जे न देखे रवी...

रिसाँर्ट

Primary tabs

रिसाॅर्ट बेकायदा हा तोडा
सोमय्या घेवून गेले हातोडा

एसटी प्रकरणी बेफिकीर अनिल परब
चिंताग्रस्त झाले त्यांना सोमय्यांची जरब

फोनवर घेतात आदेश दापोली पोलीस
ते तर बिचारे माफियासेनेचे ओलीस

होऊ शकते हत्या, हो सोमय्या
दिला पोलीसठाण्यापुढे ठिय्या

दापोली जनता अस्वस्थपणे
दंड थोपटती पितापुत्र राणे

पडद्यामागे रहातोय अजाणता राजा
घडामोडी पहातोय मोटाभाई ताज्या.

दोन सांडांची टक्कर पहाते दापोली
मिडीया भाजतय आपली पोळी.

=))))
बरेच दिवसांनी राँर्बर्ट ला लोकोत्तर शब्दाला तोड देणारा मिपावर आलयाचे पाहुन समधान वाटले :)

तोडू पहातो घरटी कुणाकुणाची
लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन)
केली मदत गरिबांना त्यांच्याअडी नडीला
फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला
का भिववीतो मज दाखवून त्या ईडीला
व्रतस्थ मी विरागी जनसेवा स्वांग माझे
मोडू नकोस दुष्टा लावलेले बकध्यान माझे