काथ्याकूट

PCMC मध्ये जुनी मासिके दिवाळी अंक.

Primary tabs

नमस्कार,

PCMC भागात जुने दिवाळी अंक आणि जुनी मासिके कुठे मिळू शकतात. मी डांगे चौकाजवळ राहतो. आस पास जर एखादे दुकान असेल तर कृपया माहिती द्या.

योगी९००

ते आम्हाला कशाला इचारते... ? ते कोणला तरी घाटीला इचारून घे नी..

PCMC

हे म्हणजे अगदीच खडा लागल्यासारखे झाले अन अचानक नवीन कल्पना मनात आली. माचुपिचु च्या धर्तीवर PCMC चे नामकरण पिंपुचिंचु असे करायला काय हरकत आहे ?

चौथा कोनाडा

पिंपुचिंचु .... लै भारी मार्कस राजे !
😀

आमचा एक मित्र PCMC मध्ये कामाला होता, आम्ही त्याला "मिसीसीपी" त आहे असं म्हणायचो !

तर्कवादी

पिंपरी चिंचवड लिंकरोडला अजिंक्य न्युज पेपर एजन्सीला मिळू शकतील (लोकेशन) किंवा इतर कोणत्याही न्युज पेपर एजन्सीवाल्यांकडे बघू शकता.

हा सर्वोत्तम पर्याय आहे ...

आणि एकदम खात्रीशीर मनुष्य हवा असेल तर, निरंजन घाटे.

निरंजन घाटे, हे अशा बाबतीत, ज्ञानी आहेत.

सिरुसेरि

शब्द लायब्ररी -- कदाचित इथे मिळु शकेल . चौकशी करा . --- www.shabdabooks.com
Shabda Books & Library , Opposite Sonigara Landmark building , Kaspate Wasti , Wakad

चौथा कोनाडा

चिंचवडः
बिजलीनगर ते दळवीनगर या लिंक रोडवर एक मोठे होलसेल रद्दीचे दुकान आहे, त्याच्याकडे मिळतील !

Nishantbhau

चौथा कानोडा जी खूप आभार. आज मी त्या दुकानात जाऊन जुने दिवाळी अंक घेऊन आलो. ३०% किमती मध्ये अंक मिळतात. तिथे बरीच पुस्तके आणि कथा कादंबऱ्या आहेत.