ज्ञानाची लावुया
अंतरंगी रे तुळस

त्यांनी दाखवली वाट
थोडे चालूया ती वर,
पायधुळ त्यांची लावू
लीन पणे माथ्यावर

ज्ञान मार्गी ज्ञानेश्वरी
गाथा पाण्यात तरते,
अनुभवता एक ओवी
अंतरंग उजळिते

या मातीत जन्मलो
भाग्य माझे उजळले,
ज्या मराठी मातीत
ज्ञाना-तुका तळपले

पैजारबुवा,