जे न देखे रवी...
तुझ्या घरातले अनारसे
Primary tabs
तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?
माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!
तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील
आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील
तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील
माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील
तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील
उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील...
हे काय आहे =))))
😀
अरे माझ्या देवा की दैवा !
जन्ता अजूनही अनारसे खाते ?
सध्या चहा आणि गोड दोन्ही बंद आहेत नाहीतर मला नक्कीच आवडल्या असत्या.
चावट मेले.
रचना आवडली.
वातड कडबोळ्या आणि दोन चिरोट्यांच्या उल्लेखाने रचना गुढ वाटतेय, कदाचित दुर्बोध अ थ वा क्लिष्ट देखील असावी, जाणकारच यावर प्रकाश टाकू शकतील !
नाशिकचे साहित्य संमेलन जस जसे जवळ येत जाईल तस तसे हे असे धोके वाढत जातील !
वाचताना दिवाळीत केलेला फराळ डोळ्या समोर चमकून गेला आणि मन मोर थुईथुई नाचू लागला.
पैजारबुवा,
हा.हा.हा...
[ अनारसे प्रेमी ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shodhu Mee Kuthe... :- Naav Mothan Lakshan Khotan