जे न देखे रवी...

स्वप्न जागृतीची सीमा

Primary tabs

स्वप्न जागृतीची सीमा
अर्ध सत्य अर्धा भास
अलौकिकाच्पा कवेत
पडे वास्तवाचा फास

सीमेवर कल्लोळती
नाद रंगांचे सागर
अपूर्वाची अनुभूती
गंध, रस, स्पर्शापार

उंबरा हा अदृष्टाचा
असूनही नसण्याचा
नसलेल्या असण्याशी
उराउरी भेटण्याचा

सोऊं तो सपने मिलूं, जागूं तो मन मांहि ।
लोचन रातें सब घडी, बिसरत कबहू न मांहि ॥

कबीरदासजी

ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।
अनेन वेद्यं सच्छास्त्रमिति वेदान्तडिण्डिमः॥

तेव्हा जागृती सत्य आणि स्वप्नही सत्यच, अर्ध सत्य असे काहीच नसते

पैजारबुवा,