Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बस करा वृद्धांचे फालतू लाड

क
कोंबडी प्रेमी
Tue, 11/16/2021 - 18:14
💬 83 प्रतिसाद
वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय . ६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत. वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे. आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये. आणि हल्ली अशी भरपूर उदाहरणे दिसत आहेत. स्वतःचा पैसा हक्क अधिकार वगैरेंबाबत १०० टक्के जागरूक आहेत (आणि तसे असावेत सुद्धा) पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये हि अजिबात जाणीव नाही. मुले बाळे नसलेले एकेकटे वृद्ध जरा इतरांशी जुळवून घेतात परंतु ते तेवढंच. स्वतःच्या मोठेपणा पायी जवळच्यांना यथेच्छ वापरून घेणारे वृद्ध हे एक अनिष्ट पायंडा पडत आहेत. अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील
आज फेसबुक वर एक पोस्ट वाचली आणि त्यातील एक वाक्य मनात रुतून बसले आहे बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"
काय वाटतंय कसे हाताळायचे हे वृद्ध ??

प्रतिक्रिया द्या
30447 वाचन

💬 प्रतिसाद (83)
स
सुबोध खरे गुरुवार, 11/25/2021 - 07:16 नवीन
@ तिमा साहेब आम्ही सर्व वृद्ध म्हणजे भुईला भार आहोत. मुळात वृद्ध याची व्याख्या काय? केवळ वय वाढले म्हणून माणूस वृद्ध होत नाही. दुर्दैवाने माझा प्रतिसाद संपादित करण्याच्या ऐवजी काढून टाकला गेला. त्यात वर श्री फडके यांच्या बेजबाबदार विधानाचा परामर्श घेतला होता त्यातील अनेक चांगले मुद्दे काढून टाकले गेले हे दुर्दैव. मी असंख्य माणसे पाहत आलो आहे जी वयाच्या ४०-४५ पासून काहीच करत नाहीत. अशी माणसे खरोखर खायला काळ आणि भुईला भार असतात याउलट कायदे आणि वैद्यकीय क्षेत्रात माणसे चाळिशीनंतरच "तयार" होतात. मी आज असंख्य डॉक्टर आणि कायदेतज्द्न्य पाहतो आहे जे वरिष्ठ नागरिक आहेत परंतु त्यांचा समाजाच्या उन्नतीसाठी असलेला सहभाग अतुलनीय आहे. मी आमच्या वडिलांची गेल्या २५ वर्षात झालेली समाजसेवा पहात आलो आहे. ( त्यातले काही भाग मी संपादित झालेल्या प्रतिसादात लिहिले सुद्धा होते) आणि ते काहीच करत नाहीत असे वाटावे असे असंख्य वरिष्ठ नागरिक सर्व क्षेत्रात काम करत आहेत. काही माणसे केवळ तुमच्या नंतर काही वर्षांनी जन्माला आली म्हणून त्यांना वरिष्ठ नागरिकांना वाटेल ते बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो काय? तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका. केवळ कळफलक बडवता येतो म्हणून बडवणारी माणसे कमी नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 11/25/2021 - 16:07 नवीन
काही माणसे केवळ तुमच्या नंतर काही वर्षांनी जन्माला आली म्हणून त्यांना वरिष्ठ नागरिकांना वाटेल ते बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो काय? ..केवळ कळफलक बडवता येतो म्हणून बडवणारी माणसे कमी नाहीत....
तुम्ही उल्लेखिलेला फडके यांचा मूळ प्रतिसाद अतिशय असंवेदनशील, भंपक आणि शरम वाटावी असा होता. यावर लिहावे तितके थोडेच आहे. आपल्यापैकी काही मंडळी असा विचार करतात यातून एकंदरित समाजातील वैचारिक घसरण आणि असंस्कृत बेजबाबदारपणा दिसून येतो. जरा डोळे उघडून बघितले तर साठीच्या पुढले अगणित स्त्रीपुरुष कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदार्‍या अतिशय तडफेने, डोळसपणे, उत्तम रीत्या पार पडत असल्याचे दिसून येते. धागाकर्त्यानेही विचारले आहे: कसे हाताळायचे हे वृद्ध ??
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 11/25/2021 - 16:46 नवीन
पण सुबोध "भावे" वेगळे आणि सुबोध "खरे" वेगळे. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त गुरुवार, 11/25/2021 - 17:00 नवीन
खरेच की. मला खरेतर खरेच लिहायचे होते. चूलआदिबध.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित गुरुवार, 11/25/2021 - 18:07 नवीन
आमचं म्हातारं 76 वर्षाचं आहे पण अजून गोवा to पुणे असा प्रवास दिवसभरात कार चालवत मारतंय. म्हातारी पण अजून सगळं साग्रसंगीत करत असती ते म्हणतात ना पुरणावरणा चा स्वयंपाक ते करत बसती. काम नसलं की सैरभैर होतात म्हातारा म्हातारी. पूर्वीची सगळी लोकं नुसती बसून राहिली की कामातून गेली समजा ( आपली पण तीच अवस्था होणारे)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 11/26/2021 - 03:23 नवीन
हे लै डिप्रेसिंग होऊ लागलं आहे, खासकरून आमचा जॉली ओल्ड मॅन समोर मजेत पेपर वाचत गवारीच्या शेंगा निवडत अन नातवंडाशी खेळत सुखात मल्टीटास्क करताना पाहत हे वाचणे फारच डिप्रेसिंग आहे, उगाच आपल्या देवतुल्य ७३ वर्षाच्या बापाला शिव्या घातल्यागत घाण गिल्ट फील आले हे वाचून, काहीतरी सोक्षमोक्ष लावा पण धागा दाबा राव हा.

ध्याग्यावर चार शब्द बोलायचेच ही रीत सांभाळता

सगळीच म्हातारी सगळ्याच बाबतीत सदासर्वदा हेकट असतील ही लैच रेयर केस झाली हो, पण एकंदरीत म्हाताऱ्या कोताऱ्यांचे काही ट्रिगर पॉईंट्स असतात, उदाहरणार्थ आमचे तीर्थरूप एका नातलगाकडे राहून शिकले कारण माझे आजोबा वडिलांच्या बालपणीच वारले ज्यांच्याकडे होते त्यांची मुले चपला घालून आणि आमचे पिताजी (सापत्न वागणुकीपोटी) अनवाणी ते कुठंतरी खोल बसलं आहे त्यांच्या मनात, आजही अगदी घरच्या बागेत असलो तरी पायात चप्पल घाला म्हणून ओरडतात किंवा सरळ दणका घालतात बारकं पोरगं असलं तर पण बॅकग्राऊंड माहिती असल्यामुळे आम्ही ऍडजस्ट करतो. वृद्धांना अडगळ समजणे चूक आहे, मला तरी चूक वाटते, त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल असतात, प्रसंगी त्यांचे घरात असणेच मदतगार असते. इत्यलम.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 11/26/2021 - 04:23 नवीन
हे आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 11/26/2021 - 05:33 नवीन
तुमच्या दोन शब्दांचा पण चक्क आधार वाटला. असो असतात म्हातारी हेकट म्हणून का इतका पिट्ट्या पाडून दुस्वास करावा का त्यांचा ? अगदी दुर्लक्ष करण्याचे ठरवले तरी एकंदरीत धाग्याचे शीर्षक चक्क डोक्यात जाणारे आहे. वाटेल तसे लिहिले आहे त्यात, एखाद्याला वैयक्तिक त्रास होत असेल घरातल्या वृद्धांचा हे अगदी मान्य पण त्यासंबंधी पब्लिक फोरमवर इतकं तुसडं अन रागीट लिहिणं पटत नाही पटणार नाही एकतर lack of communication दिसते, बरं असलाच प्रॉब्लेम तर खऱ्या आयुष्यातील मित्र सहकारी पत्नी सगळ्यांशी बोलता येते, हे पर्याय उपलब्ध नसल्यास आधी स्वतःचे सोशल नेटवर्किंग काय ते तपासावे, हे असे वैयक्तिक प्रश्न चक्क चव्हाट्यावर आणणे पटत अन मानवत नाही बुआ आपल्याला तरी. आता ह्याबद्दल मला शिव्या घालायच्या असल्या तरी घाला पण ह्या धाग्यावर हीमाशेपो. आमचं म्हातारं पाहून भडभडून आलं एकदम असलं काहीतरी वाचून, आता संध्याकाळी मस्त दोनचार बांगडे तळतो, चार चिल्ड बिअर आणतो अन म्हाताऱ्यासोबत बसून जरा हा मानसिक श्रमाचा परिहारच करून टाकतो कसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
स
सॅगी Fri, 11/26/2021 - 07:13 नवीन
आता संध्याकाळी मस्त दोनचार बांगडे तळतो, चार चिल्ड बिअर आणतो अन म्हाताऱ्यासोबत बसून जरा हा मानसिक श्रमाचा परिहारच करून टाकतो कसा.
शुक्रवार साजरा करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा वांड दादा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 11/26/2021 - 07:23 नवीन
&#127866 &#127866 &#127866
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी
र
राघव Fri, 11/26/2021 - 10:15 नवीन
खरंय. काही लोकांस त्रास होतही असेल आणि ते त्यांच्या जागेवर कदाचित काही बाबतीत योग्यही असतील.. पण सरसकटीकरण करणं अजिबातच संयुक्तिक नव्हे. फडके महाशयांचा प्रतिसाद वाचायच्या आधीच संपादित झाल्यामुळं नक्की काय वाईट लिहिलं ते समजलं नाही, पण ज्याअर्थी एकदम एवढे कडक प्रतिसाद आलेत म्हणजे नक्कीच असंवेदनशील असणारंय. काय बोलायचं. असो. पुन्हा तेच वर लिहिलेलं उद्धृत करावंसं वाटतं.
असतात म्हातारी हेकट म्हणून का इतका पिट्ट्या पाडून दुस्वास करावा का त्यांचा ?
आणि म्हातारेच का, आपणही स्वतः कमी हेकट नसतो की. जे गुण दुसर्‍यात आपल्याला दिसतात, ते आपल्यात असतातच. त्यामुळे उगाच आपल्या म्हातार्‍यांना काही बोलायची गरजच नाहीये. अर्थात् मोठ्यांना समजावणं ही एक कठीण गोष्ट असते. बरेचदा ते लवकर ऐकत नाहीत. पण त्यात नुसता हेकटपणाच असतो असं नाही! :-) गृहित धरलेलं कुणालाही आवडत नाही मग ती व्यक्ती म्हातारी नसो किंवा असो. त्यामुळे आपल्याशी कुणी कसं वागलेलं आवडेल असा विचार करून तसं आपण दुसर्‍याशी वागायचा प्रयत्न ठेवायचा, बर्‍याच गोष्टी निवळतात. खरंतर घरात कुणी मोठं नसतं ना, तेव्हा ती पोकळी फार त्रासदायक असते. मला तरी बुवा घर आपल्या माणसांनी भरलेलं आवडतं! :-) सोय काय हॉटेलातही होते आणि हॉस्पिटलातही! मग घरात असं वेगळं काय असतं? आपलेपणाचा ओलावा. तो नसला की रूक्षता येते. घरात प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वतःहून सहभाग असला ना, की त्या व्यक्तीला ते घर आपलं वाटायला लागतं. हा आपलेपणा घरात ओलावा आणतो. त्यात वर म्हणतोय तसं, समजूतदारपणा असला सगळ्या व्यक्तींमधे तर घरात आनंदाला पारावार उरत नाही. बाकी प्रत्येकाची आवड, स्वभाव हे वेगळे असणारच आणि त्यामुळे थोडं इकडे-तिकडे चालणारच, पण लगेच त्यावर तलवारी उपसून सोल्यूशनिंग करण्याची गरज नसते. एकमेकांना सांभाळून घेणं म्हणजे अजून काय वेगळं असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ग
गवि Fri, 11/26/2021 - 05:46 नवीन
त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल असतात, प्रसंगी त्यांचे घरात असणेच मदतगार असते.
अगदी सहमत. केवळ "आहेत" हा देखील आधार असतो. ज्यांनी अल्प वयात छत्र गमावले आहे त्यांना तर अधिकच कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Fri, 11/26/2021 - 06:17 नवीन
ज्यांनी अल्प वयात छत्र गमावले आहे त्यांना तर अधिकच कळेल.
&#128577 &#128577
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुबोध खरे Fri, 11/26/2021 - 06:55 नवीन
अल्प वयात कशाला हो? नुकतेच माझ्या ५६ व्या वर्षी वडील गेले ( त्यांच्या ८६ व्या वर्षी) तरी आज पोरकं झाल्यासारखं वाटतंय. कडक उन्हात चालताना डोक्यावरची छत्रीच काढून घेतल्यासारखं. "भारतीय संघराज्य विरुद्ध सर्जन कमांडर सुबोध खरे" या सर्वोच्च न्यायालयाच्या लढ्यात माझ्या पाठीशी असणारे एकमेव माणूस होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
र
राघव Fri, 11/26/2021 - 10:22 नवीन
खरंय. ती जाणीवही नको वाटते अगदी.. बाकी, आपले वरचे सर्व प्रतिसाद तीन-चार वेळा तरी वाचलेत. अतिशय अभिमानास्पद आहे सर्व. अशा व्यक्तीकडून शिकावं तेवढं कमीच. त्यांची ऊर्जाच सांसर्गिक असते म्हणा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हेमंतकुमार Fri, 11/26/2021 - 05:51 नवीन
वृद्धांना अडगळ समजणे चूक आहे
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सुरसंगम Fri, 11/26/2021 - 07:38 नवीन
आधार नाही तर आधारवड हा शब्द जास्त योग्य. त्यांचं नुसतं असणंच किती बळ देतो. धागा लेखकाने स्वतःच वय जाहीर करावे म्हणजे आम्ही त्यांच्या वृद्धवयोमानागमनार्थ आपण काय उपयोजना कराल हे त्यावेळी विचारू.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 11/26/2021 - 08:15 नवीन
अल खराब होता हा प्रतिसाद &#129315 &#129315 &#129315 &#129315
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम
च
चित्रगुप्त Fri, 11/26/2021 - 09:16 नवीन
आम्ही आणि आमची नातवंडे. अश्या बर्‍याच गंमती-जंमती चालू असतात. नातवंडांनातर आजी-आजोबा 'हवेच' असतात. Image removed.Image removed. Image removed. आता वयाच्या सत्तरीत आल्यावरही आपल्याला आपले आपले आजी-आजोबा कधी बघायलाही मिळाले नाहीत याचे वाईट वाटते. ते त्यांची मुले लहान असतानाच निवर्तले होते.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 11/26/2021 - 10:17 नवीन
हे ब्येश्ट आहे. खूप आवडले! कधी बघायला मिळणार प्रत्यक्ष असं वाटून आलं. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
अ
अत्रन्गि पाउस Fri, 11/26/2021 - 11:15 नवीन
किती सुंदर वाटतंय !! पिंड घडतात ते हे असे !!! बहोत खूब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/28/2021 - 07:51 नवीन
पीलू लै ग्गोड. तुमचा तर काही प्रश्नच नै. लंबर एक. आपण फॅन आहोत तुमचे. बाकी, मागील चित्रांचा पसाराही आवडला. विशेषतः असो. :) -दिलीप बिरुटे (चित्रगुप्त फॅन क्लब सदस्य) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
अ
अत्रन्गि पाउस Fri, 11/26/2021 - 10:53 नवीन
मूळ लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यावर काही टोकाच्या भूमिका जाणवतात आणि ह्या भूमिका हि मूळ समस्या आहे ! वै म
  • मी माझा स्वतंत्र
  • माझा कुणावर भार नाही
  • (तरुण असेल तर ) मी सगळ्यांना फाट्यावर मारतो
  • (वृद्ध असेन तर) मी माझी सोय लावली आहे ...मुलांना काडीचं करावं लागणार नाही सरळ वेगळा संसार मांडायला सांगीन
  • कुटुंबाला माझी गरज असेल तर येतील झक मारत
  • वृद्धापकाळ म्हणजे फक्त त्यांना समजून घ्या त्यांना सहानुभूतीची गरज आहे, का ? तर तुम्ही पण एक दिवस वृद्ध व्हाल
  • तरुण आहात का ? मग तुम्ही बेदरकार असणे स्वाभाविक आहे आणि तसे असाल तर तुम्हालाच फाट्यावर मारले पाहिजे
  • तुम्ही समोरच्याचे ऐकून घेत आहात का ?? मग घ्या कि ऐकून झाला त्रास तुम्हाला तर करा सहन कारण समोरच्याचा स्वभाव आहे तो ..तो बदलणार नाही कारण बदल तुम्ही स्वतः मध्ये घडवायचा असतो !!!
पण मुळात एका घरात २ किंवा जास्त पिढ्या ज्या पूर्वी राहत असत त्या हल्ली का राहू शकत नाहीत ? एक निरीक्षण असे कि गुजराती, मारवाडी शीख मुसलमान समाजांमध्ये घरात २ ३ पिढ्या संयुक्त कुटुंबे वगैरे सहज नांदतात ...आपल्या कडे काय प्रॉब्लेम येतो ??
डॉ खरेंचे प्रतिसाद मननीय !
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Fri, 11/26/2021 - 11:12 नवीन
खूप लोकांना माझ्या comments वाचून त्रास झाला (हे मला आज एका मित्राचा WA message आला तेव्हा समजलं), त्याबद्दल मी मनःपूर्वक दिलगीर आहे. मी मिसळपाव नियमित पाहात नाही म्हणून मला पत्ताच नव्हता आजपर्यंत. हे माझ्या हलगर्जीपणामुळे झाले. आत्ता बघितले तर माझे शेवटचे वाक्य 'बाकी नवीन पिढीबद्दल तक्रारी करीत राहणं हे आहेच', मग पुढचा भाग edit केला आहे. खरे तर त्यानंतर मी २-३ वाक्ये काहीशी - काहीशीच, कारण माझ्याकडे आता तो मजकूर नाही - खालीलप्रमाणे लिहिली होती. 'पण काय करावे, सांभाळून घ्यायलाच हवे, बरे वाईट, कमी अधिक असतेच. आपल्याकडे काही हिटलरचे राज्य नाही, काहीतरी जालीम उपाय करायला (नशीब!). तो म्हणाला असता... ' असे काहीतरी. मग पुढे ५-६ वाक्ये असावीत. गोची अशी आहे, की काय राहिले होते, काय उडाले, आणि काय edit झाले हे आता मला सांगता येणार नाही. त्या पोस्टमार्टेमला काही अर्थही नाही म्हणा. झाले असे, की मी तो मजकूर इकडून तिकडून टाईप करून (म्हणजे अर्धा मेलमध्ये, अर्धा नोट्स, इ. मराठीत टाईप करणे हा माझ्यासाठी त्रासदायक प्रकार आहे अजून) कॉपी-पेस्ट केला, आणि कधी नव्हे ते review न करता प्रकाशित करून टाकला. त्या भानगडीत ही वाक्ये गायब झाली. आणखीही काही गेली, शेवटची. But that cannot be an excuse. Self review cannot under any circumstance be bypassed. BTW, I am sixty nine, so I cannot be accused of carrying a chip on my shoulder against old people
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Fri, 11/26/2021 - 11:27 नवीन
सरसकटीकरण टाळलं जायलाच हवंय पण सगळीकडून ... मी लिहिलंय ते अलीकडे ऐकलेल्या पाहिलेल्या वाचलेल्या उदाहरणांवरून ! ह्यात कुणाला सत्यांश नाहीच असे म्हणायचे असेल तर अलाहिदा माझी मूळ चिंता पुन्हा मांडतो
अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/28/2021 - 07:47 नवीन
शेवटी ? -दिलीप बिरुटे (वृद्ध ) :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/28/2021 - 08:03 नवीन
'बस करा वृद्धांचे फालतू लाड' हे शीर्षक लैच भडक आणि डोक्यात जाणारे आहे, संपादन करुन त्याची तीव्रता कमी करायला हवी. जसे काही शासकीय नियम आणि कायद्यांमुळे प्रचंड लाड सुरु आहेत आणि त्याचा अतिरेक झालाय अशा स्वरुपाचे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 11/28/2021 - 10:59 नवीन
खुपचं असंवेदनशील शीर्षक आहे.माझ्यापेक्षा माझ्या ६ वर्षाच्या मुलीच्या जेवणाच्या सवयी तिच्या आजीलाच माहिती आहे. लहानपणी आपल्या आईवडिलांना जर "बस करतो ह्या पोटच्या पोरांचे फालतू लाड "असे म्हटले असते तर..उगाच वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चौकस२१२ Mon, 11/29/2021 - 00:52 नवीन
"शीर्षक लैच भडक आणि डोक्यात जाणारे आहे, " या पहिल्या भागाशी सहमत ... , ,पण यात शासन आणायची काहीच जरुरी नवहती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/29/2021 - 03:16 नवीन
>>>>पण यात शासन आणायची काहीच जरुरी नवहती ! का बरं ? तुम्हाला कोणा फेकाफेकी करणा-या आणि इच्छा नसतांना 'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने बेजवाबदार वागणा-या प्रवृत्तीची आठवण झाली काय ? तसे वाटत असेल तर, तसा समज करून घेऊ नये, माझा तसा कोणताही उद्देश नव्हता. खुलासा संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
उ
उन्मेष दिक्षीत Sun, 11/28/2021 - 19:50 नवीन
द फंक्शन अँड नॉट द रिलेशन हे उपयोगी होईल. त्यांची एखादी गोष्ट पटत नसेल तर नाही म्हणून सांगता आले पाहीजे. आणि तुम्ही वृद्ध झाल्यावर तसंच करु नका आणि त्यांच्याशी ते वृद्ध असल्याप्रमाणे वागू नका :P माझी आज्जी तिच्या सगळ्या मुलांपेक्षा आणि नातवांपेक्षा ही शार्प आहे , ९३ वय.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Wed, 11/15/2023 - 12:18 नवीन
वर आणतोय
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 11/15/2023 - 13:39 नवीन
https://www.misalpav.com/node/49602
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा