Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
म्हातारी भोपळ्यात बसली मुलीचा निरोप घेतला. “ह्याचा ब्रेक आणि अॅक्सिलेटर कुठेय?” “आई, हे गुगलचे मॉडेल आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते.” “म्हणजे एआय ना?” “”चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.” अस म्हटले कि गाडी पळायला लागते. ह्या गाडीला नॅचरल लँग्वेज इंटरफेस आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी पळवावी. बाय आणि टेक केअर.” वाटेत वाघोबा दिसला. स्कूटरवर बसून वाटच बघत होता. “म्हातारे, थांब. कुठं पळतेस?” “आता काय झालं?” “म्हातारे, ये भोपला मुझे दे दो.” म्हातारीने कावा ओळखला, ऑर्डर दिली, “भोपळ्या, फास्ट फॉरवर्ड.” सुसाट धावणाऱ्या भोपळ्यापुढे स्कूटरची काय कथा. गंमत बघत असलेला कोल्हा म्हणाला, “वाघोबा, तू केव्हापासून भोपळ्याची भाजी खायला लागलास?” “मूर्खा, ती भोपळागाडी पेट्रोलशिवाय धावते.”
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

काहीतरी मिसींग आहे. भोपळा आणि म्हातारी हा विषय वाचल्यावर खरंतर अपेक्षा वाढल्या होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. सं - दी - प

पेट्रोल महाग झाल्याने वाघोबा स्कूटर सोडून पेट्रोलशिवाय चालणारा भोपळागाडी मागतोय असं असावं.. कथा खुसखुशीत झाली.. वाचून मस्त मनोरंजन झाले.
“म्हातारे, ये भोपला मुझे दे दो.
हे सर्वाधिक आवडलं.. अर्थातच +१