कलंत्रीसाहेबांना जाहीर प्रश्न..!
💬 प्रतिसाद
(79)
क
कोलबेर
गुरुवार, 12/04/2008 - 20:42
नवीन
तात्या तुम्ही प्रश्न विचारलेत तेव्हा तुमची अक्कल (बुद्धीचा आवाका वगैरे) कुणी काढलेली दिसली नाही, तुम्ही मात्र रागावुन काहीसे व्यक्तिगत होताय असं वाटल्याने ह्यावर बोलण्यात काही हशील नाही. माझ्याकडून हा विषय संपला.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 12/04/2008 - 20:44
नवीन
कुणी काढलेली दिसली नाही, तुम्ही मात्र रागावुन काहीसे व्यक्तिगत होताय असं वाटल्याने ह्यावर बोलण्यात काही हशील नाही. माझ्याकडून हा विषय संपला.
दॅट्स बेटर..! :)
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
गुरुवार, 12/04/2008 - 21:30
नवीन
कोलबेर शेठ,
तुम्ही ताकाला जाऊन भांडे का लपवताय? तुमचे प्रश्न वाचून हे प्रश्न तात्यांच्या रोखाने होते हे कोणीही मिपाकर सांगेन. बाकी तुमच्या टाइमिंग बद्दल तुम्हाला मानले बॉ! तुमच्या छुप्या प्रश्नांना तात्या काय उत्तर देतात याची उत्सुकता मला पण लागून राहिली होती. त्यांनी मोठ्या मनाने त्यांची थुंकण्याची सवय बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल तात्यांचे तसेच ते प्रश्न उपस्थित करुन तात्यांना हा निर्णय येथे लिहायला भाग पाडल्याबद्दल तुमचे सुद्धा अभिनंदन!
तात्या, तुमच्या प्रमाणे लोक असे निर्णय घेऊ लागले तर रस्ते बरेच स्वच्छ दिसतील हो. बाकी तुम्ही पान खाणे बंद करणार की थुंकणे? खाणे बंद नका करू... कारण उगीच त्या बिचार्या पानावाल्यांचा धंदा बसेल. आधिच मंदीचे दिवस अन त्यात घंदे बंद... अंमळ वाईट चित्र आहे. :) त्यापेक्षा पान खा पण न थुंकण्यावर ठाम रहा.
आपला,
(पान आवडूनही थुंकणे आवडत नसल्याने ते न खाणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/05/2008 - 03:39
नवीन
तुम्ही ताकाला जाऊन भांडे का लपवताय? तुमचे प्रश्न वाचून हे प्रश्न तात्यांच्या रोखाने होते हे कोणीही मिपाकर सांगेन.
अहो चलता है! तात्याला व्यक्तिगत रोख ठेऊन टारगेट करणे हा बर्याच मंडळींचा आवडता छंद आहे! कोलबेरला वाटलं की पान खाऊन थुंकायच्या संदर्भातले छुपे प्रश्न विचारले की तात्या अडचणीत येईल! पण झालं भलतंच! त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला मला अर्धा मिनिटही लागलं नाही! :)
पण कलंत्रींनी मात्र याच पद्धतीने, प्रांजळपणाने माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं टाळलं आहे. मी केलेली कृती योग्य आहे म्हणावं तर गांधीवाद अडचणीत येऊ शकतो आणि अयोग्य आहे म्हणावं तर स्वत: कलंत्रीच अडचणीत येऊ शकतात हे त्यांना पक्के ठाऊक आहे म्हणून ते उत्तर देण्याचे टाळत आहेत..! ;)
असो..
तात्या.
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Fri, 12/05/2008 - 19:32
नवीन
पण कलंत्रींनी मात्र याच पद्धतीने, प्रांजळपणाने माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं टाळलं आहे. मी केलेली कृती योग्य आहे म्हणावं तर गांधीवाद अडचणीत येऊ शकतो आणि अयोग्य आहे म्हणावं तर स्वत: कलंत्रीच अडचणीत येऊ शकतात हे त्यांना पक्के ठाऊक आहे म्हणून ते उत्तर देण्याचे टाळत आहेत..!
यामुळेच तर मी थक्क होतो. ते चिकाटीने त्यांचे एकांगी विचार टंकीत असतात पण अशा प्रश्नांना एक तर उत्तरे देत नाहीत वा द्यायची वेळ आलीच तर विषयांतर करतात व काहीतरी दुसरेच बरळतात नव्हे आपल्यालाच गोल-गोल फिरवायचा प्रयत्न करतात. त्यांचा हा अनुभव २००५ पासून घेत असल्याने मला तरी त्यांच्या या वागण्याने आश्चर्य झाले नाही. वैषम्य मात्र वाटते.
दुसरा एखादा धागा सुरु होऊ द्यात व काहीही प्रश्नांवर चर्चा होऊ द्यात. कलंत्री साहेब आलेच समजा तेच जुने तुणतुणे वाजवत. आणी पुन्हा अशी उत्तर द्यायची वेळ आली की चिडी चुप!
आपला,
(तथाकथित गांधीवाद्यांच्या गुळगुळीत व गोलगोल वक्तव्यांनी त्रस्त) भास्कर
आम्ही येथे वसतो.
- Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल
Fri, 12/05/2008 - 23:54
नवीन
>>मी तात्या अभ्यंकर. मला पान खाऊन रस्त्यात थुंकायची सवय आहे. वर वर मी त्याचे समर्थनही करतो. परंतु मनापसून आणि प्रांजळपणे सांगायचे झाल्यास माझी ही सवय अत्यंत चुकीची, आणि अन्-हायजिनिक आहे! आणि त्याबाबत मला शरम वाटते. मी लौकरच ही सवय बदलायचा प्रयत्न करीन!
गांधीवाद सावरकरवाद ह्यापैकी कसल्याही वादांच्याबाबतीत आमचे ज्ञान शुद्ध बैल म्हणावे इतपतच आहे.
तरीही आज पहिल्यांदा हृदय परिवर्तन का काय म्हणतात ते प्रत्यक्ष बघायला मिळाल्याने आमी धन्य झालो
तात्या ह्या निर्णयाबद्दल हाबीणंदन!!
_/\_
बैलोबा.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 12/05/2008 - 02:53
नवीन
प्रष्न विचारले. उत्तर कुठे आहे.
अवांतरः इथे भारी विनोद होउन राहीले की हो तात्याबा. जगातले बहुतेक खुन, मारामा-या ,गोळीबार स्पॉन्टेनियसली होतात. हे माहित नव्हते हो.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Fri, 12/05/2008 - 03:39
नवीन
मी जर तात्या असेल तर पर्याय क्र. १ च वापरेल. ( कारण शक्ती असेल तर हिंसेने प्रश्न लवकर सुटतात.).
अवांतर : मी जर कलंत्री सारखा विचारांच्या जंजाळात अडकणारा असेल आणि परत प्रत्येक गोष्टीमागे तत्त्वज्ञान शोधणारा असेल तर,
दुसर्या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/05/2008 - 03:55
नवीन
कलंत्रीसाहेब,
आपण पुन्हा गोंधळ करताय. कलंत्री म्हणून आपण काय कराल हे मी विचारलेले नाही किंवा आपण जर तात्या असतात तर आपण काय केले असते हेही मी विचारलेले नाही!
तात्याने केलेली कृती आपल्याला योग्य वाटते की अयोग्य वाटते इतकेच फक्त मी आपले व्यक्तिगत मत विचारलेले आहे.
मला त्याचे कलंत्रींच्या व्यक्तिगत मतानुसार त्याचे 'योग्य' अथवा 'अयोग्य' असे उत्तर अपेक्षित आहे!
तात्या.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 12/05/2008 - 07:25
नवीन
>>दुसर्या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल.
हे अजिबात पटणारे नाही!! माफ करा श्री. कलंत्री, पण हा धादांत पळपुटेपणा आहे!! तुमच्या बहिणीने स्वरक्षणार्थ सज्ज असावे हाच यातून एक निष्कर्ष मला काढता येतो! समजा राखी घेऊन आलेल्या बहिणीची परत गुंडाने छेड काढली तर?? मग काय करायचे?? आणि छेड काढणार्या व्यक्तीला भाऊ मान असे सांगताना बहिणीच्या मानसन्मानाची काही पर्वा नाही का???
आणि बहिणीने आपली छेड काढणार्या व्यक्तीला का म्हणून राखी बांधावी?? हिंदी सिनेमा आहे की काय??
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/05/2008 - 07:27
नवीन
समजा राखी घेऊन आलेल्या बहिणीची परत गुंडाने छेड काढली तर?? मग काय करायचे?? आणि छेड काढणार्या व्यक्तीला भाऊ मान असे सांगताना बहिणीच्या मानसन्मानाची काही पर्वा नाही का???
सहमत आहे!
असो..! आता आपण जास्त काय बोलत नाय बा! नायतर पुन्हा पुळक्यांचे पूर यायचे! ;)
आपला,
कोलबेर अभ्यंकर.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Fri, 12/05/2008 - 16:48
नवीन
यशोधराजी,
यात पळपुटेपणा कोठे आला? त्या गुंडात आणि आपल्या बहिणीमध्ये आपल्याला आदर्श भाऊ-बहिणीचे नाते थोडेच प्रस्थापित करावयाचे आहे? लोकांना गोळा करुन अप्रत्यक्षपणे आपण त्या गुंडाचा पाणउताराच करीत असतो की नाही? समजा त्याने परत बहिणीचा पाणउतारा केला तर इतर उपाय आहेच की.
आपले आयुष्य अखंडित आहे. एखाद्या प्रसंगाने, चुकीने, वाईट अनुभवाने सगळेच सार काढण्याचा मी विरुद्ध आहे.
पूर्वी असे उदाहरण देत आणि काथ्याकूट करीत असत. जसे सर्प आणि रज्जु उदाहरण. आपण असे धार्मिक पुस्तकात असे संवाद वाचले तर यातील फोलपणा लक्षात येईल.
असो.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 12/05/2008 - 18:01
नवीन
कलंत्रीजी, मुळात ज्या गुंडाकडून बहिणीची छेड काढली जाते, त्यालाच आता तू राखी बांध हे सांगणे योग्य आहे का? आणि त्यांच्यात, आदर्श सोडूनच द्या, पण दाखवण्यापुरते बहिण भावाचे नाते तरी कशासाठी तिच्यावर लादायचे? कोणाही स्त्रीला हे विचारुन पहा, की हे तिला मान्य असेल का? माझ्या मते तरी असणार नाही.
म्हणजे केवळ आपली मते जपायची आणि नसलेल्या वा असलेल्या शक्तीचे प्रदर्शन नको वा चार लोकांसमोर फजिती नको (शक्ती - हिंम्मत नसल्याने) यासाठी बहिणीचा मानभंग झाला तरी चालेल काय?? हा मानसिक पळपुटेपणाच आहे.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/05/2008 - 18:39
नवीन
हे म्हणजे यशोधरा म्हणते तसं अगदी हिंदी चित्रपटासारखंच आहे. अगदीच टोकाला जाऊन हिंदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीवर बलात्कार केला तर त्याची "शिक्षा" म्हणून त्या दोघांचं लग्नं लावून देणं हे ही मान्य करायचं का?
... यासाठी बहिणीचा मानभंग झाला तरी चालेल काय?? हा मानसिक पळपुटेपणाच आहे.
+1
कोणी फक्त(!) काही अश्लील बोलला म्हणून स्त्रीचा मानभंग, अपमान होत नाही; शक्ती आणि हिंमत नसेल विरोध करायची तर तिथून सरळ निघून जावं, पण राखी बांधायला लावणं यासारखा तर त्या स्त्रीचा अपमान नाही.
- Log in or register to post comments
श
शितल
Fri, 12/05/2008 - 17:19
नवीन
>>>दुसर्या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल.
राखी बांधुन घेणार्याच्या मनात ही आपली बहिण आहे, तीच्या शीलाची रक्षा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव करून देते, ज्या व्यक्तीला स्त्रीच्या स्त्रीत्वाचा आदर नाही त्या व्यक्तीला कोणतीही स्त्री भावाचा दर्जा देणार नाही.
हे समस्त स्त्री वर्गास त्या दुबळ्या आहेत हे दाखवुन दिल्या सारखे आहे.
मी तर म्हणते अशा कोणत्या गुडांने कधी छेड काढली तर भावाची ही वाट न पहाता त्याला , तु़ला तु़झ्या घरीच हेच शिकवतात का विचारून, सॅन्डलने मारावे, अजिबात मानहानी वाटुन घेऊ नये, आणि भावाला त्या गुंडाला मारण्यात मदत करावीच .
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Sun, 12/07/2008 - 07:01
नवीन
वा कलंत्री साहेब वाह! क्या बात है!! :)
कारण शक्ती असेल तर हिंसेने प्रश्न लवकर सुटतात
व्यत्यास - हिंसेने प्रश्न सोडवण्याची कुवत अशक्त माणसांत नसते.
अर्थात - अशक्त माणसे अहिंसेच्या नावाखाली पळपुटेपणा लपवतात. ;)
भावार्थ - शक्ती असेल तर हिंसेने प्रश्न लवकर सुटतात म्हणून प्रश्न लवकर सोडवण्यासाठी शक्तिवान बनावे व प्रश्न सोडवावेत. :)
धन्यवाद कलंत्री साहेब!
आपला,
(कृतकृत्य) भास्कर
आम्ही येथे वसतो.
- Log in or register to post comments
प
पक्या
Fri, 12/05/2008 - 03:57
नवीन
तात्यांची कॄती योग्य वाटते. फक्त मारहाण जीवावर बेतणारी नको उलट त्या गुंडाला जरब बसेल आणि असले कृत्य करण्यास तो पुन्हा धजावणार नाही इतपत .
कलंत्री यांच्या उत्तराची मला ही उत्कंठा आहे.
मला वाटते तात्यांच्या म्हणण्यातील मतितार्थ लक्षात न घेता भलेभले मिपाकर फक्त शब्दांचा किस पाडत आहे.
तात्यांनी स्वतःवरील प्रसंग न सांगता असे विचारायला हवे होते की कलंत्री साहेब त्यांच्या बहीणीबरोबर रस्त्यावरून जात आहेत आणि वरील प्रसंग उद् भवला तर ते गांधीवादी विचार अमलात आणतील की त्या गुंडाला तिथल्या तिथे धडा शिकवतील.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Fri, 12/05/2008 - 16:55
नवीन
शेवटी सारासार विचार करुनच सगळ्या गोष्टी करावयाला लागतात की नाही?
कधी पडते घेऊन तर कधी हमरीतुमरीवर येऊन प्रश्न सोडवावेच लागतात.
न अतिका गिरना ना अतिकी धुप, न अतिका बोलना ना अतिकी चुप.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 12/05/2008 - 17:21
नवीन
कधी पडते घेऊन तर कधी हमरीतुमरीवर येऊन प्रश्न सोडवावेच लागतात.
हा हा हा
आवडला आम्हाला आपला गांधीवाद. मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्यांना गांधीवाद पेलवला नाही याचे कारण गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे होते. म्हणूनच गांधींजींची चळवळ जोरात फोफावत असतांना बहुसंख्य तरुण गांधीविचाराला भारुन या चळवळीकडे जसा आकर्षीत होत होता, तसाच त्यांच्या ध्येयधोरणाविषयी अनेकांना गांधी चळवळ अव्यावहारिक व एका समाजाला झुकते माप देणारी अशी वाटत होती त्याच बरोबर त्यांच्या र्दयपरिवर्तनाचा मार्ग अव्यावहारिक असल्याचे अनेकांचे मत होते.
वरील तात्यांच्या उदाहरणात गांधीविचारांनी उत्तरे अशी असली असती, माझा एक तर्क....
स्त्रीत्वावरुन शिव्या देण्यार्याचे र्हदयपरिवर्तन करणे. ( सभ्य, सुसंस्कृत समाज निर्माण करायचा )
आणि बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल यासाठीही तिचेही र्दयपरिवर्तन करणे.
आणि दुर्दैवाने गांधीविचाराला विरोध करणार्यांना या गोष्टी कधीच झेपल्या नाहीत. म्हणून त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही कृती अनेकांना योग्य वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Fri, 12/05/2008 - 17:52
नवीन
>> मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्यांना गांधीवाद पेलवला नाही याचे कारण गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे होते. <<
म्हणजे?
>> म्हणूनच गांधींजींची चळवळ जोरात फोफावत असतांना बहुसंख्य तरुण गांधीविचाराला भारुन या चळवळीकडे जसा आकर्षीत होत होता, तसाच त्यांच्या ध्येयधोरणाविषयी अनेकांना गांधी चळवळ अव्यावहारिक व एका समाजाला झुकते माप देणारी अशी वाटत होती त्याच बरोबर त्यांच्या र्दयपरिवर्तनाचा मार्ग अव्यावहारिक असल्याचे अनेकांचे मत होते. <<
असेलही तसे.. पण जगामध्ये गांधीविचाराला जो मान आहे तो कसा काय?..
तात्यांच्या प्रश्नाला माझी उत्तरे
१) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का?
हो वाटते.
२) आणि माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?
हो वाटते.
३) की मी काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे माझ्या बहिणीला तिथल्या तिथे न्याय मिळेल आणि ती मान उंचावून रस्त्याने चालू शकेल?
तसे पर्याय म्हणजे त्याला न तुडवता जरबेत घेणे आणि सर्वांसमक्ष बहिणीची क्षमा मागायला लावणे. म्हणजे बळाचा वापर आलाच. किती करावा हे आपल्या शक्तीवर ठरवावे.
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 12/05/2008 - 18:36
नवीन
>> मध्यमवर्गीय आणि सुखात राहणार्यांना गांधीवाद पेलवला नाही याचे कारण गांधीविचारांची तत्वे सांगणे अतिशय सोपे होते. <<
म्हणजे?
असे की, गांधीविचारांची जी वैशिष्टे म्हणता येईल त्यात-
'सर्वांना सारखेच सुख व समाधान मिळणे व पोटभर अन्न मिळणे' हे सांगणे सोपे पण त्यांच्यासाठी स्वतःच्या सुखाच्या तुकड्यातून भुकेल्यांना काहीही न देता येणे. 'मानवाच्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करायच्या मात्र चैन करायची नाही' हे सुखी माणसाला जमणारे नव्हते.ग्राम सफाई, अस्पृश्यता निवारण, समाजात विषमता नसणे, या गोष्टी सुखात राहाणारा केवळ बोलू शकत होता. प्रत्यक्षात त्यावर काम करणे हे शक्य होत नव्हते. म्हणजे गांधी विचार अनेकांच्या अंगी मुरला होता पण प्रॅक्टीकली त्यातले काहीच नव्हते. खरे तर त्यांच्या याच विचाराने खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या सर्वोदयाची जी काही कलमे होती त्याचा प्रभाव उमटला त्याला कारण त्यांचे विचार असतीलही, पण त्यांचे साधुशील व्यक्तित्व होते. त्यांच्या सुदैवाने टिळकांच्या मृत्युनंतर राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व गांधी यांच्याकडे आले. ते थोर समाजचिंतक जसे होते तसे ते अध्यात्मिकही होते त्याचाही प्रभाव जनसामान्यांवर पडला होता. त्याचबरोबर भारतीय समाजाची पुनर्चना कशी केली पाहिजे याचा विचार त्यांनी ' हरिजन' व ' यंग' या साप्ताहिकामधून मांडला हे सर्व विचार तेव्हा काहींना प्रगतीवादी,परिवर्तनशील वाटले. त्याचबरोबर...जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी केलेले असहयोगाचे आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, या आणि अशा काही घटनांनी गांधीविचाराबद्दल कुतूहुल निर्माण झाले आणि त्यापुढे सर्वोदयाच्या विचाराबद्दल आदर निर्माण झाला असावा असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Fri, 12/05/2008 - 18:39
नवीन
सर.
उत्तराबद्दल आभार.
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 12/05/2008 - 19:07
नवीन
विश्लेषणाशी सहमत आहे.
अगदी!
अर्थात हे म्हणणे सोपे आहे, म्हणजेच
पण प्रत्यक्षात आणणे अवघड, आणि त्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तयारी किंवा इच्छा नसल्यामुळे,
आणि
हे अतिशय पटण्यासारखे.
'अव्यावहारिक' याचा अर्थ येथे 'आपल्या आवाक्याबाहेरचे'पेक्षासुद्धा 'आपल्याला जे करण्याची इच्छा नाही' असा असावा. (अर्थात हा मानवी स्वभाव आहे.)
'एका समाजाला झुकते माप' हा आरोप चळवळीमागची भूमिका ज्यांना कळली नाही अथवा ती कळून घेण्याची ज्यांना इच्छा नव्हती अशांकडून असंख्य वेगवेगळ्या संदर्भांत केला गेला. अर्थात चळवळीमागचे सामर्थ्य, भूमिकेमागील सच्चाई आणि अशा विचारसरणीची गरज ज्यांना कळली ते अशा आक्षेपांना महत्त्व न देता चळवळीकडे आकर्षित झाले आणि म्हणूनच चळवळ फोफावली आणि याच कारणांस्तव गांधीविचारांना आज जगात मान आहे.
अर्थात 'गांधीवाद' किंवा 'अहिंसावाद' म्हटल्यावर गांधीविचारांचे जे एक अत्यंत विटंबित स्वरूप आज आपल्याला समजते त्याचे श्रेय गांधीविरोधकांइतकेच गांधीविचारांचा स्वतःला सोयिस्कर असा अर्थ लावून स्वतःची पोळी भाजणार्या स्वतःला 'गांधीवादी' म्हणवणार्या राजकारण्यांकडेही आहे.
(अवांतर: आपल्या विचारसरणीला 'गांधीवाद' किंवा 'गांधी-इज़्म' म्हणवले जाऊ नये - आपण हिंदुपरंपरेत जे काही सांगितले आहे त्यापेक्षा वेगळे काहीच सांगत नाही आहोत - अशी खुद्द गांधींची भावना असल्याबद्दल वाचल्याचे आठवते. त्या अनुषंगाने 'गांधीवादा'ऐवजी 'गांधीविचार' हा शब्दप्रयोग आवडला.)
- Log in or register to post comments
क
केदार
Fri, 12/05/2008 - 18:58
नवीन
दुसर्या दिवशी बहिणीला एक राखी देईल आणि सर्व आजूबाजुच्या लोकांना एकत्र बोलावेल आणि त्या गुंडाला राखी बांध असे सांगेन. शक्यता आहे की माझा आणि इतरांचाही प्रश्न सुटु शकेल >>>>
कलंत्री साहेब तूम्ही त्या गूंडाला मारवे की नाही ह्या बाबत मी काही बोलनार नाही. तो तूमचा निर्नय. पण तूम्ही जे लिहील त्यावर प्रतिक्रिया द्याविच लागेल.
मूळात त्या गुंडाला एखादी सक्खी, मावस, चूलत बहिन असन्याची शक्यता नाकारता येत नाही मग आधीच बहिन असताना देखील तो छेड काढतो, मग ह्या फाल्तू राखीचे काय ते महत्व? आणी गुंडानां आया बहिनी नसतात असा तर तूमचा समज नाही ना? एखाद्या मानलेल्या बहिनीकडे पाहून तो उमाळा येउन छेडने थांबवेल हे समजने म्हणजे ??? मुन्नाभाई एम बी बी एस ला वास्तव समजल्यामूळे ही गफलत.
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Fri, 12/05/2008 - 19:34
नवीन
तात्या !!!!!!!!!!!!!
तुमच्या बहीणीच रक्षण करायला तुम्ही खमके आहात्......................
पण आमच्या सारख्या भाऊ नसलेल्या स्त्रियांनी अश्या प्रसंगी काय करायच राव!
आमच रक्षण करायला कोणता कृष्ण धावुन येणार?.......देवाने हात हा अवयव हा फक्त ठराविक कामांसाठीच दिलाय का माणसाला?योग्य वेळी त्याचा वापर करायला लागतोच की .?गावगुंडांना बुकलुन काढायची क्षमता नसेल कदाचित आमच्यात पण दोन सणसणीत कानशिलात हाणून भर दिवसा तारे दाखवण्याची ताकद असायला हवीच की प्रत्येक स्त्री मधे
काय बिशाद लागुन गेली आहे कुणाची वाटेस जायची. :>
अश्या प्रकारचा प्रसंग कुणा स्त्रीवर कधी ओढवु नये खर पहाता.पण तरी वेळ आलीच तर मात्र..................
तुम्ही निवडलेला पहिला पर्याय एकदम योग्य.
माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?
याचे उत्तर म्हणजे त्या मवाल्याची तुम्ही केलेली पुजा सफल झाल्यावर बहिणीच्या हस्ते त्याची उत्तर पुजा देखिल तेथेच घालुन घ्यावी.कसें!
आणि असल्या मुर्ख लोकांच्या बाष्कळ बडबडिकडे लक्ष देऊन आपली मान खाली घालण्याचे कुठल्याही स्त्रीला कारणच काय?
"अनामिका"
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Sat, 12/06/2008 - 16:12
नवीन
वाखाणण्याजोगी आहे!
द्वारकानाथजी अडचण करणार्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत हे माहित असतानाही तु विचारतो आहेसः).
यांच्या क्र. २ च्या लेखात मी काही प्रश्न विचारले होते. सारे मिळुन जेमतेम ५-६ ओळी. पण साहेबांनी उत्तर देणे टाळले वर प्रश्न पुन्हा विचारा असे सांगितले. असो. गेली अनेक वर्षे आपण त्यांचे निरूतर होणे पाहत आहोतच.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Sat, 12/06/2008 - 16:24
नवीन
सर्वसाक्षी,
परत एकदा विनंती, कृपया आपली प्रश्ने विचारा.
समस्या अशी आहे की तुम्हाला तुमच्याच शब्दात उत्तरे हवी आहेत ती जगातील कोणालाही देणे शक्य नाही. तरी एकदा परत प्रश्न विचारा आणि त्यावर पडदा पाडा.
द्वारकानाथ
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Sat, 12/06/2008 - 16:37
नवीन
उगाच निमित्त् कशाला सांगता.
मी माझ्या शब्दात उत्तर द्या असे म्हटले नाही, उगाच वाचकांची दिशाभूल करु नका. आपण उत्तर दिले आहेत तर ते दाखवा आणि ते दिले असूनही मी असत्य कथन करीत असेल तर तसे दाखवुन द्या - हा सूर्य हा जयद्रथ! हे तुमचे उत्तर आणि हा त्याला माझा प्रतिसाद की तुमच्या नको माझ्याच शब्दात उत्तर हवे असा. कृपया दाखवुन द्या.
उत्तर द्यायचे असेल तर प्रश्न आपल्याला दिसतीलच.
असो. आपल्या प्रश्नातच आपले उत्तर मिळाले.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Sat, 12/06/2008 - 16:47
नवीन
प्रिय सर्वसाक्षी,
तुमच्या जुन्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. तरी पण तुम्ही जर प्रश्न परत विचारले तर मी माझ्या प्रामाणिकपणानेच उत्तर देईल असे परत एकदा लिहितो.
या उप्पर तुमची मर्जी.
सस्नेह,
द्वारकानाथ कलंत्री
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2