Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सध्या मी काय पाहतोय ? भाग ९

म
मदनबाण
Sun, 01/23/2022 - 15:12
💬 51 प्रतिसाद
पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते. त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले. या चित्रपटातील समंथाच्या आयटम साँग च्या शब्दावरुन काहीसा वाद निर्माण करण्यात आला होता...हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा मला वाटतं दुसर्‍याच दिवशी याची प्रिंट टेलिग्रामवर उपलब्ध झाली होती, ती प्रिंट मी क्षणभर पाहिली तर ती डब्बा होती. काही दिवसांनी हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर येईल तेव्हा पाहु असे विचार करुन लगेच ती प्रिंट डिलीट करुन टाकली.शेवटी हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर आला आणि मी तो पाहिला. हा चित्रपट पुष्पा सिरीज चा पहिला भाग आहे, होय याचा दुसरा भाग देखील येणार आहे हे तुम्हाला या चित्रपटाचा शेवट पाहताना लगेच कळते.चित्रपटाची सुरुवात अ‍ॅनिमेशन ने होते... आंध्रप्रदेशातील शेशाचलम जंगलातच मिळणार्‍या रक्त चंदनाच्या तस्करी आणि त्यातील सिंडिकेटवर आधारित हा चित्रपट आहे. पुष्पा राज ची मजुर ते सिंडेकेट ऑपरेटर असा प्रवास या भागात आपल्याला पहायला मिळतो. यासाठी त्याची हिंम्मत , हुशारी आणि अर्थातच हाणामारी यामध्ये त्याला मदत करते. या चित्रपटात पुष्पा राज चा एकच मोठा विक पॉइंट आहे तो म्हणजे तो त्याच्या पित्याची अनौरस अवलाद आहे. यावर जो मीठ चोळतो त्यावर पुष्पा राज लयं भडकतो. लहनपणी वडिलांचे नाव त्याच्या नावापुढे लावण्यास त्याचा सावत्र भाऊ ज्या प्रकारे नाकारतो त्याचा परिणाम बाल पुष्पा राज च्या मनावर होतो आणि एक खांदा त्या अनामिक ताणाने / दु:खा ने उंचावला जातो... हाच उंचावलेला खांदा घेऊन पुष्पा राज अख्या चित्रपटात त्याच्या राउडी स्टाईल ने वावरतो. चित्रपटात अभिनेत्रीला विशेष काम नाही, गाण्यात हिरो भोवती नाचणे आणि अर्धे उरोज आवडीने दाखवणे या पलिकडे तिच्या वाट्याला काहीच नाही,बाकी जो भी हय वह सब पुष्पा राज और पुष्पा राज ही हय. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन मध्ये श्रेयस तळपदे ने पुष्पा राज या व्यकीरेखेला आवाज दिला आहे. त्याचा आवाज या पुष्पा राज च्या व्यक्तिरेखेला आणि पर्याया ने अल्लू अर्जुन अगदी योग्य जुळला आहे. अगदी अधे-मधे एखाद दुसारा मराठी शब्द देखील कानावर पडतो. :) अल्लू अर्जुन ने या उत्तम आवाजा बद्धल श्रेयस तळपदे चे आभार देखील मानले आहेत. कुजके कराचीवुड :- अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत देखील येवुन गेला. मराठीत सगळ्यांना माझा नमस्कार असे त्याच्या साऊथ टोन मध्ये म्हणुन मराठी लोकांचे मन जिंकुन गेला. :) पण या सुपरस्टारला खिजवण्याचा प्रयत्न कराचीवुडच्या लाळघोट्या प्रश्न कर्तांनी केला. मुझे किसी ने कहा आप साऊथ के सॉलमॉन खॉण है | असे कर्मद्ररिदी बोलणे करुन याची सुरुवात झाली. [ कुठे अल्लू अर्जुन आणि कुठे अभिनयाच्या नावावर माकड चाळे करणारा माजुरडा म्हातार बाबा. ही म्हणजे सिंव्ह आणि माकड यांची तुलना करण्याचा मूर्ख प्रयत्न ! ] सॉलमॉन खॉण आपको पसंद है ? और कोनसा बॉलुवुड का स्टार आपको पसंद है ? [ किती चाटायची ? ] आपको पर्सनली करना हो तो कोनसे अ‍ॅक्टर की और कैनसी बॉलिवूड मुव्ही करना चाहोगे. [ हा महा कर्मदरिद्री प्रश्न ! अरे फुकणीच्यांनो... [दक्षिणेतील चित्रपट आणि गाणी यांचे रिमेकवर म्हातारा बाबा माकड उड्या मारतो, अल्लू अर्जून नव्हे ] काय बोलायचे ते पण तुम्हाला कळत नाही असे दाखवुन अपमान करणे चालुच. या सर्वांवर अजिबात न रागवाता अगदी कुल राहुन त्याची कुल उत्तरे अल्लू देऊन असला भुकड्डपणा करणार्‍या बाईचे तोंड बंद केले. असो... तर या चित्रपटाचा पुढच्या भागाची वाट पाहणे आता आले आहे, तेव्हा ती पहावी असे म्हणतो.

मदनबाण.....


प्रतिक्रिया द्या
18604 वाचन

💬 प्रतिसाद (51)
ह
हेमंतकुमार Sun, 06/26/2022 - 06:04 नवीन
सह्याद्री वाहिनीवर मो ग रांगणेकर यांचे संगीत कुलवधू पाहिले. खूप जुने नाटक नवरा कारकून, पगार साठ रुपये तर बायको सिनेमा कंपनीत नटी, पगार पंधराशे रुपये. यातून जो पुरुषी अहंकार उभा राहतो त्याचे सुंदर चित्रण. संगीत पदे सुद्धा छान आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा