जे न देखे रवी...
पंचमीतले रंग सांडले........
Primary tabs
पंचमीतले रंग सांडले
झाडांनी ते बघा झेलले
डोक्यावरती तुरे गुलाबी
धुंद होऊनी फाग नाचले
लुसलुशीत ही कवळी पाने
मोहरून गेली सर्वच राने
आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती
ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी
कोण चितारी चित्र काढतो
रंगांची रागदारी मांडतो
कोकीळ मंजुळ कुजन करते
मन मुदित हिंदोळ्यावर झुलते
कसरत
२९-३-२०२२
छान आहे
आवडली
+१
सुरेख!
फाग म्हणजे फाल्गुन का?
"फाग ", होळी च्या वेळी गायचा एक उपशास्त्रीय लोकगीताचा प्रकार आहे. फाल्गुन महिन्यांत उत्तर भारतात प्रभू रामचंद्र,राधाकृष्ण, निसर्ग यावर रचलेली गीतांवर लोक नाचतात.
अवधी, बुंदेलखंडी,छत्तीसगढी आसे प्रदेशानुसार वेगवेगळे प्रकार.
होय,मी नुकतीच एका गायिकेची मुलाखत ऐकली.त्यात उत्तर भारतात होळी आणि भारतीय क्लासिकल होळी गीतांच महत्त्व खुप आहे,हे सांगितलं होतं.जवळपास तीन महिने या गीतांचा बहर असतो.
छान माहिती!
रंगात नहाले
व्वा, सुरेख रंगपुर्ण रचना + १
🌈
धन्यवाद चौको जी