जे न देखे रवी...

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

Primary tabs

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले
अजूनी होते हवे ते परी न आता उरले

उबदार किती ते वाटे गारठ्यामधे
लेवून अंगी जणू चिलखत ते भासे
कितीही संकटे आली जरी
घाव वर्मी ते सोसतसे

किती निगूतीने वस्त्र निर्माण केले
उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले
शिलाई नाजूक टाके अचूक
रंग तयाचे भरदार असले

या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण
कुणी न विणकर आता न विणणार
भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला
पुन्हा कधी न उमटे

आधार होता किती नाही म्हटले तरी
आठव तयाची राहील कायमची उरी
न मिळणार कधी मायेचे पांघरूण
ते कठोर काळाने हिरावले

माझे बाबा देवाघरी गेले

- पाषाणभेद
०९/०१/२०२२

प्रचेतस

तुम्हाला ह्या दुःखद प्रसंगातून तरून जायचे सामर्थ्य मिळो.

वो था तो कोई गम न था।
नही है तो आँखे नम होती है।
उसकी यादोमे अक्सर राते
गमगीन होती है।

नसीहत जो कभी
मुसीबत लगती थी।
आज वही मुसीबत मे
राहत लगती है।

रोकता था टोकता था।
अक्सर मन सोचता था
ये ऐसा क्युं है।
आज नही है तो दिल
उसीको खोजता क्युं है।

बरगद का साया था।
हर राझ सिखाया था।
परवरीश मे जिसने
अपना तन मन धन गवांया था।

था वो तो
हर मुकाम मुक्कमल हुआ।
जिंदगी के हर पादान पर
पहाड सा खडा हुआ।

बाप बनके देखो
बाप क्या चिज होती है।
उसकी यादोमे आज भी
आँखे नम होती है।

मै भी एक बाप हूँ।
आज भी कमी महसुस होती है।
कभी अकेला होता हूँ
तो अटलजी की
कवीता याद आती है।

" उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो
अब गोबिन्द न आयेंगे।"

ॲबसेंट माइंडेड…

भावपूर्ण श्रद्धांजली.

ह्या कठीण प्रसंगातून सावरण्याचे धैर्य तुम्हांस मिळो हीच सदिच्छा.

सं - दी - प

न मिळणार कधी मायेचे पांघरूण
ते कठोर काळाने हिरावले

हे खरं आहे

भावपूर्ण श्रद्धांजली.

इन्दुसुता

भावपूर्ण श्रद्धांजली!
तुम्हाला ह्या दुःखद प्रसंगातून तरून जायचे सामर्थ्य मिळो. +१

आग्या१९९०

भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप त्रासदायक असतं पुरुषांसाठी असं दुःख व्यक्त करणे.

मदनबाण

या कठिण समायातुन तरुन जाण्यासाठी आपणास बळ मिळो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो. _/\_

टर्मीनेटर

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पितृछत्र हरपल्याच्या दुःखद प्रसंगातून तरून जाण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळो.

भावपूर्ण श्रध्दांजली,
त्यांना सदगती लाभो ही इश्वर चरणी प्रार्थना
पैजारबुवा,

निमित्ताने आपण गेल्या जून महिन्यात मिपावर प्रकाशित केलेली.. कविता आठवली

कविता चांगली आहे असं आत्ता म्हणण्याचे मन होत नाही .
या दुःखातून मी गेलेलो असल्याने त्याची कल्पना मला आहे . आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत .
श्रद्धांजली !

स्मिताके

आपल्याला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना.

पाषाणभेद

माफ करा. माझे वडील गेल्या मे महिन्यातच गेले आहेत, पण दु:खाचे कढ संपत नाहीत अन मग शब्दांचे रूप घेवून ते येतात.
आपल्या आपूलकी बद्दल आभार.