जे न देखे रवी...

तुझे गाणे

Primary tabs

मी पाऊस झालो सखे
तू माती होशील का?
स्पर्शाने माझ्या अलगद
तू सुगंध होशील ना?

मी दरीत येऊन पडलो
तू वारा होशील का?
शीर्षासन करून मग मी
जग पायाखाली घेईल ना.

तू रात्र अबोली हो ना
मी चंद्र सखा तुज भेटेल.
तू पहाट होशील तेव्हा
मी तुझ्याच कुशीत झोपेन.

सुख बिंदू झेलायला
तू गवताचे पाते हो ना.
आयुष्याच्या धक्क्यांना मग
मी अलगद सोशीत जाईल.

जरी विस्कटली घडी जीवनाची
तू अशीच हसरी राहशील?
मी वचनाने मज बांधून घेतो
हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

Bhakti

वाह!आवडली रचना!

किती अपेक्षा करशील सखया
रिक्त जेव्हां होईन मी
खीशे तू माझे भरशील ना
मग आयुष्याच्या धक्कयानां
नक्कीच मी सोशील ना........

छान लिहिले आहे.