खतरनाक रोडवरच्या प्रवासाची "डिस्कव्हरी"
हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेह हे अंतर तीन सेलिब्रिटीज् (संग्राम, वरुण आणि मंदिरा) एकेका अनुभवी ड्रायव्हरला सोबत घेऊन ट्रक चालवत नेतात, आणि त्यांना दिलेला सामान ठरलेल्या ठिकाणी डिलिव्हरी करतात, हे बघायला खूपच थरारक वाटते.
समुद्रसपाटीपासून अंदाजे 6000 फूट, पासून ते अंदाजे 14000 फूट उंचीवर पोहोचतात.
इंडियाज डेडलीएस्ट रोड्स (भारतातील खतरनाक/प्राणघातक रस्ते) सिझन एक मधील एपिसोड एक, दोन आणि तीन मध्ये आपण "डिस्कव्हरी प्लस" वर बघू शकता. बरीच भौगोलिक माहिती मिळते. ज्ञान वाढते.
पर्वतावरील कडेकपारीतील खाचखळगे, चिखल, दगड, पाणी यांनी भरलेले (बहुतेक सगळे अरुंद) रस्ते, दरड कोसळण्याची भिती आणि हिमनद्यांमुळे कधीही आक्रमक होऊ शकणारे आणि मोठमोठ्या ट्रक्सला सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने दरीत ढकलून देण्याची क्षमता असणारे धबधबे यांची सतत डोक्यावर टांगती तलवार, धुक्यामुळे 50 मीटरच्या पुढचे न दिसणे, उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता असे सगळे अडथळे पार करत या तिघांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचताना बघणे म्हणजे खूप वेगळा अनुभव ठरतो.
आणि हे सगळे कॅमेरात शूट करून ते आपल्यापर्यंत क्रिस्प एडिटिंग करून पोचवणे हे खरंच रिस्की काम आहे. संपूर्ण टीमचे कौतुक वाटते. तुम्हाला रियल लाईफ मधील थरारक असे काही बघायचे असेल तर हा कार्यक्रम नक्की बघू शकता!!
💬 प्रतिसाद
(2)
N
Nitin Palkar
Tue, 11/09/2021 - 15:25
नवीन
चांगली माहिती.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Tue, 11/09/2021 - 16:45
नवीन
ही सिरीज २०१६ मध्ये आली होती, ती मला कशी वाटली होती वगैरे प्रश्न अप्रस्तुत आहेत पण ती येऊन आज जवळपास ५-६ वर्षे लोटली आहेत इतपत लक्षात घेतले तरी पुरे.
दिवाळीचा हंगाम आहे, लोकांनी मेहनत घेऊन अंक सजवत लेखन केले आहे, एक सौजन्य म्हणून तरी किमान "टीव्ही/युट्युबवर पाच वर्षे जुन्या सिरीज पहा" धाटणीचे धागे काढणे अव्हॉइड करता आले असते असे मनापासून वाटते, बाकी आम्हाला बोलायचे अन तुम्हाला लिहायचे स्वातंत्र्य आहेच, पुढील निर्णय घेण्यास मालक संपादक मुखत्यार.
- Log in or register to post comments