Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकटेपणा- सत्य कथा

म
मार्गी
Wed, 04/13/2022 - 14:38
💬 4 प्रतिसाद
मी प्लॅटफॉर्मवर पोहचलो. भरपूर लोक दिसत आहेत. थोडी गर्दी आहे. पण माझ्यासारखा कोणीच नाही. मला एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. कोणीही माझ्यासारखा दिसत नाहीय. असह्य एकटेपणा! मला खूप अस्वस्थ व बेचैन वाटतंय. नकळत मी सारखा बघतोय कोणी माझ्यासारखा दुसरा आहे का. किती तरी वेळ गेला. गर्दीतही मी एकटाच. भीड में भी अकेला. असह्य एकटेपणा मला अस्वस्थ करतोय. मनात विचार सुरू आहे की माझ्यासारखा दुसरा कधी येईल, कधी येईल. आणि दूरवर एक जण दिसला. त्याचं येणं मला दिलासा देतंय. तोही एकटा असावा. तोही मला शोधतोय. आणि अखेर त्याची व माझी नजरानजर झाली. आता आम्ही दोघंही निश्चिंत झालो. आता आम्ही एकटे नाही. असा माझा एकटेपणा संपला जेव्हा मला भेटला दुसरा मास्कवाला. - निरंजन वेलणकर.

प्रतिक्रिया द्या
2650 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मुक्त विहारि Wed, 04/13/2022 - 15:59 नवीन
त्यामुळे, आता मास्कवाला भेटणे, हा कपिलाशष्ठी योग ...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/14/2022 - 08:22 नवीन
लोक लैच रील्याक्स झालेली आहेत सरकारने ५०० रुपये दंड लावला तेव्हा राग आला होता, पण आता लोक जसे वागतात ते पाहिले की लक्षात येते सरकार बरोबरच होते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 04/14/2022 - 09:38 नवीन
रस्त्यावर पचापचा थुंकणारे सभ्य (?) लोक्स पाहिले की मास्कची महती पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
च
चौथा कोनाडा Tue, 04/19/2022 - 14:18 नवीन
मास्क बाजूला करून पचापचा थुंकणारे सभ्य लोक्स पाहिले की त्यांच्या शिस्तीची महती पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा