जे न देखे रवी...
सारे प्रवासी घडीचे
Primary tabs
या चंद्रमौळीत माझ्या
लक्ष सुखे ऱममाण
असते कधी सुखाला
सांगा कुठे परिमाण
जिर्ण शीर्ण झोपडीत माझ्या
तिरीप कोवळ्या उन्हाची
भासे जणू ही रेघ
सोनसाखळी गळ्याची
वाकून पाहतो हा चंद्र पौर्णिमेचा
ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा
क्षण माझीया सुखाचे चोरावया पहातो
उन्मुक्त होऊनी मी चादंण्यात नहातो
घुसतो धटिंगण वारा
सवे आणतो थेंब पावसाचे
उध्वस्त करू पहातो
साम्राज्य माझिया सुखाचे
कोणी गरीब म्हणूनी
हसती मजवर सारे
इथे काय आहे म्हणूनी
आकलेचे तोडती तारे
सारे प्रवासी घडीचे
सांगा कोण कुठे काय नेते
समाधान हेच असते
परिमाण ते सुखाचे
या चंद्रमौळीत माझ्या ......
१६-१-२०२२
या चंद्रमौळीत माझ्या
खुप छान!
खूप छान.
खरं आहे!
_/\_
प्रतीसादा बद्दल धन्यवाद भक्ती, श्रीगणेशा
मस्त...
फारच आवडली
पैजारबुवा,
धन्यवाद
छान लिहिले आहे
नीड़ न दो, चाहे टहनी का
आश्रय छिन्न-भिन्न कर डालो,
लेकिन पंख दिए हैं, तो
आकुल उड़ान में विघ्न न डालो।
नुकताच हँप्पी बड्डे झाला, मुलीने सटर फटर गोष्टिंबरोबर दोन कवीता संग्रह पण दिले. पैकी एक वरील कवीता वाचताना सहज वाटले की वरिष्ठ नागरीकांची सुद्धा कदाचित हिच आपेक्षा की आम्हाला आमचं जगू द्या. विचार करत असताना वरील ओळी सुचल्या. प्रतिसादा करता धन्यवाद. तुम्ही तर मुक्त विहारी .....
डेबूजी झिंगराजी जानोरकरांचे सहधर्मी निघालात!
दृष्टिकोन आवडला!
कविता वाचताना मला तर माणिकदेव बंडुजी इंगळे यांची आठवण आली
पैजारबुवा,
कहा राजा भोज कहा गंगू तेली, थोडा वेळ तर्रर्र च्या झाडावर चढवल्या बद्द्ल धन्यवाद
धन्यवाद अनंत यात्री.
धाग्यावर मग तो कुणीही लिहीलेला असू द्या तो वाचताना कधी कधी। semaphore flag code आणि International Morse Code सारखा वाटतो. डिसायफर करता येत नाही.
धन्यवाद माऊली.
ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा
वा छान कल्पना
वाचकांचा प्रतिसाद लेखकास हुरूप देतो, like Boost or Bournvita. धन्यवाद.
या झोपडीत माझ्या, आमच्या पिताश्रींना अभ्यासक्रमात असलेली कविता, आजही तोंडपाठ आहे त्यांना. तीच आठवली