Absurdle (शतशब्दकथा)
इंग्लिशचा गंध नाही त्यात आजारी.
त्यामुळे सतत चिडचीड करत असते आजी माझ्या शब्दकोड्यात डोकं खुपसून बसण्यावरून.
मीही थोडा जास्तच नादावलोय म्हणा हल्ली.
दोन मोबाईल वर एकदम कोडं सोडवतो आपण.
पण आॅफिसला जाताना आईनं आजीकडे लक्ष ठेव सांगितलंय म्हणजे आज no escape!
हे काय? आजी सोफ्यावर धाड्कन बसली वाटतं?
COUCH
किती असह्य खोकते ही?
COUGH
पाडलाच ग्लास हिनं थरथरत्या हातानं! ही डायरेक्ट बाटलीतून का पीत नै पाणी?
WATER
आता पंखा फुल फास्ट करायचा तर मला हाक मारायची नं? ही इतकी घामेजलीय की काय?
SWEAT
दहा मिनिटं झाली, काहीच आवाज नाही हिचा? आजी, u ok?
DEATH?
वाटलंच! हा attempt बरोबर असणारच!
💬 प्रतिसाद
(16)
ह
हेमंतकुमार
Fri, 01/28/2022 - 05:59
नवीन
मस्तच !
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Fri, 01/28/2022 - 09:46
नवीन
मस्तच!!
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 01/28/2022 - 09:57
नवीन
'पंचाक्षरी'चे व्यसन लागल्याचा भक्कम पुरावा दिलात 😀
शशक आवडली 👍
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 01/28/2022 - 13:24
नवीन
पंचा चे व्यसन आणि पंचाक्षरी चे व्यसन यात फरक आहे
- Log in or register to post comments
B
Bhakti
Fri, 01/28/2022 - 12:38
नवीन
😁
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 01/28/2022 - 13:07
नवीन
हा लैच बेक्कार नाद आहे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
स
सनईचौघडा
Fri, 01/28/2022 - 16:09
नवीन
जबरी शशक.
अरे वा तुमच्या कवितेसारख्याच कथा ही मस्त असतात.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Fri, 01/28/2022 - 18:42
नवीन
खरच व्यसन लागल या खेळाचे. सकाळी चहाचा कप आणि हे एक कोड. दिवस मस्त सुरु होतो.
कुमार सर धन्यवाद.
आजच्या कोड्याने नवीन शब्द शिकायला मिळाला...
- Log in or register to post comments
क
कॉमी
Sat, 01/29/2022 - 04:18
नवीन
भारी !
- Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड…
Sat, 01/29/2022 - 05:38
नवीन
छान.
- Log in or register to post comments
च
चिन्मना
Sat, 01/29/2022 - 07:08
नवीन
जबरीच आहे शतशब्दकथा !
- Log in or register to post comments
र
रुपी
Sat, 01/29/2022 - 07:14
नवीन
जबरी! लेखकाचे नाव आणि शशक म्हणून कुतूहलाने वाचायला आले. शशक भारीच. मग Absurdle आणि नंतर wordle चे धागे पाहिले..असा उलटा क्रम झाला, पण आता व्यसन लागले!
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Sat, 01/29/2022 - 09:19
नवीन
खूप छान!
पद्य/मुक्तकाची छटा उतरली आहे, गद्यातही :-)
- Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर
Sat, 01/29/2022 - 09:29
नवीन
छान
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 01/29/2022 - 17:28
नवीन
बाबौ !
.... जबरी !
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 01/31/2022 - 05:06
नवीन
सर्व वाचकांना धन्यवाद.
- Log in or register to post comments