जे न देखे रवी...
अद्भुताचे निळे पाणी
Primary tabs
मराठीच्या अंगणात
अठ्ठेचाळीस स्तंभांचा
स्वर-व्यंजनी महाल
माझ्या माय कवितेचा
नभापार पोचतसे
त्याची बेलाग ही उंची
रेलचेल महालात
जे न देखे रवि त्याची
महालात जाण्यासाठी
जिना जपल्या शब्दांचा
आणि उतरण्या साठी
सोपान हा गहनाचा
चुनेगच्ची सौधावर
नवरस पुष्करणी
पितो मन:पूत तेथे
अद्भुताचे निळे पाणी
परवलीची एकच
खूण इथे चालतसे
एका हृदयीचे दुज्या
सोपवावे लागे पिसे
वाह! कवितेचे शीर्षक वाचूनच ओळखले, तुमची असणार म्हणून.:)
धन्यवाद :)
+१ शीर्षक वाचून अंदाज आला होता :-)
काय राव !
ह्या कवितेचे < ओल्डमॉन्कचे लाल पाणी > हे नॅचरल विडंबन आहे ह्या कवितेचे अन तुम्ही म्हणता की दारु हा विषय वापरु नका विटंबनास !
श्या , काय राव , आता काय करायचं !
काय राव !
ह्या कवितेचे (ओल्डमॉन्कचे लाल पाणी) हे नॅचरल विडंबन आहे ह्या कवितेचे अन तुम्ही म्हणता की दारु हा विषय वापरु नका विटंबनास !
श्या , काय राव , आता काय करायचं !
खूप छान!