जे न देखे रवी...

मुखवटे.

Primary tabs

रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे
थांग लागेच ना मन किती गहिरे
व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे
सभ्य वेषात या नांदती चोर हे
दान देण्या निघे अन जगाला लुटे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

शब्द फुलापरी मनी निखारा जळे
वेष संतापरी हृदयी विषारी तळे
लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे
चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

उत्तम रचना, आवडली. लिहिते राहा.

पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे
सभ्य वेषात या नांदती चोर हे

अगदी वास्तव.

-दिलीप बिरुटे

Deepak Pawar

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

दीपक पवार.

राघव

आवडली कविता. पुलेशु.
खूप दिवसांनी साव हा शब्द आला वाचण्यात. :-)

Deepak Pawar

मनःपूर्वक धन्यवाद.

दीपक पवार.

सध्याच्या फेसबुक व्हॉट्सप ट्विटर आणि इन्स्टाच्या काळात हे मुखवटे जास्तच अभेद्य आणि चेहर्‍याला घट्ट चिकटणारे झाले आहेत. इतके की ते जर ओढून काढायचे म्हटले तर खरा चेहराच फाटून भेसुर होईल.

एकाच वेळी अनेक मुखवटे घालण्याची सुध्दा आजकाल मोठी फॅशन आलेली आहे.

पैजारबुवा,

Deepak Pawar

मनःपूर्वक आभार.

दीपक पवार.

श्रीगणेशा

रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे
थांग लागेच ना मन किती गहिरे

खूप छान!

प्रत्येकजण सभोवतालच्या समाजाने ठरवून दिलेले मुखवटे घालूनच जगत असतो.

Deepak Pawar

मनःपूर्वक धन्यवाद.

दीपक पवार.

बाजीगर

सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे
शिवीगाळ न चिखल, फेकती मारके
रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे
चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे

Deepak Pawar

सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे
शिवीगाळ न चिखल, फेकती मारके
रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे
चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे

छान....