(वल्लीदांच्या सहवासात)
Primary tabs
कुणाला चांदण्यांच्या सहवासात रमावेसे वाटते तर कुणाला अजून कोणाच्या, आमची एक इच्छा अपूर्ण आहे ती म्हणजे एकदिवस तरी वल्लीदांच्या सहवासात रमण्याची
बघू केव्हा पूर्ण होते ती? तोपर्यंत ह्या कवितेवरच समाधान मानावे...
(वल्लीदांच्या सहवासात)
वाटते जरा रमावे वल्लीदांच्या सहवासात
गुपित एकेक उलगडावे वल्लीदांच्या सहवासात
लेण्यात एखाद्या शिरावे वल्लीदांच्या सहवासात
दर्पण सुंदरीला पहावे वल्लीदांच्या सहवासात
वल्लीदांनीच बोलावे वल्लीदांच्या सहवासात
आपण फक्त ऐकत राहावे वल्लीदांच्या सहवासात
एक एक लेणे निरखावे वल्लीदांच्या सहवासात
वल्लीदांच्या नजरेने पहावे वल्लीदांच्या सहवासात
माहिती कानात साठवावी वल्लीदांच्या सहवासात
घड्याळाकडे बघू नये वल्लीदांच्या सहवासात
गोष्टी किती ऐकाव्या वल्लीदांच्या सहवासात
सुरताल असा जुळवा वल्लीदांच्या सहवासात
पैजारबुवा,
हि कविता वाचल्यावर कोणाच्या पोटात जर आमच्या गुर्जींच्या सहवासात रहायची कळ उठली तर त्यांनी तो कढ कृपया दाबून धरावा
वल्लींच्या सहवासात, मुर्ती पण बोलू लागतात .
काही लोकं सुतावरून स्वर्ग गाठतात... वल्ली, तुटलेल्या अंगठ्या वरून, शिव-पार्वती कथा सांगतात ...
अगदी.
लेण्यातल्या मूर्तीचा तुटलेला हात आपल्याला दिसत असतो. वल्लीशेठच्या नजरेने मात्र त्या हातासकट ती मूर्ती अखंड कोरून नव्यासारखी समोर उभी केलेली असते.
गवि>>>> +++++1111111
धन्य आहात माऊली __/\__
वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ काहींसाठी प्रचु डार्लिंग तर काहींसाठी वल्लीसर.. हे व्यक्तिमत्व म्हणजे अगदी राजा माणूस. स्वभावाला औषध नाही म्हणतात ते वगळता बाकी ज्ञानसंपन्न उमदे व्यक्तिमत्व. रेडासदृश दुचाकी अवजड वाहनावर बसून एक ते विशिष्ट पांडवकालीन जॅकेट घालून श्री रा रा प्रचेतस पुरानकालीन दगडधोंड्यांच्या भ्रमंतीस निघाले की सातवाहन, मौर्य वगैरे सर्वकालीन काळ जिवंत होऊन उठतो वगैरे म्हणतात मागे बसणारे. मिपा माध्यमातून एक सामान्य वाचक या भूमिकेतून मा. प्रचु यांचा जितका परिचय आहे त्यानुसार सज्जन असावेत असे वाटते. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
वल्लीसरांच्या सहवासात भ्रमंतीचा योग आमच्या नशीबात येवो, ही बुवांच्या चरणी प्रार्थना..
सज्जनच आहेत...
स्वानुभव आहे..
पण, जोडीला अतृप्त आत्मा, असले तर, कट्टा जास्त रंगतदार होतो..
आमचं असं धुबुक धुबुक चालतं.. =)))))

आगोबा--आत्मा
तसा मिपावर बहुतेक सर्वात मीच वयाने लहान असेल पण प्रचेतस यांचे लेख वाचून त्यांचे व्यक्तिमत्व आणी आवाका किती मोठा आसेल याची कल्पना येते.
सज्जन आहेतच, आता व्यक्ती म्हटलं की स्वभाव गुण दोष चालायचेच. पण त्यांच्या लेखनाचा एक वाचक म्हणून चाहता आहे.
-दिलीप बिरुटे
थंडरबोल्ट नै हो अमच्याकडे.
बाकी वल्ली दादांच्या सहवासातलं काव्य थेट भिडलं. =)
-दिलीप बिरुटे
बुद्धिबळाचा डाव नाही टाकायचा. ते आपल्याला हरवत नाहीत.
अर्रर्र.....बुद्धीबळ खेळणं सोडलं मी.... उगाच आपण हरल्यानंतर ते चार मित्रांना,
कसं हरवलं त्याचं विश्लेषण करुन सांगतात.
-दिलीप बिरुटे
बघितलं होतं एकदा इथंच विश्लेषण लॉकडाऊन पिरियड मधे !
@हि कविता वाचल्यावर कोणाच्या पोटात जर आमच्या गुर्जींच्या सहवासात रहायची कळ उठली तर त्यांनी तो कढ कृपया दाबून धरावा >>>
दु दु दु दु पै बुवा
व्वा, पैजारबुवा, जबरी जमली आहे रचना !

टाळ्या ..... !
आम्हा सगळ्या मिपाकरांची भावना व्यक्त केलीत !
दिग्गज मिपाकर वल्ली उर्फ प्रचेतस यांना मानाचा मुजरा !
त्यांच्या समावेत भटकंतीचा योग लवकरात लवकर येवो !
प्रत्येक ओळीत उल्लेख केलेला अनुभव घेतला आहे वल्लीदांच्या सहवासात :)
गावडे सरांना अगदी राहवलं नाही. मिपा संन्यास सोडावासा वाटला, यातच वल्लीसरांचे मोठेपण दिसते. :)))
वाह पैजारबुवा,
द प्रचेतस उर्फ द वल्लीदांवर छान काव्य !
लवकरच आमच्या (म्हणजे माझ्या) नशीबी येवो.
सं - दी - प
वा, कधी नेताय सहवासात?