जे न देखे रवी...
का संपली पुण्याई.....
Primary tabs
कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई
कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही
गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
शांत झाली वीणा
तुटल्या तंबोऱ्याच्या तारा
मनी दाटला हुंदका
सजल नयना फुटल्या वाटा
निश्ब्द झाले अतंरग
एवढेच पाटी माडंले
बाकी आसवांनी सांडले
भावपूर्ण श्रद्धांजली! :(
हे असे घडू नये वाटते
नेमके तेच घडत असताना...
सं - दी - प