जे न देखे रवी...
सिंधूताई सपकाळ
Primary tabs
अनाथांची एक माय
आता राहिली नाय
जाता सिंधू सपकाळ
गहिवरला खूप काळ
असंख्य अन्याय साहिले
अपमानांचे धग दाहिले
मग मागे नाही पाहिले
उपेक्षितांना आयुष्य वाहिले
जग वंदू वा नि नींदू
होते निराधार जे हिंडू
झाली करुणा-सिंधू
अनाथाची मान बिंदू
एके दिसी दारावर कोण?
ना चिट्ठी नाही फोन
लिन -दीन ते डोळे दोन
पती पापाचे फिटे ना लोन
ज्याने केले निराधार
उन्मत्त होता जो भ्रतार
त्याचाही केला उद्धार
विकलांगा दिला आधार
झाली जितेपणीच आख्यायिका
राखेतून उठता समाज नायिका
कीर्ती झाली गुणगान गायिका
गौरवू त्या अनाथ आधारदायिका
कविता आवडली.
समयोचित रचना.
भावपुर्ण श्रध्दांजली.
छान.
कधी भेटण्याचा किंवा प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला नाही. पण त्यांच्या कार्याबद्दल ऐकुन होतो.
अशा माणसांकडुन स्फुर्ती मिळते.
सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!
भावपूर्ण श्रद्धांजली
कविता आवडली.
माईस भावपूर्ण श्रद्धांजली._/\_
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala