Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
पहाटेच्या वेळी शहरातुन गावाकडे आलेल्या गाड्या गावच्या वेशीपाशी करकचुन ब्रेक लावुन थांबल्या. गाडीतली पेंगत असलेली लहानथोर मंडळी दचकुन जागी झाली . समोर नजरेतली ओळख हरवलेले शेकडो गावकरी उग्र मुद्रेने काठ्या घेउन उभे होते . त्यांनी गावात जाणारी वाट अडवली होती . "पावणं , तुम्ही शहरातली रोगराई घेउन गावात येतायसा . तुम्हाला इथं प्रवेश नाही ." " व्हय .आलात तसं गपगुमान माघारी जावा , न्हाईतर हि काठी पघितलीत. " आलेले पाव्हणे निरुपायाने शहराकडे परतले . यथावकाश रोगराई ओसरली . गाववाल्यांना रोजंदारीसाठी शहराकडे जाण्याची निकड भासु लागली . गावाकडुन शहरातील पाव्हण्यांना रोज गोडीगुलाबीचे फोन , खुशाली विचारणारी पत्रे जाउ लागली. पण त्यांच्या पत्रांना उत्तर मिळत नव्हते . फोन कट केले जात होते . दोर कायमचे तुटले होते .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

+1 कुणीतरी लिहायला पाहिजे होतेच

काहीही झाले तरी अशी स्थिती येणं कठीण असतं. सुरतेच्या प्लेगच्या वेळी इतर शहरांनी सुरतच्या लोकांना आपल्या कॉलोनीत प्रवेश नाकारला होता पण ती लाट ओसरून गेल्यावर 'टु अँड फ्रॉम सुरत' असा नियमित प्रवास सुरु झाला.

+१ इतर ठिकाणचे माहित नाही, मात्र अशी परिस्थिती कोकणात नक्की होती.