Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्री-लैंगिकतेचे गूढ

ह
हेमंतकुमार
Mon, 03/28/2022 - 06:17
💬 150 प्रतिसाद
(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत). स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे : उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान. बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो. सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे उत्तर सोपे आहे. पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत. पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात : 1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते. 2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते. 3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते. हा कळसबिंदू सरासरी 30 सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे. ok (चित्र सौजन्य : Getty images) वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल : 1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे. 2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो. 3. तर काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे. या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्‍यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली. * शिस्निका 👈

हे उभे अंतर ३.५ सेमी / त्याहून कमी

* मूत्रछिद्र 👈 * योनीमुख 👈 ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही ! यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष. यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते. या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्‍याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे. १९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये विल्यम मास्टर्स व व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही. मास्टर्स व जॉन्सन यांच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे परंपरागत प्रारूप असे तयार झाले : लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था. स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही. इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे. संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते. सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे. सामाजिक दृष्टीकोन परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो. मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे. त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त आणि भरपूर चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे. ..................................................................................

प्रतिक्रिया द्या
56345 वाचन

💬 प्रतिसाद (150)
आ
आनन्दा Wed, 04/06/2022 - 03:55 नवीन
>>आणि एखाद्या स्त्रीबद्दल अतीव ओढ, आकर्षण (पॅशन) वाटायचे काहीच कारण नाही.. हे तर्काला धरून नाही. कळसबिंदू आल्यानंतर ते तसेच राहते का हा प्रश्न संयुक्तिक आहे.. बाकी डोपामाईन बद्दल वाचले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Wed, 04/06/2022 - 08:18 नवीन
माझे म्हणणे आहे की कळसबिंदू = पुर्ण समाधान हे जर पुरुषाच्या बाबत खरे असेल तर त्याला एखाद्या विशिष्ट स्त्रीबद्दल अतीव ओढ वाटायचे कारण नाही किंवा एक लैंगिक जोडीदार असतानाही दुसर्‍या स्त्रीबद्दल आकर्षण वाटते (मग आणखी अफेअर वगैरे होणे) हे घडण्याचे कारणच नाही. कारण कळसबिंदू गाठायला कोणतीही स्त्री पुरेशी आहे .. फार काय हातानेही कळसबिंदू गाठता येतो.
बाकी डोपामाईन बद्दल वाचले आहे का?
माहित आहे. पण तुमचा मुद्दा काय आहे ? तुम्हीच विस्ताराने सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुबोध खरे Wed, 04/06/2022 - 09:19 नवीन
मूलभूत फरक समजून घ्या. प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक पेशीत एक्स X आणि एक Y गुणसूत्र असते आणि हे प्रत्येक मेंदूच्या पेशीतही असते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाला सुंदर स्त्री बद्दल आकर्षण वाटत असते मग वय ९० वर्षे असले तरी. यात सेक्स चा भाग नाही. याशिवाय पुरुषाचे स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण हे शारीरिक स्वरूपात असते यामुळे पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर मानसिक गुंतवणूक न करता सहजासहजी रत होऊ शकतो. परंतु प्रेमस्वरूप आकर्षण असते त्यात लैंगिकता असेलच असे नाही त्यामुळे पुरुषाला एखाद्या स्त्रीबद्दल अतीव आकर्षण आणि प्रेम असले तरीही तो दुसऱ्या स्त्रीशी कोणतीही भावनिक गुंतवणूक न करता सहज संबंध ठेवू शकतो. याउलट ज्या स्त्रीवर तो अतिशय प्रेम करतो त्या स्त्रीशी संबंध ठेवताना त्याला मिळणारे सुख हे केवळ लैंगिक निचऱ्यापेक्षा किती तरी उच्च कोटीचे असते. स्त्री च्या प्रत्य्रेक पेशीत आणि प्रत्येक मेंदूच्या पेशीत दोन X गुणसूत्रे असतात त्यामुळे रजोनिवृत्ती झाली आणि स्त्रीच्या संप्रेरकांची पातळी अगदी कमी झाली तरी तिचे स्त्रीत्व नाहीसे होत नाही ते प्रत्येक पेशीत कायमच असते. यामुळेच प्रेमळ स्वभाव वात्सल्य हे गुण स्त्री जिवंत असेपर्यंत तिच्या स्वभावात कायम राहतात. पुरुषाशी रत होण्यात स्त्रीची केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक गुंतवणूक असते त्यामुळे पुरुष जसे समोर येणाऱ्या कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवू शकतात तसे स्त्रीच्या बाबतीत होत नाही. संबंध ठेवल्यानंतर होणारी संतती हि स्त्रीला आयुष्यभर जखडून ठेवणारी असते यामुळे अवांछित संतती होऊ नये हि निसर्गाची उर्मी स्त्रीला कोणत्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यापासून प्रतिबंध करते. याचे कारण पुरुषाचे शुक्राणू एका वीर्यस्खलनात १० कोटी इतके असतात आणि तरुणपणात दररोज असे कोट्यवधी शुक्राणू तयार होत असतात. या उलट साधारणपणे स्त्रीबीज हे एक महिन्यात एकच तयार होत असते. ३०० कोटी शुक्राणूंपैकी एकाच शुक्राणूचा स्त्रीबीजाशी संपर्क आला तर गर्भ धारणा होते. म्हणजे २९९ कोटी ९९ लाख ९९ हजार ९९९ शुक्राणू दार महिन्याला फुकट जात असतात. प्रत्येक प्राण्यात पुनरुत्पादन करण्याची नैसर्गिक उर्मी अत्यंत प्रबळ असते त्यामुळे माणसात नराला स्त्रीचे शारीरिक आकर्षण अत्यंत प्रबळ असते जेणेकरून तो जास्तीत जास्त स्त्रियांशी संबंध ठेवून आपली पुढची पिढी निर्माण व्हावी असा प्रयत्न करत असतो. याउलट स्त्रीचे एकच स्त्रीबीज महिन्याला तयार होत असत त्याशिवाय त्यातून तयार होणाऱ्या गर्भाला स्त्रीला आपल्या पोटात ९ महिने आणि पुढे सहा महिने दूध पाजून वाढवावे लागते. यामुळे स्त्रीची गुंतवणुकी फार जास्त असल्यामुळे स्त्रिया सहज सहजी कोणत्याही पुरुषाशी रत होत नाहीत. याकारणामुळे पुरुषाची नैसर्गिक उर्मी अशी असते कि उत्कर्ष बिंदू शी लवकरात लवकर पोचून शुक्राणू स्खलन करणे आणि आपले पुरुष बीज स्त्री मध्ये पोचवून पुढच्या संबंधाला तयार होणे. याउलट स्त्रीची भावनिक गुंतवणूक नसेल तर स्त्री या उत्कर्षबिंदू पर्यंत पोचतच नाही. केवळ उपचार म्हणून संबंध ठेवला जातो. यामुळेच स्त्रीला फुलवून मानसिक दृष्ट्या तयार करून उत्तेजित केल्यास स्त्री या परमोच्च बिंदू पर्यंत पोहोचू शकते. यावर बरेच काही लिहण्यासारखे आहे पण टँकाळा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Wed, 04/06/2022 - 14:25 नवीन
विस्तृत विवेचनाबद्दल धन्यवाद, पण माझा प्रश्न काहीसा वेगळा होता...
पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर मानसिक गुंतवणूक न करता सहजासहजी रत होऊ शकतो
टेक्निकली (म्हणजे बायोलॉजिकली) - होय ... पण त्याला असे रत व्हायला आवडेलच असे नाही. एखादी स्त्री लैंगिक संबंधाकरिता सहज उपलब्ध असूनही तिच्याबद्दल आकर्षण न वाटल्याने पुरुष तिला टाळतो - असे प्रत्यक्षात होते ना ? मग त्याचे कारण काय (इतर काही फॅक्टर्स असतील उदा: नको असलेली स्त्रीशी नाते जोडावे लागेल की काय ही भिती ई - ते बाजूला ठेवू) ? फार काय पैसे देवून सुख विकत घ्यायचे तेव्हाही पुरुष आपल्या पसंतीच्या स्त्रीकरिता प्रसंगी बरेच जास्त पैसे खर्च करतो. मग जर वीर्यस्खलन = कळसबिंदू = समाधान इतके साधे गणित असेल तर पुरुषाला एखाद्या विशिष्ट स्त्रीकरिता विशेष धडपड करण्याची काय गरज ? मला वाटते की जेव्हा पुरुषाला एखादी स्त्री अतिशय आवडते, हवीहवीशी वाटते तेव्हा त्याला अंतःप्रेरणेने असे वाटत असावे की ह्या स्त्रीशी संबंध ठेवताना/समागम करताना विलक्षण अद्वितीय असा आनंद मिळणार आहे - याचे नेमके जीवशास्त्रीय शब्दात स्पष्टीकरण मला देता येणार नाही. पण कुठेतरी त्याच्या मेंंदूतून वा शरीतातुन हे संकेत त्याला मिळालेले असतात आणि भविष्यात त्या स्त्रीशी होणार्‍या संभोगातून मिळू शकणारा विलक्षण अद्वितीय असा आनंद /लैंगिक समाधान हे त्याच्या त्या स्त्रीला मिळवण्याकरिता केलेल्या धडपडीमागील प्रेरणा होय. - याचीच दुसरी बाजू अशी की ज्या स्त्रीबद्दल अशी ओढ त्याला वाटत नाही पण संबंध ठेवायचे आहे तिच्याबाबत त्याची वृत्ती कदाचित तुम्ही म्हंटल्याप्रमाणे "उत्कर्ष बिंदू शी लवकरात लवकर पोचून शुक्राणू स्खलन करणे" अशी असू शकेल. मग त्या संभोगाचे वर्णन फक्त "लवकरात लवकत उत्कर्ष बिंदू वा कळस बिंदू गाठणे" असे असल्याने त्यातून स्त्री वा पुरुष कुणालाही त्यातून समाधान मिळण्याची शक्यता कमीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 04/06/2022 - 15:05 नवीन
प्रेम आणि वासना या संपूर्णपणे वेगळ्या भावना आहेत. वासनेने अंध झालेले नराधम दोन तीन वर्षाच्या कोवळ्या बालिकांवर सुद्धा बलात्कार करू शकतात. याच उलट जिच्यावर माणूस प्रेम करतो तिला थोडीसुद्धा इजा होणार नाही याची अतीव काळजी घेतो. आकर्षण हि या दोन भावनांच्या मधली एक भावना आहे. यामुळेच स्त्री एखाद्या वेळेस आकर्षणाला बळी पडून एखाद्या माणसाबरोबर वाहत जाते. परंतु केवळ आकर्षणापायी सहजासहजी त्याच्या बरोबर संबंध करेलच असे नाही. याउलट आकर्षणापायी पुरुष कोणत्याही स्त्रीबरोबर संबंध ठेवू शकतो. कारण संबंधात पुरुषाची गुंतवणूक हि काही क्षणापुरता असते तर स्त्रीची गुंतवणूक आयुष्यभराची असू शकते संतती नियमनाची साधने उपलब्ध झाल्याने स्त्रीला भावनिक गुंतवणूक न करता सुद्धा आकर्षक वाटणाऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे शक्य झाले आहे परंतु हे त्या अगोदर शक्य नव्हते. पुरुषाला एखाद्या स्त्री बद्दल( किंवा स्त्रीला पुरुषाबद्दल) आकर्षण का वाटते हा एक फार गहन विषय आहे. पण अशा आकर्षक वाटणाऱ्या स्त्री शी संबंध ठेवण्यास पुरुष सहज तयार होतो आणि ज्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटत नाही तिच्याशी संबंध टाळतो. या कारणासाठी लग्न झालेल्या स्त्रीपुरुषांनी आपण आपल्या जोडीदारास आकर्षक वाटतो का हा विचार ठेवणे आवश्यक आहे. आधुनिक काळात पुरुषांच्या उच्शृंखलपणावर बंधने आली आहेत परंतु पूर्वी बायको आकर्षक वाटत नाही या कारणासाठी माणसे सहज दुसरे लग्न करत किंवा अंगवस्त्र ठेवत असत किंवा देवदासी या प्रथेला पुरुषप्रधान संस्कृतीने मान्यता दिलेली होती. यात केवळ आकर्षण वाटते म्हणून आणि वासना शमन यासाठी दुसरी स्त्री राजरोसपणे "उपलब्ध" असे आणि त्याला समाजमान्यताही होती. असो मुद्दा विश्लेषण करण्यासाठी फार पाल्हाळ लावून लिहिले आहे क्षमस्व पुरुषाला एखाद्या विशिष्ट स्त्रीकरिता विशेष धडपड करण्याची काय गरज ? याचे उत्तर अतिशय त्रोटक शब्दात असे देता येईल. अल्कोहोल ३५ रुपये लिटर असताना माणसे सिंगल माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली च्या बाटली साठी ६-७००० रुपये ( लिटर मागे दहा हजार रुपये) का खर्च करतात? नशा त्यातील अल्कोहोल मुळेच येते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 04/07/2022 - 03:57 नवीन
खुपच छान उलगडा केलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 04/07/2022 - 03:57 नवीन
खुपच छान उलगडा केलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौथा कोनाडा Fri, 04/08/2022 - 14:10 नवीन
या वरून आठवले, मी काही वर्षांपुर्वी एका इंग्लिश मासिकात वाचले होते की काही स्त्रिया क्वचित प्रसंगी नुसत्या नटण्या-मुरडण्याने कळसबिंदू (ऑर्गॅजम) अनुभवू शकतात . यावर कुणी प्रकाश टा़कू शकेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
ह
हेमंतकुमार Fri, 04/08/2022 - 15:01 नवीन
स्त्रीचा कळस बिंदू दोन प्रकारे येऊ शकतो: १. जननेंद्रिय, स्तनाग्रे किंवा शरीराचे अन्य अवयव चेतवल्यामुळे २. लैंगिक स्पर्शाविना चेतावणी. मात्र या प्रकारात स्त्रीला स्वतः कल्पनाविलास करून लैंगिक भावनांनी युक्त अशी प्रतिमासृष्टी मनात उभी करावी लागते. काही स्त्रियांना स्वप्नात बिंदूचे सुख मिळालेले आहे. इथे एका स्त्री ची केस दिली आहे. ज्यात तिने योग आणि अन्य काही तंत्राच्या साह्याने अशाप्रकारे बिंदूचे सुख अनुभवले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 10:41 नवीन
तसेही स्त्रीच्या कळसबिंदूबद्दल अनभिज्ञ असलेल्या पुरुषाला त्याबद्दल दोषी ठरवणे अयोग्य.
>> ही अनभिज्ञता प्रौढपणी राहू नये हेच तर यासारख्या लेखनाचे प्रयोजन आहे ! त्यादृष्टीने हा विषय विविध दृक-श्राव्य माध्यमातूनही हाताळला जात आहे आणि तो पुरेसा हाताला जावाच. लेखात मी लस्ट स्टोरीज चे उदाहरण दिलेले आहे त्यातील काही संवाद आणि एकंदरच मांडणी सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 03/31/2022 - 18:53 नवीन
माझ्या मते पुरुषाला जोडीदाराबद्दल अतिशय आकर्षण असेल (शारिरिक , भावनिक ई सगळ्या पातळीवर) तर स्खलन लांबवून त्याला अधिकाधिक आनंद मिळेल आणि अधिक आनंद /समाधान मिळवण्याकरिता तो प्रयत्न करेलच... व विशेष काही शारिरिक समस्या नसल्यास त्याला ते नक्कीच शक्य होईल
खरेतर उलट प्रकार असावा. म्हणजे आकर्षण निर्माण झाले कि स्खलन लवकर होत असावे. नील फिती पाहताना हे विशेष्तः जाणवते.सगळ्याच हालचाली यांत्रिकपणे उरकत असल्यामूळे व भावनिक दृष्ट्या अजिबात न गुंतल्यामुळे कळसबिंदु बराच वेळ लांबवला जात असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
स
सुबोध खरे Fri, 04/08/2022 - 15:54 नवीन
आकर्षण निर्माण झाले कि स्खलन लवकर होत असावे. नाही. प्रत्यक्ष आणि प्रतिमा यातील फरक आहे. शिवाय निल फिती मध्ये असणाऱ्या सर्व स्त्रिया उत्तान आणि तारुण्याने मुसमुसलेल्या असतात आणि पुरुष मदनाचे पुतळे असतात. पुरुषांची लिंगे असाधारण अशी मोठी असतात. ( एकतर असेच पुरुष/ स्त्रिया निवडले जातात आणि पुरुषांना कृत्रिम लिंगे लावलेली असतात. यामुळे त्यातील पुरुष लिंग शैथिल्य न येता तासनतास रतिक्रीडा करू शकतात यामुळे या फिती पाहणाऱ्या पुरुषाला स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड येऊ शकतो/ येतो. त्याशिवाय performance anxiety ( कार्यसाफल्याची चिंता) म्हणजेच आपण स्त्रीला आनंद देऊ शकू का आणि स्त्रीला कळसबिंदु पर्यंत पोहोचे पर्यंत रतिक्रीडा करू शकू का याची चिंता/ तणाव आल्यामुळे लवकर वीर्यस्खलन होते. यातून आपल्या पौरुषाबद्दल आपली सखी शंका घेईल का हि पण चिंता मनात खात असते. याचाच बाबा कमाल खान बंगाली, वैद्यराज कृष्णभूषण उपाध्याय, आयुर्वेद भुवन, कतरी सराय सारखे लोक फायदा घेताना गल्लोगल्ली दिसतात. नवरा तरुण आणि सुंदर स्त्रीला समाधानी ठेवू शकत नाही म्हणूनती त्याच्या पश्चात ड्रायव्हर, धोबी, सुरक्षा रक्षक, विक्रेता यांच्याशी शरीर संबंध ठेवते अशा तर्हेच्या असंख्य नीलफिती पाहायला मिळतात. आपण सखीला अत्युच्च आनंद देऊ शकलो नाही तर ती आपल्याला सोडून जाईल हि भीती असलेलय पुरुषाच्या मनातील हि भीती अशा तर्हेच्या निल फिती पाहून अधिकच बळावते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
N
Nitin Palkar Wed, 03/30/2022 - 16:34 नवीन
अतिशय संवेदनशील विषयावरील शास्त्रीय माहितीने परिपूर्ण अस लेख. अनेक जाणकारांचे प्रतिसादही रोचक. 'निरामय कामजीवन' या डॉ. विठ्ठल प्रभूंच्या खूप पूर्वी वाचलेल्या पुस्तकातील एक वाक्य आठवले, ते असे आहे, 'पुरुष हा संभोगासाठी प्रेम करतो तर स्त्री प्रेमासाठी संभोग देते'.पौगंडावस्थेत हे पुस्तक वाचले होते, तेव्हा हे वाक्य मनात ठसले होते. पुढे अनुभवांती हे चुकीचे असल्याचे जाणवले. स्त्री कळसबिंदूबद्दल काव्यात्म वर्णन असलेली हि दोन सदाबहार मराठी गीते. विशेष म्हणजे या दोन्हींचे गीतकार मंगेश पाडगावकर आणि सुरेश भट हे पुरुष आहेत. https://www.youtube.com/watch?v=NUZ8EmudfLQ https://www.youtube.com/watch?v=8BvLj2KYvCg उत्तम लेखाबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 03/30/2022 - 16:41 नवीन
१.
स्खलन झाल्यावर 'आपले समाधान झाले म्हणजे जोडीदाराचेही समाधान झाले असणार' अशा गैरसमजातून अतिशय निर्विकारपणे जोडीदाराच्या शरीरापासून अलग होऊन ढाराढुर झोपून जाणारे महाभागही भरपूर असतात.
>>> चपखल वर्णन ! आवडलेच.
बायकोच्या कानात काहीवेळ जीभ घोळवल्या शिवाय
>> हीच ती विविधता. रोचक ! ...... २.
स्त्री कळसबिंदूबद्दल काव्यात्म वर्णन असलेली हि दोन सदाबहार मराठी गीते
>>> सवडीने नक्की ऐकणार. आभार !
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 03/30/2022 - 18:34 नवीन
लग्नाच्या आगोदर मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते! कुठेतरी मी उभाच होतो… कुठेतरी दैव नेत होते! लग्नानंतर वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही! उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? आशीच काही आनाडी जोडप्यांची आवस्था आसते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/30/2022 - 18:44 नवीन
अतिशय उत्तम लेख ! स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. हा.हा.हा... का कोणास ठावूक, पण मला मीच एक लिहलेला प्रतिसाद आठवला ! :))) [ तो खाली देतो ] साहित्यः- गुबगुबीत,लुसलुशीत टच्च पाखरु, स्वतः मधील प्रयोगशिलता. ;) कॄती:- पाखराला "मंद आचेवर" ठेवावे,त्याच्या फडफडी प्रमाणे आच कमी-जास्त करावी.पाखराचा राग-रंग पाहुन त्याला इथुन-तिथुन "व्यवस्थितपणे" परतवुन घ्यावे.चुंबनाची खमंग फोडणी द्यावी.साहित्य अत्यंत नाजुक असल्याने त्याची हाताळणी "हळुवारपणे" करावी.पाखरु व्यवस्थित "तयार" झाले आहे याचा अंदाज येताच,नजाकतीने त्याचा आस्वाद घ्यावा ! ;) (प्रेमळ ससाणा) जाता जाता :- मेंदू मधील न्यूरॉन्स अ‍ॅक्टीव्ह असणे देखील महत्वाचे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kelewali... :- Pandu
  • Log in or register to post comments
न
नगरी Mon, 04/25/2022 - 15:43 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
K
kool.amol Wed, 03/30/2022 - 20:01 नवीन
ह्या विषयावर लेखात उल्लेख केलेल्या डॉ मास्टर्स ह्यांच्या कार्यावर Masters of Sex ही वेबसिरीज आहे, amazon Prime वर. त्यांचं कार्य, आलेल्या अडचणी आणि संशोधन हे खूप छान पद्धतीने दाखवले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 04/02/2022 - 06:55 नवीन
Masters of Sex ही वेबसिरीज
>>> काल या मालिकेचा पहिला भाग बघितला. विषय सुंदर हाताळला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पश्चिमी देशांमध्ये सुद्धा ‘लैंगिकतेवर संशोधन’ या विषयाची टिंगल-टवाळी होत होती. प्रसूतीशास्त्र तज्ञ असलेल्या डॉ. मास्टर्स यांना, लैंगिकता हेदेखील एक विज्ञान आहे हे रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांच्या गळी उतरवायला किती कष्ट पडले, हे त्यात दाखवले आहे. विविध लैंगिक प्रयोग, त्यासाठी त्यांनी स्वतः तयार केलेली विविध उपकरणे हा भाग कौतुकास्पद आहे. एकंदरीत मालिकेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून नग्न आणि संभोग दृश्यांची रेलचेल असणार आहे याची झलक मिळाली. मालिका खूप मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण बघण्यासाठी वेळ देता येणे अवघड वाटते. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: kool.amol
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 03:59 नवीन
चांगल्या मनमोकळ्या चर्चेबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! १.
कदाचित हा एकुणच कुटूंबसंस्थेचा/ समाजरचनेचा दोष असू शकतो..
>>> विचार करण्याजोगा मुद्दा या लेखात मी लैंगिक जोडीदार हाच शब्दप्रयोग ठरवून वापरलेला आहे. विवाहित जोडपे हा या विषयाचा एक महत्त्वाचा आणि अन्य पैलू आहे. त्यावर स्वतंत्र लेखन व चर्चा देखील होऊ शकते. जाणकारांनी मनावर घ्यायला हरकत नाही ..... २.
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?
>>> छान काव्यात्मिक !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 04:06 नवीन
३.
मेंदू मधील न्यूरॉन्स अ‍ॅक्टीव्ह असणे देखील महत्वाचे.
>>> +११११ यासंदर्भात थोडी भर. लेखामध्ये योनीमार्गातील G बिंदूचा लेख आहे. अलीकडे वैज्ञानिकांनी या संदर्भात अधिक संशोधन केलेले आहे. G बिंदूतून निघणारे संदेश हे मेंदूतील एका विशिष्ट ठिकाणी पोहोचतात. त्याला तूर्त C बिंदू असे नाव दिलेले आहे. जसा स्त्रीचा संभोग अनुभव वाढत जातो तसा C अधिक विकसित होत जातो असे एक गृहितक आहे. मात्र सध्या हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. .... ४.
डॉ मास्टर्स ह्यांच्या कार्यावर Masters of Sex ही वेबसिरीज आहे
>>> उपयुक्त पूरक माहिती. छान. पाहीन.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 03/31/2022 - 09:29 नवीन
कामावर निघाल्यावर कामाची कमान कामिनीकडे देऊन आपण सुखरुप पडून राहून कार्यभाग साधावा हाच कमीतकमी श्रमात जास्तीत जास्त कर्मफळ मिळवून देणारा आणि काम सिद्धिस नेणारा उपाय दिसतो. अवांतर : स्त्रीयांचे शरीर आणि मन इतके गुंतागुंतीचे असते तर प्रयोग म्हणून एखाद्या शहराचा / राज्याचा कार्यभार केवळ स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात यासाठी एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. कदाचित त्यातून काही चांगल्या गोष्टींचा शोध लागू शकेल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 04/04/2022 - 15:39 नवीन
स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात हे पण तितकंच गुंतागुंतीचं आहे एकीकडं श्रीमती शीला दीक्षित किंवा श्रीमती सुमित्रा महाजन आहेत आणि दुसरीकडे श्रीमती जयललिता, श्रीमती मायावती आणि श्रीमती ममता बॅनर्जी आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
प्रसाद गोडबोले Wed, 04/06/2022 - 23:13 नवीन
माफ करा , पण ...
श्रीमती शीला दीक्षित किंवा श्रीमती सुमित्रा महाजन ,श्रीमती जयललिता, श्रीमती मायावती आणि श्रीमती ममता बॅनर्जी
ह्या धाग्यात ही नावे अपेक्षित नाहीत , अ‍ॅक्चुअली ही नावे वाचुन ठसकाच लागला =)))) सगळीकडे राजकारण आणायलाच हवे का ? थोडं थंड घ्या . २०२४ मध्ये मोदीच जिंकणार आहे हो , तुम्ही नका लोड घेऊ सर्वत्र ! आपण स्त्री लैंगिकतेचे गुढ ह्यावर बोलत होतो ना ? जरा चांगली नावे घ्या : सनी ताई लीऑनी , मियां खलिफां , डॅनी डॅनियल्स , एल्सा जीन्स वगैरे ... ;) हे सगळे आमच्या जनरेशन चे कदाचित तुम्हाला माहीती नसेल तर किमान तुमच्या जनरेशन्ची नावे सांगा हो , लेन्ना फोर्सेन आज्जी वगैरे ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हेमंतकुमार गुरुवार, 04/07/2022 - 03:11 नवीन
सनी ताई लीऑनी , मियां खलिफां , डॅनी डॅनियल्स , एल्सा जीन्स वगैरे ... ;)
>>> :)))))+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सुबोध खरे गुरुवार, 04/07/2022 - 06:47 नवीन
राजकारण मी आणलं नाही. एखाद्या शहराचा / राज्याचा कार्यभार केवळ स्त्रियांवर सोपवून त्या गुंतागुंतीचा कारभार कसा हाताळतात यासाठी एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. या वाक्याला दिलेला तो प्रतिसाद होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रचेतस गुरुवार, 03/31/2022 - 15:30 नवीन
लेख आणि प्रतिसाद अगदी बिंदूगामी आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 16:48 नवीन
* कामावर निघाल्यावर कामाची कमान कामिनीकडे देऊन आपण सुखरुप पडून राहून * अगदी बिंदूगामी
>> वरील वाक्यरचना आणि शब्दप्रयोग दोन्ही भलतेच आवडलेले आहेत ! बाकी, कामिनीस कामास लावून कमी श्रमात जास्त सुख कमवायची कल्पना भन्नाट आहे खरी... 😀
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 04/07/2022 - 04:03 नवीन
मानसिक असतं.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 04/09/2022 - 04:14 नवीन
लेख व चर्चेत न आलेला एक रंजक मुद्दा आता घेतो. उत्कटबिंदूच्या क्षणी पुरुषाप्रमाणे स्त्रीमध्ये सुद्धा द्रवस्खलन असते का, हा कुतूहल चाळवणारा प्रश्न आहे. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा. पुरुषांमध्ये सर्वांनाच वीर्यस्खलन होते. पण स्त्रियांमध्ये मात्र अनुभवभिन्नता भरपूर आहे. संभोगादरम्यान ज्या स्त्रियांमध्ये एका द्रवाचे स्खलन होते तो द्रव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. तो चवीस गोड असतो आणि अर्थातच लघवीपेक्षा भिन्न असतो. तीन प्रकारचे अनुभव वैद्यकात नोंदले गेले आहेत : १. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद चांगल्यापैकी असते त्या स्त्रियांमध्ये संभोगादरम्यान हा द्राव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. मुळात तो त्या छित्राच्या भोवती असलेल्या विशिष्ट छोट्या ग्रंथींमधून आलेला असतो. २. ज्या स्त्रियांच्या ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद कमी असते त्यांना वरील प्रमाणे अनुभव येत नाही. ३. अन्य काही स्त्रियांमध्ये या क्रियेदरम्यान प्रत्यक्ष लघवीचे थेंबही मूत्रछिद्रातून बाहेर येतात.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 04/10/2022 - 08:44 नवीन
संभोगादरम्यान ज्या स्त्रियांमध्ये एका द्रवाचे स्खलन होते तो द्रव मूत्रछिद्रातून बाहेर पडतो. तो चवीस गोड असतो
"मेरे प्यार का रस जरा चखना..ओय मखना" हे गीत वरील माहीतीनंतर एकदम अर्थपूर्ण वाटु लागले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sun, 04/10/2022 - 08:54 नवीन
हे गीत बडे मिया छोटे मिया या प्रसिद्ध चित्रपटातील आहे तर ! मुद्दाम ऐकले :) धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
ज
जेम्स वांड Sat, 04/09/2022 - 04:50 नवीन
बरेच दिवसांनी मिपावर फिरकल्याचे सार्थक झाले असे वाटले एकदम. विषय खरेच सखोल आहे, अन ह्याचा सम्यक परामर्ष घेणे काळाची गरज आहे, जननस्वास्थ्य, स्त्री रोग परामर्ष, संभोग विज्ञान ह्यांची चर्चा करणे अतिशय गरजेचे आहे, नाहीतर स्त्री/ पुरुष लैंगिकतेवषयी अगम्य मते असणारे सुशिक्षित लोकही दिसतात भरपूर समाजात आपल्या.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 04/09/2022 - 12:11 नवीन
विषय खरेच सखोल आहे, अन ह्याचा सम्यक परामर्ष घेणे काळाची गरज आहे,
>>> या व्यापक विषयाकडे बघता मला त्याचे तीन विभाग स्पष्ट दिसतात : १. बिंदूसुखाशी शरीर रचनेतील विविधतेचा संबंध २. मानसिक स्थितीचा संबंध ३. विवाहितांचे कामजीवन : या लेखात मी ठरवून लैंगिक जोडीदार हा शब्दप्रयोग वापरला आहे. एकदा का नवरा बायको या नात्याने या विषयाकडे पाहिले, की त्याला अनेक कंगोरे आहेत. वरील पहिल्या विभागातील संशोधन मला रोचक वाटले आणि सहसा ते इतर माध्यमांत या संदर्भातील लेखनात येत नाही. म्हणून एक प्रास्ताविक टीप देऊन हा मर्यादित विभाग लिहिला आहे. तिन्ही विभाग एकत्र करून भला मोठा लेख लिहिणे माझ्या आवाक्याबाहेर होते. अन्य विभागांवर सवडीने वाचन करून काही उपयुक्त माहिती मिळाल्यास इथे लिहीन. ....... बरेच दिवसांनी तुमची भेट झाल्याचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
व
वामन देशमुख Sun, 04/10/2022 - 12:18 नवीन
लेख आणि त्यावरचे प्रतिसाद, प्रति-प्रतिसाद सुरुवातीपासून वाचत आहे. माहितीपूर्ण आणि संयत मांडणी, कुमारेक. मूळ लेख आणि अनेक प्रतिसाद्स् आवडले. या धाग्यावर मिपावरच्या बहुतांश दिग्गजांनी हजेरी लावलीय आणि संयत ते उत्तेजक या दरम्यानचे सर्वच रंग उधळलेत (त्यातले काही रंग इतर काही धाग्यांवरही गेलेत!); मी पामर त्यात कसल्या करड्या छटा दाखवणार! बाकी, स्वतःसोबतच स्व-स्त्रीलाही कामतृप्ती मिळावी या प्रकारे प्रणय करणारा पुरुष, आणि त्याला तेवढीच भरभरून साथ देणारी स्त्री अशी जोडी असलेल्या मानवांसाठी, पृथ्वीवरचा स्वर्ग त्यांच्या बेडरूममध्येच (किंवा जिथे जमेल तिथे 😉) असतो असे म्हणता येईल! --- अवांतर: अ. प्रणय: १. फोरप्ले २. इंटरकोर्स ३. कुरवाळणे यांची तुलना - आ. जेवण: १. स्टार्टर्स २. मेन कोर्स ३. डेझर्ट यांच्याशी करता येईल का? --- अवांतरचे सवांतर: वरील अ १, अ २ साठी योग्य मराठी शब्द आणि अ ३ साठी मराठी व इंग्लिश शब्द सुचवता येईल का?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 04/10/2022 - 12:32 नवीन
धन्यवाद. अ /आ तुलना रोचक ! छान. १. फोरप्ले : संभोगपूर्व कामक्रीडा (लेखात दिलाय) / रतिक्रीडा २. इंटरकोर्स : संभोग, समागम, विषयोपभोग; रतिसुख; मैथुन. (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%97+) ३. कुरवाळणे : fondle, caress (https://www.google.com/search?q=fondle+meaning&sxsrf=APq-WBvv3h8pmdAUYqRVkIwbJ1YymevArA%3A1649586288748&source=hp&ei=cLBSYrr8K9HP2roPoPidmAo&iflsig=AHkkrS4AAAAAYlK-gBRR20k0eKtphRprEYW-DqqeGaoa&oq=fondle&gs_lcp=Cgdnd3Mtd2l6EAEYADINCAAQgAQQsQMQRhD5ATIFCAAQgAQyBQgAEIAEMgUIABCABDIFCAAQgAQyBQgAEIAEMgUIABCABDIFCAAQgAQyBQgAEIAEMgUIABCABDoLCAAQgAQQsQMQgwE6BwgAELEDEEM6CAgAEIAEELEDOgwIABCxAxBDEEYQ-QFQAFggYJ8paABwAHgBgAGNAogBiQeSAQUwLjEuM5gBAKABAQ&sclient=gws-wiz) ˈ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
व
वामन देशमुख Sun, 04/10/2022 - 12:43 नवीन
अरेच्चा, हे सर्व शब्द आणि त्यांचे अर्थही खरंतर मला माहीतच आहेत की! चव्वेचाळीशी उलटली, Educational Dysfunction (ED) होतंय की काय? 😉
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sun, 04/10/2022 - 12:47 नवीन
यावरूनच मराठी संस्थळावर मराठीत लेखन व चर्चा करण्याचे महत्त्व दिसून येते !! 😉
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
व
वामन देशमुख Sun, 04/10/2022 - 12:52 नवीन
बाकी, तुम्ही मिपावर रुळवलेल्या अनेक शब्दांचा कळसबिंदू हा कळसबिंदु शब्द आहे असे म्हणावे लागेल! 👏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sun, 04/10/2022 - 12:53 नवीन
असे "इडी" का होते यावर पुलं उवाच : सामाजिक संभाषणात इंग्लिशचा आधार घेण्यावरून पुलंनी त्यांच्या १९७४मधील लेखात मार्मिक टिपणी केलेली आहे ती अशी :
“.....त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटर्कोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो”.
( एक शून्य मी मधून )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
क
कानडाऊ योगेशु Mon, 04/11/2022 - 09:37 नवीन
जेवण व संभोग ह्यांची तुलना करणेबाबत
ह्या दोन्ही भावनांना म्हणुनच "भूक" ह्या एकाच शब्दाने संबोधत असावे. असेही वाचल्याचे आठवते कि एखादा माणुस जेवण कसे करतो ह्यावरुन तो संभोग कसा करत असावा ह्याचेही अनुमान लावता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ह
हेमंतकुमार Mon, 04/11/2022 - 10:02 नवीन
एखादा माणुस जेवण कसे करतो ह्यावरुन तो संभोग कसा करत असावा ह्याचेही अनुमान लावता येते
>>> रोचक आणि एकदम कडक वाक्य ! अधिक बोलणे नलगे एक सलाम स्वीकारावा 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
स
सुरिया Mon, 04/11/2022 - 10:46 नवीन
एखादा माणुस जेवण कसे करतो ह्यावरुन तो संभोग कसा करत असावा ह्याचेही अनुमान लावता येते.
रिअली? हे व्हिजुअलायझेशन पॉर्न समजुयात का? मान्य आहे हे एखाद्या व्यक्तीला बघुन होत ही असते पण जेवण्यासारख्या गोष्टीतले असे जनरलायझेशन? त्या हिशोबाने ब्रिटिश एटिकेटस पाळनारे, रॉयल फॅमिलीज वगैरे फारच हुच्च समजायला पाहिजेत सेक्स मध्ये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
क
कानडाऊ योगेशु Mon, 04/11/2022 - 19:08 नवीन
त्या हिशोबाने ब्रिटिश एटिकेटस पाळनारे, रॉयल फॅमिलीज वगैरे फारच हुच्च समजायला पाहिजेत सेक्स मध्ये. ;)
लोल. ह्याला फारतर ट्रेन्ड बिहेविअर म्हणता येईल. पण एखाद्या गाफिल क्षणी खरी मानसिकता(पसायकॉलोजी) दिसुन येत असावी. माझ्या कंपनीतला किस्सा सांगतो. दुपारचे लंच फ्रि असते कंपनीत व कधी कधी केटरर एखादा फास्ट फुड आयटम पण ठेवत असत. एका दिवशी पहिल्यांदीच त्याने पाणीपुरी ठेवली. प्रत्येक जण खायला उतावीळ झाला होता. सगळ्यात जास्त उतावीळ झाला होता कंपनीचा एम.डी ज्याचा पगार कोटी मध्ये असावा.आणि त्यावेळी सगळे स्टेटस वगैरे विसरुन अक्षरशः हमरीतुमरी करुन रांगेच्या अग्रभागी आला आणि पाणीपुरीची डिश घेतली. एरवी शहरातली महागतली महाग व उत्कृष्ठ अशी कुठलीही डिश तो घेऊ शकत होता पण त्यावेळेला त्याची ती मानसिकता अचानक समोर आली. त्यानंतर अनेक वेळा केटरर ने पाणीपुरी ठेवली होती पण नंतर आमचा एम.डी कधीही पुन्हा तसे करताना दिसला नाही. कदाचित त्यालाही तो प्रकार तितकासा बरोबर नव्हता हे जाणवले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
ह
हेमंतकुमार Tue, 04/12/2022 - 03:59 नवीन
तुमचा मूळ मुद्दा अगदी पटला आहे. घाईघाईत उरकणे की आस्वाद घेत करणे हे बऱ्याच कृतींना लागू होते. .............. आता तुम्ही वर जो जेवणाचा किस्सा लिहिला आहे त्यानिमित्ताने थोडेसे अवांतर लिहिण्याचा मोह होतोय. संदर्भ जरा वेगळा आहे. क्षमस्व. विजय तेंडुलकरांचा ‘एक भूक दंगल’ नावाचा एक फार सुंदर लेख आहे. अन्न फुकट मिळतंय म्हटल्यावर कुठल्याही सामाजिक स्तरातील माणसे त्यावर कशी तुटून पडतात त्याचे त्यात सुरेख वर्णन आहे. लेखातले फक्त शेवटचे वाक्य उद्धृत करतो:
आपला स्वाभिमान, सुसंस्कृतपणा, प्रतिष्ठा, विवेकीपणा, शिस्त, संयम, झालेच तर सभ्यपणा यांचे मूल्य कितीतरी वेळा एकच असते : विनामूल्य
!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
ट
टर्मीनेटर Tue, 04/12/2022 - 17:00 नवीन
अरे वाह... चर्चा चांगलीच रंगली आहे! गेले काही दिवसा मिपा वर येणे झाले नव्हते त्यामुळे चर्चेत सहभागी होता नाही आले त्यासाठी क्षमस्व.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 04/13/2022 - 04:51 नवीन
अभिप्राय, पूरक माहिती आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्व सहभागी मंडळींचे आभार ! लैंगिक जागरुकता या उद्देशाने हा लेख लिहिला. या नाजूक विषयाबद्दल आपण सर्वांनी केलेली चर्चा रंजक आणि माहितीप्रद होती. आपणा सर्वांना दीर्घकाळ उत्तम लैंगिक आरोग्यसुख लाभो !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/13/2022 - 08:25 नवीन
आपणा सर्वांना दीर्घकाळ उत्तम लैंगिक आरोग्यसुख लाभो !
धागोचित शुभेच्छा ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 04/14/2022 - 10:02 नवीन
तर्कवादी, कानडाउ योगेशु, सुबोध खरे इ. चे प्रतिसाद विशेष आवडले. शारिरिक संबंध हा शब्द प्रयोग ज्यावेळी व्यवहारात, न्यायालयात वापरला जातो त्यावेळी त्याचा अर्थ प्रत्यक्ष संभोग क्रिया घडलेली आहे असा आहे का? प्रत्यक्ष संभोगा व्यतिरिक्त अन्य प्रणयक्रिडा याचा समावेश असल्यास देखील ते शारिरिक संबंधच असतात की! संभोगात फक्त गर्भधारणेचा धोका असतो तो प्रणयात नसतो. मग शारिरिक संबंध या शब्दप्रयोगाची व्याप्ति कशी आहे?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 04/14/2022 - 10:34 नवीन
संबंध या शब्दाचे शब्दकोशातील अर्थ असे आहेत : पु. संयोग; संसर्ग; नातें; २ (ल.) विवाह; लग्न. https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7+ आणि लग्न म्हटले की संभोग गृहीत आहे. आता कायद्याचे म्हणाल तर आपल्याकडील मूळ कायदा इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे मूळ इंग्लिश शब्द तिथे काय वापरले जातात आणि त्यांच्या व्याख्या काय हे न्यायालयीन अभ्यासक सांगू शकतील. कायद्यामध्ये बलात्कार, विनयभंग इत्यादी शब्दांच्या व्याख्या सुस्पष्ट आहेत. परंतु निव्वळ शारीरिक संबंधच्या व्याख्येबाबत कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा