Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अन्नोत्सव

क
कर्नलतपस्वी
Sun, 12/12/2021 - 04:48
💬 3 प्रतिसाद
आमची सोसायटी म्हणजे एक छोटासा गाव. म्हणजे बघा कहाणीतल्या आटपाट नगरा सारखा. मुआँ करोना आला आणी गावात सन्नाटा करून गेला. बरेच दिवस गाव चिडीचूप्प,हळु हळू गावाला जाग येऊ लागली . पुढाऱ्यांची मादियाळी जमा झाली. काहितरी करुयात म्हणत दवंडी आली. हाकारे पिटारे डांगारे कळवण्यात येते की आन्नोत्सव आयोजित होत आहे. जनमानसात आनंद पसरला. हौशे, गवशे आणी नवशे सगळ्याचीच गर्दी झाली. उत्तम आयोजन, गावातले गावकरी तृप्त झाले. सकाळी सकाळी सुर्यवंशींचा फेरा आला. अन्नोत्सवाचे भग्नावशेष बघून गत सध्यांकाळच्या वैभवशाली खुणा पुन्हा जागवू लागला. पसरलेल्या खाणा खुणा सांगुन जाती इतीहास जुना किती एक आले गेले खाऊन पिऊन तृप्त जाहले खिशास कुणाच्या लागे गळती कुणा खिशास येते भरती खतं खेद नाही कुणा स्वानंदास्तव येऊ पुन्हा सकाळ झाली पशुपक्षांची झोप उडाली वायुसंगे आले निमंत्रण राखुनी आयोजकांचा मान श्वान मार्जराची गर्दी जाहली कोलाहल माजला म्हणे लवकर आवरा एक दुजाला आता येतील शस्त्रधारी (झाडूवाले) उडवतील फैरी वर फैरी उद्ध्वस्त करून जातील मजा सगळी संपेल की हो भुभूक्षितांची मांदियाळी अन्न उत्सव आयोजकांचे खव्वया तर्फे हार्दिक आभार

प्रतिक्रिया द्या
2213 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मुक्त विहारि Sun, 12/12/2021 - 12:39 नवीन
समजले नाही
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 12/12/2021 - 13:04 नवीन
कालच आमच्या सोसायटीत फुड फेस्टिवल झाला. सध्यांकाळी सगळ कस टापटीप, झगमगाट होता. दुसर्‍या दिवशी कुत्री, माजंर कावळे उरलेल्या खरखकट्यावर ताव मारताना दिसले. त्याचे मुक्तक सकाळी माँर्नीगं वाँक करताना सुचले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/12/2021 - 15:04 नवीन
हे तिघाडी सरकार असेच अजून काही वर्षे राहिले तर, जोडीला दारूच्या बाटल्या पण दिसतील ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा