||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)
नमस्कार मिपाकर्स
या गुढीपाडव्याला, 2एप्रिल, रात्री 8.30 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात " राधायन .. एक सांगीतिक कथादर्शन" हा कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं हे आग्रहाचं आमंत्रण.
नवीन कथा, गीते, संगीत व नृत्ये, आणि या सा-यांच्या जोडीला चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक, असा अनोखा मेळ साधणारा कार्यक्रम, "राधायन- एक सांगीतिक कथादर्शन, गुढीपाडव्याच्या शुभदिनी,
'राधा-कृष्ण' हा म्हटलं तर परिचित विषय; पण कल्पनेला, प्रतिभेला सतत आवाहन करणारा! राधेच्या वृंदावनातील वास्तव्याच्या आणि कृष्णसहवासाच्या अनेक आख्यायिका आहेत. परंतु कृष्ण वृंदावनातून बाहेर पडल्यानंतरच्या राधेबद्दल आपणास फार माहीत नाही. राधेच्या आयुष्याच्या या अपरिचित पर्वात जर आपल्याला डोकावायला मिळालं तर?
"राधायन" हा असाच एक प्रयत्न ज्याच्या पूर्वाधात आणि उत्तरार्धातही राधा आहे. श्यामध्यास, श्यामस्वप्न, श्यामरंग ल्यायलेल्या राधेच्या कृष्णापर्यंत पोचणा-या एका कल्पनेतील प्रवासाचे वर्णन साकारणारा अविष्कार म्हणजे राधायन.
"राधायन" म्हणजे राधा आणि अयन (अयन म्हणजे प्रवास).
कथा व कथन- डॉ. प्राची जावडेकर
संगीत- डॉ. आश्विन जावडेकर
निवेदन- मंजुषा अमीन
कला - शिल्पा बेंडाळे
प्रकाश- अतुल जोशी, आकाश पांचाळ
लाईव्ह पेंटिंग- शिल्पा बेंडाळे
गायन- श्रीराम नरसुळे, वृशाली देढे, डॉ.आश्विन जावडेकर
नृत्य- अनन्या गोवित्रीकर, चिन्मय जोशी. प्रिया समर्थ, प्रतिक्षा फडके, यशश्री जोशी, तन्वी घनवटकर.
गीते- संत एकनाथ, पु. शि. रेगे, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, मनोहर नाईक, संगीता जोशी, प्रदीप कुलकर्णी, डॉ प्राची जावडेकर, डॉ आश्विन जावडेकर
साथसंगत- डॉ. हिमांशू गिंडे, गौरव मूरकर, अभिजित करंजकर, अभिषेक प्रभू, श्रेयस कांबळे
समूह गायन- डॉ श्रद्धा नाटेकर काळे, रमा अमीन, ओवी जावडेकर उक्ती जावडेकर.
रंगमंच साहाय्य- वर्षा ओगले, मानसी जोशी,
ध्वनी- यतीश पाटील
ध्वनिमुद्रण- गणेश पोकळे, ऑडिओ आर्ट्स.
छायाचित्रे- आमोद घैसास, मंगेश खानविलकर
संयोजन व मार्गदर्शन- श्री. सुमुख वर्तक
तिकिटे नाट्यगृहावरती तसेच www.ticketkhidakee.com येथे उपलब्ध आहेत.
नक्की या आणि प्रोत्साहन द्या.
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्षेत आहोत.
😎