जे न देखे रवी...

कविता

Primary tabs

कामधेनूच्या कासेचे
दूध म्हणजे कविता
डंखानंतर मिळे तो
मध म्हणजे कविता

कल्पवृक्षाच्या छायेचे
छत्र म्हणजे कविता
अनाहत गुंजणारा
मंत्र म्हणजे कविता

किनार्‍याला जोखणारी
लाट म्हणजे कविता
अज्ञेयाला भिडणारी
वाट म्हणजे कविता

दहा दिशांनी घेरती
अपरात्री पाश तिचे
दिवसाच्या धगीमधे
पार वितळे कविता

कवीता म्हणजे सुंदर शब्दचित्रे , कदाचित देवाला वाटले आसेल की मर्यादित कागदाचे, कॅनव्हास चे तुकडे , तोकडे ब्रश किवा बारा रंगाची रगंपेटी अमर्यादित प्रतीभेला चितारताना तोकडी, कमी पडतील. म्हणून त्याने काही कवी बनवले ज्यांनी शब्द रंग उन्मुक्त पणे उधळत एका पेक्षा एक अप्रतिम कलाकृती निर्माण केल्या.जसे बालकवी ठोंबरे.

श्रीगणेशा

कविता आवडली!

किनार्‍याला जोखणारी
लाट म्हणजे कविता
अज्ञेयाला भिडणारी
वाट म्हणजे कविता

खूप छान!!

नीरस काव्यमळीची
रम म्हणजे विडंबन
डंखानंतर येई ती
सूज म्हणजे विडंबन

एरंडवृक्षाची रचलेली
होळी म्हणजे विडंबन
चु-कवितेची उतरवलेली
चोळी म्हणजे विडंबन

मूळ कविता वाचायला
प्रेरीत करते ते विडंबन
वाचताना हलके स्मित
उमटवते ते विडंबन

कवितेची बलस्थाने
अधोरेखित करते ते विडंबन
आणि कवितेतल्या निसटत्या
बाजू दाखवते ते ही विडंबनच

पैजारबुवा,

कवीच्या भावनांचे
शब्दरुप म्हणजे कविता,
रसिकांच्या भावनांना
साद घालते ती कविता

रच्याकने:- कविता म्हटले की काळजात कचकन कळ जाते आणि मग किती तरी वेळ तिचा चेहरा डोळ्यासमोर येत रहातो.

पैजारबुवा,

तुम्हाला कवितेच्या आठवणी आहेत , आम्हाला सवितेच्या आठवणी आहेत . काय फॅन होतो आम्ही सविता भाभींचे . तिच्या नुसत्या आठवणीने कॉलेजचे दिवस आठवले . काय आतुरतेने तीची वाट पहायचो दर वीकेन्डला !

हन्त हन्त , गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी =))

राघव

कविता आवडली.
पैजार बुवा आणि मार्कसभौ दोघांची भर देखील छान! :-)