जे न देखे रवी...

निघाले किरीट सोमय्या....

Primary tabs

१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या

https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-inve…

रेवदंडा पोलिसांत FIR
19 बंगले चोरीला गेले...

| निघाले किरीट सोमय्या |
|राऊत करी ता था थैय्या ||

| त्यांच्या हाती पावती |
|मिरच्या झोंबती राऊती ||

|चालले पनवेल, पेण, पेझारी |
|शोधायला शुक्राचार्य अन झारी ||

|पोचले गाव कोरलई |
|म्हणाले बंगले चोर लई ||

|होते इथे 19 बंगले |
|बांधले ते खूप चांगले ||

|भरली होती घरपट्टी |
|सोमय्या ते फार हट्टी ||

|पोलीस बंदोबस्त छावणी |
|पोलीस VIP च्या दावणी ||

|केला रेवदंडा पोलिसांत FIR |
|तपासा कुणी केला फेरफार ||

| सोमय्या प्रवास पाहुनी मळमळले |
| उद्धव सरकार काहूनी डळमळले ||

चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... ! भारीच !

"निघाले किरीट सोमय्या, राऊत करी ता था थैय्या"

😂
हसतच वाचत राहिलो !

मदनबाण
यश राज

सत्ताधाऱ्यांचा थयथयाट बघून कळून येते की कुठे तरी पाणी मुरते आहे.