Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेन वॉर्नची अकाली एक्झिट

क
किसन शिंदे
Fri, 03/04/2022 - 18:47
💬 32 प्रतिसाद
1 आत्ता लेट तिशीत असलेल्या पिढीचं नव्वदीतलं बालपण, शेन वाॅर्न या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, इतकं मोठं वलय त्या नावामागे होतं. बहुतेकांच्या स्मरणात शेन वाॅर्न म्हणजे शारजातला कोका-कोला कप, धुळीचे वादळ, सचिनने पुढे सरसावत मिड ऑनला मारलेले षटकार, इतकंच असेल, पण सच्च्या क्रिकेटवेड्या लोकांच्या हा फिरकीचा जादूगार कायम स्मरणात राह्यला, तो त्याच्या जादूई लेगस्पिनमुळे. सचिन आणि शेन वाॅर्नच्या रायव्हलरीत भलेही सचिन सरस ठरला असेल, पण शेन वाॅर्नचे विकेट्सचे आकडे आणि क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्वच देशांविरूद्धची त्याची अफाट कामगिरी, ऑस्ट्रेलिया, भारतीय उपखंड, इंग्लंड, न्यूझीलंडमधील प्रत्येक मैदानावर त्याने दाखवलेली लेगस्पिनची कमाल यामुळे, तो नकळत दिग्गज क्रिकेटर्सच्या पंक्तीत जाऊन बसला. माईक गॅटींगचा काढलेला बोल्ड विस्फारल्या डोळ्यांनी बघताना पिचवर, हातभर बाॅल वळवणं म्हणजे काय, हे शेन वाॅर्नने त्याच्या मनगटी फिरकीने दाखवून दिलं होतं. अगदी तसाच एमएसके प्रसादचा ढुंगणामागून काढलेला बोल्डही आयुष्यभर न विसरता येण्याजोगा. ज्याने आपल्या खेळातून सच्च्या क्रिकेट चाहत्याला कायमच मनमुराद आनंद देण्याचे काम केलं. असा शेन वॉर्न आपल्यातून आज अचानक अकाली निघून गेला. अशा सर्वकालीन उत्कृष्ट लेगस्पिनर शेन वाॅर्नला भावपूर्ण श्रद्धांजली!!

प्रतिक्रिया द्या
12855 वाचन

💬 प्रतिसाद (32)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/04/2022 - 18:58 नवीन
जगप्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्न गोलंदाजीला आला म्हणजे आपल्या विकेट्स काढणार अशी एक धाकधुक तो गोलंदाजीला आला म्हणजे असायची. सचिनने त्याला धु धु धुतल्यावर सचिन मला स्वप्नातही धुतोय असे खेळाडूवृत्तीने सांगणारा, हातभर बॉल आत-बाहेर काढत आपल्या एका ख़ास शैलीत छोट्याशा रनप घेऊन गोलंदाजी करणारा, आपले कपाळावर येणारे केस बोटांनी मागे ढकलणा-या या जगप्रसिद्ध क्रिकेटपटूची अशी अचानक एक्झिट दुःखद आहे. कायम स्मरण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/05/2022 - 02:12 नवीन
शब्दच नाहीयेत, एकदम अचानक.. :(
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/05/2022 - 04:34 नवीन
रिस्ट बँड लावलेले त्याचे ते जाडजुड मनगट आणि त्या मनगटाच्या जोरावर हातभर वळवलेला चेंडू खेळताना भल्या भल्यांची हबेलांडी उडताना पहायला मजा यायची. जगातल्या कुठल्याही मैदानावर चेंडू वळावण्याची ताकद असलेले दोनच गोलंदाज, एक मुरली आणि दुसरा शेन वॉर्न. संपूर्ण क्रिज चा तो यथेच्च वापर करायचा. फलंदाजावर दबाव आणण्याकरता कोणत्याही थरला जायला तो मागे पुढे पहायचा नाही. विचित्र फिल्डिंग लावणे, खोटी अपिल करणे इत्यादी तो बिनदिक्कत करायचा. सचिनची आणि त्याची जुगलबंदी बघायला मजा यायची. सचिन अतिशय सहज पणे त्याला खेळून काढायचा. पण एकदा त्याला सेहवागनेही खुप दमवले होते. मला आठवते ती सेहवागची चेपॉकच्या मैदानावरची खेळी. इरफान पठाणच्या साथीने त्याने यशस्वी पणे किल्ला लढवला होता. आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून संघाकरता खेळणारा सेहवाग आणि त्याची विकेट काढण्यासाठी जीवापाड धडपड करणारा शेनवॉर्न अजूनही लक्षात आहेत. तो जिकडे कुठे असेल तिकडे मजेत असेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 03/05/2022 - 05:07 नवीन
वाईट बातमी. फार अकाली. त्याचा तो बॉल ऑफ द सेन्च्युरी, ९० अंश वळलेला. त्याचा व्हिडो शोधणे आले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/05/2022 - 05:14 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sat, 03/05/2022 - 11:49 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/05/2022 - 12:01 नवीन
च्यायला, काय बॉल वळायचे याचे. आपल्याकडे असे फक्त आपल्या पिढीत, नरेंद्र ( हे राम) हिरवाणीचेच चेंडु असे असे वळतांना पाहिले. अनिल कुंबळेचे बॉल टाकतांना हातपाय सगळे वाकडे तिकडे वळतात, पण बॉल देवाच्या भरवशावर वळाले तर वळाले. भज्जी पण तसाच, त्याची तर मला फार दया येते. बाकी, कधी कधी कुंबळे लेग ब्रेक वगैरे भारी टाकायचा पण, पण फिरकी म्हटलं की बॅट्समन नुसता नाचत राहीला पाहिजे, असे माझे व्यक्तीगत मत आहे. आणि ते नाचवले शेन वॉ यांनी काय म्हणता ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
श्रीरंग_जोशी Sat, 03/05/2022 - 05:21 नवीन
क्रिकेटमधे डावखुरे फलंदाज व लेगस्पिन गोलंदाजी करणारे फिरकीपटू नैसर्गिकपणे इतरांपेक्षा अधिक कलात्मक वाटतात. शेन वॉर्नच्या गोलंदाजीमधे यांत्रिकपणपेक्षा कलात्मकता ठासून भरलेली आहे असे जाणवत राहायचे. हाडाच्या क्रिकेट रसिकांना खेळाचा मनमुराद आनंद शेन वॉर्नची गोलंदाजी पाहताना पुरेपूर मिळत राहायचा. विश्वचषकांमधले महत्त्वाच्या सामन्यांतही अवघड परिस्थितीत मोक्याच्या क्षणी बळी घेऊन शेन वॉर्न सामन्यांचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकवायचा. त्याच्या अकाली मृत्यूमुळे दु:ख झाले. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ऐनवेळी या विषयावर केलेले थोडक्यात पण संतुलित संतुलित लेखन भावले.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 03/05/2022 - 15:28 नवीन
शेन वॉर्न यास श्रद्धांजली. गेल्या ऑगस्टात तो करोनामुळे रुग्णालयात दाखल होता. त्या वेळेस श्वासोत्तेजकही लावला होता. कदाचित लस दिलेली असू शकते. त्या लशीच्या दुष्परिणामामुळे जीव गेलेला असू शकतो. करोनालशीपायी हृदयाचा दाह होऊन हृत्शूल बळावून ( हार्ट अॅटॅक येऊन ) जीव गेल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. तीव्र चयापचय असलेले खेळाडू, तरुण वगैरे गटांत याचे प्रमाण अधिक आहे. ज्योकोव्हिचने लस नाकारून चांगला पायंडा पाडला आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/06/2022 - 14:00 नवीन
लशीचं थोतांड तुम्ही इकडे पण आणले का ? अहो लस घेतलेल्या लोकांना सुखाने जगू द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धर्मराजमुटके Sun, 03/06/2022 - 15:46 नवीन
लस घेतलेल्या माणसांचे किंवा मदणबाण यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध
धर्मराजमुटके Sun, 03/06/2022 - 15:47 नवीन
लस घेतलेल्या माणसांचे किंवा गा.पै. यांचे जालिय अस्तित्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुधा लस घेतल्याबद्द्ल सतत टोचून घ्यावे लागणार ! :) स्वसंपादनाची सुविधा नसल्यामुळे मदणबाण माफ करतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मुक्त विहारि Sun, 03/06/2022 - 14:36 नवीन
त्यामुळे, लशीचा कुठल्या माणसावर, काय परिणाम होतो? हे सांगता येत नाही ... त्यामुळे, तुमच्या तर्काला ठाम नकार देता येत नाही... कुणाला दोन पेग दारू पुरते तर कुणाला 14 पेग ... हो ... 14 पेग रिचवणारा बघीतला आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ज
जेम्स वांड Tue, 03/08/2022 - 04:09 नवीन
कदाचित तुम्हीच चौदा पेग रिचवले असतील, फुकट मिळाल्यावर काय दारू काय बिसलेरी ! अन काय नीट ! (कृ ह घ्या हो मुवि)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
जेम्स वांड Tue, 03/08/2022 - 04:19 नवीन
कदाचित लस दिलेली असू शकते.
तुम्ही एकंदरीत मजेशीर माणूस असल्याचे वाटत असे, आज कन्फर्म झाले बुआ एका कदाचितवर अख्खी ष्टोरी ! तुम्ही ज्या गतीने कॉन्स्पिरसी थेअरी प्रसवता ते पाहता आपण पटकथा लेखक व्हायला हवे होतात. &#129315 &#129315 &#129315 &#129315
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/10/2022 - 16:02 नवीन
जेम्स वांड, फक्त शक्यता व्यक्त केली त्यास तुम्ही आख्खी ष्टोरी म्हणता? बाकी, मी मजेशीर माणूस आहेच. जिवंत राहायचं असेल तर थोडीफार मजा करायला हवीच, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
उ
उत्खनक Sat, 03/05/2022 - 17:47 नवीन
काय अफाट कलाकारी ती! कमालीचा खडूसपणा भरलेला पण त्यामागची ती कलाकारीची दमदार बैठक नजाकत द्यायची! भारतीय उपखंडात त्यामानानं कमी चालला वॉर्न पण बाकी जगात धुमाकूळ घातलेला त्यानं. बिरुटेसर वर म्हणतात तसे अगदी अक्षरशः बोटांवर नाचवायचा तो! आज पेपरातच वाचली डायरेक्ट बातमी... जबर धक्का बसला. आणि जायच्या १२च तास आधी म्हणे त्यानं रॉडनी मार्शना श्रद्धांजलीचं ट्वीट केलेलं होतं. चटका लावून जाणारा शेवट.. :-(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/05/2022 - 18:34 नवीन
जादूगार . ग्येला. :(
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 03/06/2022 - 04:04 नवीन
श्रद्धांजली! कधी काळी शेन वॉर्नची नक्कल करत बॉलींग टाकत होतो. खरंच एक महान बॉलर होता तो. मुरली पेक्षा कधी पण तोच आवडत होता. कागदावर कदाचित मुरली असेल सरस पण माझा आवडता बॉलर म्हणजे वॉर्न!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sun, 03/06/2022 - 16:09 नवीन
गल्ली क्रिकेटमधे मीही बऱ्याचदा शेन वॉर्नची नक्कल करायचो. मुरलीधरनच्या ऑफस्पिनपेक्षा शेन वॉर्नची लेगस्पिन गोलंदाजी जास्त जादुई वाटायची. श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
स
सौंदाळा Mon, 03/07/2022 - 08:05 नवीन
श्रद्धांजली! फिरकीचा जादूगार आणि ज्याने भारताच्या कितीही विकेट घेतल्या तरी त्याचा राग आला नाही कधीच. (मॅकग्रा, गिलेस्पी, ली, कस्प्रोविच वगैरेच्या बाबतीत असे कधी वाटले नाही) रविंद्र जडेजाला पैलु पाडण्याचे काम पण पहिल्या आयपील सिझन मधे वॉर्नने केले. आजच वॉर्नच्या हॉटेलमधील खोलीत आणि टोवेलवर रक्ताचे डाग सापडले अशी बातमी वाचली. त्यामुळे घातपाताचा संशयपण आहे आणि त्या दिशेने तपास केला जाईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/11/2022 - 18:34 नवीन
ते रक्ताचे डाग सीपीआर देताना झालेल्या जखमेमुळे होते असे परवा एका बातमीत वाचले होते. आता पटकन ती बातमी सापडली नाही. स्थानिक पोलिसांनी चौकशीअंती शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच झाला आहे हे स्पष्ट केले आहे - Shane Warne died of natural causes - Thai police .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ज
जेम्स वांड Tue, 03/08/2022 - 04:16 नवीन
गोलंदाजी असो, खाणे अन खासकरून पिणे असो, लफडी कुलंगडी करणे असो पोरी फिरवणे असो वा मैत्री करणे निभावणं असो, वॉर्न वॉज वॉर्न ! प्रोफेशनली अमेझिंग माणूस च्यामारी. इतका की ब्रॅडमनने आपल्या नव्वदाव्या वाढदिवशी दोनच क्रिकेटर्स बोलवले होते, एक तेंडुलकर अन दुसरा वॉर्न ! वॉर्नी, रेस्ट इन पीस मेट ! Image removed.
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ Fri, 03/11/2022 - 15:34 नवीन
खेळपट्टी कशीही असो, पण त्याचा लेग स्पिन त्याच्या मनगटातच होता... जादूई फिरकीचा बादशाह
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 03/29/2022 - 16:13 नवीन
लोकहो, शेन वॉर्नचा मुलगा जॅकसन वॉर्न याने बापाच्या मृत्यूसाठी लशीस जबाबदार धरलं आहे. इंग्रजी बातमी बातमी ( हटवलेली ) : https://principia-scientific.com/son-of-cricket-legend-shane-warne-blames-pfizer-covid-jab-for-death/ वरील बातमीची प्रतिराशी ( गूगल क्याश ) : https://webcache.googleusercontent.com/search?q=cache:tsLvb2YQz0UJ:https://principia-scientific.com/son-of-cricket-legend-shane-warne-blames-pfizer-covid-jab-for-death/+&cd=1&hl=en&ct=clnk&gl=uk प्रतिराशी गूगलकडून उडवली जाण्याआधी लेख वाचून घ्या. अन्यथा माझ्याकडे दुसरी प्रत आहे. जॅकसन वॉर्नचं चलचित्र : https://www.thetruthseeker.co.uk/wordpress/wp-content/uploads/2022/03/VID-20220328-WA0003-Shane-warne.mp4 वरील बातमी व चलचित्रानुसार करोनाची लस घेतल्यावर शेन वॉर्नास छातीदुखी सुरू झाली. तिच्यावर उपचार घेण्यासाठी म्हणून तो थायलंडात गेला. तिथे त्याची प्रकृती अचानक गंभीर होऊन तो वारला. काही तासांपूर्वी रॉडनी मार्श हा माजी क्रिकेटपटूही अशाच काही कारणाने वारला होता. जॅकसन वॉर्नच्या म्हणण्यानुसार त्याचा बाप शेन हा व्यवस्थाग्रही ( सिस्टीम सपोर्टर ) होता. त्यानुसार शेनने लस घेतली होती. आणि नेमकी तीच उलटली. जॅकसन वॉर्न पुढे म्हणतो की प्रस्थापितांतील उच्चपदस्थांना ही लस नसून विष आहे हे माहित आहे. मग त्यांनी लस नाकारायला हवी होती. पण ते ही दिसंत नाही. म्हणजे तो सूचित करतोय की, लस घेणारे प्रस्थापित उच्चपदस्थ डोक्याने बथ्थड आहेत. तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात. फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/30/2022 - 01:21 नवीन
एकीकडे युक्रेन वर एवढा विचार पूर्वक लेख आणि एकीकडे हि भलती "कॉन्स्पिरसी" थेअरी .. अजब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बाबुराव Wed, 03/30/2022 - 08:49 नवीन
तुम्ही हा संदेश जर वाचू शकंत असाल तर तुम्ही जिवंत आहात. तुमचा लशीचा ढोस घेऊन बहुधा बरेच दिवस झाले असावेत. त्यामुळे ती लस आतापावेतो विरून गेलेली असावी. म्हणजेच तुम्ही धोक्याबाहेर आहात.
देवा पांडुरंगा ! कसं सुचतं यांना इतकं जीवघेणे लिहायला. तीसरा बुष्टर ढोस घ्यायचा कंफिडंस लूज झाला हे सगळं वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 03/30/2022 - 15:13 नवीन
बाबुराव, फक्त एकंच कॉन्फिडन्स अंगी असू द्या. तो म्हणजे कोणी कोव्हिडच्या लशीचं नाव काढलं तर त्याच्या कानाखाली जोरदार जाळ काढायचा कॉन्फिडन्स. यापेक्षा तुम्हांस इतर कशाचीही जरुरी नाही. कोव्हिड लशीची तर नाहीच नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
स
सुरिया गुरुवार, 03/31/2022 - 10:07 नवीन
तुम्ही आजपर्यंत किती कानाखाली जाळ काढलाय खरोखर. आपल्या भावना बघता एव्हाना वडवानल पेटला असेल राणीदेशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चौकस२१२ Wed, 03/30/2022 - 01:17 नवीन
फक्त परत या झंझटात पडू नका. बाकी चालू द्या. हे विधान अतिशय बेजबाबदार आहे असले मिपावरचे संदेश ना लक्षात घेता लोकांनी आप लया देशातील वयद्यकीय सल्ला लक्षात घयावा .. सुन्यास अधिक सांगणे ना लागे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 03/30/2022 - 15:10 नवीन
तरुण खेळाडू पोरं हार्टअॅटकने कशी टपाटप मरताहेत ते वाचून पहा (इंग्रजी दुवा) : https://newspunch.com/three-fully-jabbed-top-cyclists-suffer-major-heart-attacks-two-dead-doctors-baffled/ आणि म्हणे तत्ज्ञांना माहित नाहीये cardiac arrhythmia मागचं कारण काय आहे ते. घ्यायचा का डॉक्टरांचा सल्ला ? घंटा तिच्यायला कोव्हिडचा सल्ला! लस हे एक जैविक हत्यार आहे. तुम्हाआम्हाला ठार मारण्यासाठी खास विकसित केलेलं. घ्यायचंय टोचून? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
ग
गामा पैलवान Mon, 04/04/2022 - 15:44 नवीन
यंदा तब्बल १५ खेळाडूंनी मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतून अंग काढून घेतलंय ( इंग्रजी दुवा ) : https://thelibertydaily.com/buried-bombshell-tennis-world-rocked-as-fifteen-fully-vaccinated-players-unable-to-finish-miami-open/ लशीचे दुष्परिणाम उघड दिसंत असतांना सगळी वर्तमानपत्रं मूग गिळून गप्प बसलीत. घ्या सुया टोचून अन व्हा जायबंदी. -गा.पै.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा