Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

या दोंघीमध्ये जास्त सुंदर कोण???

उ
उम्मि
Tue, 12/09/2008 - 09:27
🗣 57 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14897 वाचन

💬 प्रतिसाद (57)
न
नाम्या झंगाट Tue, 12/09/2008 - 09:32 नवीन
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/09/2008 - 09:46 नवीन
काय मंडळी, विचारात पडलात ना? नक्कीच. कारण फोटो दिसतच नाहीत!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 12/09/2008 - 10:00 नवीन
काय मंडळी, विचारात पडलात ना? नक्कीच. कारण फोटो दिसतच नाहीत!! सहमत....... (जजंतरम ममंतरम .....) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 12/09/2008 - 12:36 नवीन
उम्मि यांनी चर्चाप्रस्ताव अद्ययावत केल्याने हा प्रतिसाद संपादित केला आहे. त्यापूर्वी येथे मी न दिसणारे फोटो 'दिसवले' होते. :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/09/2008 - 10:11 नवीन
प्रश्न चुकलाय ... प्रश्न असा हवा, यांपैकी सर्वांत सुंदर कोण १. मायावती, Image removed.Image removed. २. ममता बॅनर्जी Image removed. ३. तुलना केवळ अशक्य आहे! ४. हा ऑप्शन दिल्याबद्दल लेखकाला धरून हाणा (मला नाही, मी लेखक नाही, मी करेक्टर आहे) - टारझन
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 12/10/2008 - 05:35 नवीन
काय पण आपल्या टारूची आवड आहे........ :) करेक्टरला धरून हाणा.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
क
केवळ_विशेष Tue, 12/09/2008 - 10:12 नवीन
कुटंशी हायसा...?
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Tue, 12/09/2008 - 10:15 नवीन
पावरबाझ टारझन भौ... फुटलो...आराराअरार्राआआ राआअ :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 12/09/2008 - 11:22 नवीन
आता चित्रे दिसायची व्यवस्था केली आहे.. माझं उत्तर - पर्याय १, अर्थातच मधुबाला! माझ्या मते - माधुरी काय किंवा इतर कुणी काय, बर्‍याच नट्या आपापल्या जागी सुंदर आहेत, सुरेख आहेत. परंतु मधुबालाशी कुणाशीच तुलना होऊ शकत नाही...मधुबालेच्या आसपासही कुणी जाऊ शकत नाही! मधुबाला एकमेवाद्वितीय आहे, ती सौंदर्याची व्याख्या आहे! आपला, (मधुबालाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 12/09/2008 - 12:37 नवीन
मधुबाला एकमेवाद्वितीय आहे, ती सौंदर्याची व्याख्या आहे! सहमत आपला मधुबालाप्रेमी - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसुनाना Tue, 12/09/2008 - 12:47 नवीन
तात्यांच्या सव्वा लाखात माझेही पाच रुपय्या बारा आना. पण कमाल अमरोही म्हणत की तिने एक विदुषकाशी लग्न केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 12/09/2008 - 12:49 नवीन
पण कमाल अमरोही म्हणत की तिने एक विदुषकाशी लग्न केलं. अमरोहींना इनोची गरज आहे/असावी! असो, आपला, (किशोरकुमार गांगुलींचा कट्टर भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
विसुनाना Tue, 12/09/2008 - 12:59 नवीन
अमरोहींना इनोची गरज आहे/असावी! अमरोहींना इनोची गरज होती! गेले.ते १९९३ साली अल्लाला प्यारे झाले. पण तशी पोटदुखी बर्‍याच जणांना झाली असेल ना, तात्या? - किशोरकुमार गांगुलींना एकदाही न भेटू शकलेला पण तरीही कट्टर भक्त ! ;):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऋ
ऋषिकेश Tue, 12/09/2008 - 13:54 नवीन
माधुरी काय किंवा इतर कुणी काय, बर्‍याच नट्या आपापल्या जागी सुंदर आहेत, सुरेख आहेत. परंतु मधुबालाशी कुणाशीच तुलना होऊ शकत नाही
सहमत आहे मात्र हे वाक्य अनुष्का वहिनींनाहि लागु का हो तात्या? :) ;) -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
उ
उदय सप्रे Fri, 12/12/2008 - 09:53 नवीन
तात्यासाहेबांच्या मताशी एकदम सहमत ! खूप (२०-२२)वर्षांपूर्वी शिरीष कणेकर यांचा लोकसता मधे "प्रीय दिक्षितांच्या माधूरीस" नावाचा एक लेख वाचला होता त्यातील एक वाक्य अजून लक्षात आहे : लोक तुझी तुलना मधुबालेशी करतात , पण मला त्यांना त्रिवार सांगावंसं वाटतं की, एकतर त्यांनी तुला नीट पाहिलेलं नसावं किंवा मधुबालेला पाहिलेलंच नसावं ! मुंगुसासारखं तोंड असलेल्या अनिल कपूर समोर तुझं सौंदर्य खुलून दिसत असेलही , पण म्हणून काहे तू मधुबाला नव्हेस ! मला माधुरी कितीही आवडत असली तरी, मधुबाला ती मधुबालाच ! आता यावर माझी एक चारोळी : घडवल्यावर तिला (मधुबालेला) त्याला (परमेश्वराला) वाटलं, "आपली बाकीची सर्व निर्मिती नगण्य!" अशी ही एकच- मधुबाला-म्हणजेच ..... मदिरेशिवाय धुंदावणारं बावनकशी लावण्य !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 12/12/2008 - 10:54 नवीन
मुंगुसासारखं तोंड असलेल्या अनिल कपूर समोर तुझं सौंदर्य खुलून दिसत असेलही , पण म्हणून काहे तू मधुबाला नव्हेस ! सहमत आहे. शिवाय लोकांनी माधुरीची प्रथम दखल घेतली ती 'एक दो तीन..' या तेजाबमधल्या तिच्या गाण्यामुळे. त्यानंतर सैलाबमध्ये तिने बेंबी उघडी टाकून केलेला एक नाच, त्यानंतर 'घक घक करने लगा..' हे बेटा चित्रपटातलं तिचं एक उत्तान गीत. माधुरीला पुढे येण्याकरता असे अनेक उद्योग करावे लागले. आमच्या मधुबालेचं केवळ एक लडिवाळ हास्य पुरेसं असे! :) मुळात इथे काही लोकं माधुरी आणि मधुबालेची तुलना करताहेत हेच मुळी हास्यास्पद आहे. कारंण मधुबालेशी कुणाची तुलनाच होऊ शकत नाही. ती केवळ अतुलनीय आहे, एकमेवाद्वितीय आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे! तिच्या केवळ एका लडिवाळ हास्यात तिच्या खानदानी सौंदर्याचं दर्शन होत असे. ते दखवण्याकरता तिला अन्य कोणतेही चाळे कधीही करावे लागले नाहीत.. असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
र
रेवती Tue, 12/09/2008 - 13:56 नवीन
करता येत नाही. करूही नये. त्या दोघीही सुंदर आहेत. त्यांनी त्यांची कारकीर्द त्या त्या वेळी गाजवलेलीच होती. यश हे फक्त कुणाचे किती सिनेमे हिट होतात यावर मोजले जाते. नट नट्या यांच्या साठी ते बरोबरही आहे, पण आयुष्याच्या सर्वांगीण यशापयाचा विचार केला तर चित्र वेगळेच दिसते. एकंदरीत तुलना मान्य नाही. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 12/09/2008 - 17:38 नवीन
हेच म्हणतो.. तुलना अशक्य आहे. दोघिही तितक्याच सुंदर आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रभाकर पेठकर Tue, 12/09/2008 - 19:01 नवीन
प्राजु, हेच म्हणतो..???? कमालच झाली... निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शंकरराव Tue, 12/09/2008 - 14:26 नवीन
किती आल्या किती गेल्या .. आपली आवड आहे मधुबाला
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Tue, 12/09/2008 - 15:14 नवीन
तु कुठून ह्या दोन विश्व-बंदर्‍यांना आणून टाकले... =)) =)) पण मला तर किशोरकुमारचा हेवा वाटतो...काय चीज मिळाली होती भिडुला? मला तर स्वप्नातही ती दिेसते....
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 12/09/2008 - 15:49 नवीन
आळीपाळीने दोघीही स्वप्नात येतात :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 12/09/2008 - 17:43 नवीन
पाहता मधुबाला माधुरीला अमुचा कलिजा खलास झाला! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 12/09/2008 - 19:24 नवीन
मधुबाला! प्रश्नच नाही. माधुरी आणि मधुबालात काडीचंही साम्य नाही.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 12/10/2008 - 05:23 नवीन
काडीचंही साम्य नाही हे अगदी चुकीचं आहे. काही वर्षांपूर्वी यशराज चं एक पोस्टर (दिल तो पागल है) वरून मी माधुरीचं मोठं पेन्सिल स्केच पोर्ट्रेट केलं होतं. त्यात एक महत्त्वाची गोष्ट समजली ... की सहजपणे जे दिसतं त्या पलिकडे प्रत्यक्षात त्या दोघींच्या चेहर्‍यात बरंच साम्य आहे. चित्र अपूर्ण असताना बर्‍याच गोष्टी मधुबाला सारख्या वाटायच्या आणि जसं जसं मी बारकावे भरत गेलो तसं माधुरीचा चेहरा समोर येत गेला. त्यात हे जाणवलं की त्यांच्या चेहर्‍यावरील सौंदर्य स्थळांमध्ये बरंच साम्य आहे! आणि कदाचित हेच कारण आहे की इथेही तुलनेसाठी याच दोघींचा विचार झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
स
सखाराम_गटणे™ Tue, 12/09/2008 - 19:43 नवीन
खरे, सौद्र्य पारखुन बघितल्याशिवाय समजत नाही.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/09/2008 - 19:50 नवीन
माधुरी या दोघींमध्ये सुंदर... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/09/2008 - 20:39 नवीन
मला तर बाबा या दोघींमधे पण आयेशा ताकिया आणि कत्रिना च सुंदर वाटतात - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
पिवळा डांबिस Wed, 12/10/2008 - 04:45 नवीन
फक्त चेहरा विचारात घेतला तर नि:संशय मधुबाला.... पण आख्खी हिरॉईन विचारात घ्यायची झाली तर माधुरी.... मधुबाला चेहरा सोडला तर बाकी फिगरवाईज पिंप दिसायची.... (मधुबालाप्रेमी, माफ करा, पण ते सत्य आहे...) पण माधुरी मात्र एक एक इंच घटवून खर्‍या मदनिकेसारखी झालीय.... खरं तर अशी तुलनाच अयोग्य आहे.... पूर्वीच्या प्रेक्षकांना सुंदर चेहरा असलेली पिंप चालायची..... आत्ताच्या प्रेक्षकांना अंगप्रत्यंग ही महत्वाची वाटतात.....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 12/10/2008 - 05:41 नवीन
=)) सौदर्य हे सर्वागांतुन प्रत्ययास आले पाहिजे. मधुबालाचा चेहरा व नजर समोरच्याला घायाळ करते. बाकी तिची देहयष्टी बद्दल बोलत नाही .दोघीची तुलना योग्य नाही .माधुरीचे नृत्य खुपच छान असतात. देवदास मध्ये तर तिने ऍश्वर्याची सुट्टी केली आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 12/10/2008 - 23:47 नवीन
थेंकू!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
पक्या गुरुवार, 12/11/2008 - 03:37 नवीन
पर्याय २: माधुरी दिक्षीत
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 12/11/2008 - 03:42 नवीन
तुलना अशक्य असली तरी मधुबाला ती मधुबालाच !!!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/11/2008 - 03:49 नवीन
मधुबाला ती मधुबालाच !!!! जियो..! :) आपला, दिलीपतात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव
ख
खादाड_बोका गुरुवार, 12/11/2008 - 03:57 नवीन
ज्याचे नशीब तसे त्याला ती मिळली.... मला तर स्वप्नातही ती दिसते....
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 12/11/2008 - 07:55 नवीन
माधुरी दिक्षित अद्वितीयच आहे मधुबालाही सुंदर होती. पण तेव्हा कृष्णधवल छायाचित्रांचा जमाना होता. त्यामुळे चेहर्‍याची खरी नजाकत रंगीत चित्रांत जास्त कळते. माधुरीचा कृष्णधवल फोटो पहा...मग लगेच कळते, माधुरीसारखी सुंदरी दुसरी नाहीच :) (माधुरीभक्त) सागर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/11/2008 - 08:12 नवीन
मालकी हक्काचा वापर करून मधुबालेचा पर्याय न निवडणार्‍या लोकांचे प्रतिसाद उडवून टाकीन...! :) ह घ्या! आपला, (बर्‍यावाईट, वैध-अवैध, कोणत्याही थराला जाणारा मुमताज बेगमचा कट्टर प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/11/2008 - 08:32 नवीन
(बर्‍यावाईट, वैध-अवैध, कोणत्याही थराला जाणारा मुमताज बेगमचा कट्टर प्रेमी) तात्या.
ते प्रेमी पाहिलं की मला ते गाणं आठवायला लागलंय हल्ली .. तु प्रेमि आह्हा ... मै प्रेमि आह्हा .... =)) =)) =)) - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सागर गुरुवार, 12/11/2008 - 12:42 नवीन
अहो तात्या.... जनरेशनप्रमाणे आवड बदलणारच की? मधुबालेचा काळ हा तिचाच होता. तशी आपल्याला मधुबाला पण आवडते. पण माधुरी जरा जास्तच आवडते त्याचे कारण म्हणजे "तेजाब"पासून या पोरीने जो हृदयांत सूर मारलाय तो ती २ पोरांची आई झाली तरी अजून बाहेर निघायचे नाव घेत नाहीये :) कॉलेजमधे होतो तेव्हा मी तात्या.... तवा गरिबाच्या भावना समजून घ्या मालक.... (माधुरीभक्त) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया गुरुवार, 12/11/2008 - 08:39 नवीन
माधुरी -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 12/11/2008 - 13:49 नवीन
खरे म्हणजे चांगला मेकअप आणि व्यावसायिक फोटोग्राफरची करामत, यामुळे निव्वळ फोटोवरून खर्‍या सौंदर्याचा अंदाज येत नाही. केवळ चेहरा हा निकष होऊ शकत नाही हे वर सांगितलेले आहेच, त्याच्याशी सहमत. तेव्हा दोघींचे मेकअपशिवायचे, साध्या वेशातील अनेक फोटो असतील तरच निश्चित सांगता येईल. आता ह्या फोटोंवरूनच मत द्यायचे तर माधुरीला, यात शंका नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/11/2008 - 14:14 नवीन
मी वर फोटूंत दिलेल्या मौडेल्स कधीच मैक अप करत नाहीत... पहा ... आणि फोटूग्राफर पण साधेच असावेत. त्यांच्यावर मतप्रदर्शन करा ... नाही तरी प्रश्न चुकीचाच आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील गुरुवार, 12/11/2008 - 14:25 नवीन
खो खो खो माझं मत ममता बॅनर्जीला!! (मला बंगाली आवडतात!!) सुनीलदा Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 12/11/2008 - 18:23 नवीन
यामुळे निव्वळ फोटोवरून खर्‍या सौंदर्याचा अंदाज येत नाही. केवळ चेहरा हा निकष होऊ शकत नाही हे वर सांगितलेले आहेच मला बॉ ही वाक्ये विप्र स्टाईल अर्थात क्रिप्टिक वाटतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 12/12/2008 - 10:20 नवीन
हे पहा - http://www.koolstuffs.net/2006/03/20/bollywood-actress-without-makeup/ आणि आता नुसत्या चेहेर्‍याबद्दल म्हणत असाल तर मधुबाला (किंवा लीना चंदावरकरही) = सुंदर चेहेरा असलेले पिंप, हे समीकरण!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
उ
उम्मि गुरुवार, 12/11/2008 - 14:34 नवीन
समजा मला या दोंघिनी लग्नाची मागणी घातली असती तर........ मी जराही वेळ न दवडता 'माधुरीलाच' पसंत करीन. उम्मिच परीक्षण : मधुबाला मध्ये समोरच्याला घायाळ करणारे, विरघळवणारे सौंदर्य आहे. या सौंदर्यात पुरुष बेहोश होइल. स्वताला विसरेल. तर माधुरीमध्ये समोरच्याला नवचैतन्य, उत्साह देणारे सौंदर्य आहे. या सौंदर्यात पुरुष भानावरच असेल. (आता कोणाच्या मनात कोणते सौंदर्य उमलतेय हे न जानणारा) उम्मी...
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 12/11/2008 - 15:11 नवीन
मधुबालाबद्दल सर्व वयाच्या बायका चांगलं बोलतात असा माझा आजवरचा अनुभव आहे! ती सुंदर आहे याबद्दल सर्व भगिनीत एकमत आहे... आणि हा मधुबालाचा मोठा प्लस पॉईंट आहे. बायकांची एकगठ्ठा मतं अशी सहजा सहजी कुणाला (त्यातल्या त्यात बाईला) मिळणं दुर्लभच!
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 12/11/2008 - 15:16 नवीन
बायकांची एकगठ्ठा मतं अशी सहजा सहजी कुणाला (त्यातल्या त्यात बाईला) मिळणं दुर्लभच! सगळ्या बाया माधुरीवर जळतात,दुसरे काय. बाकी उम्मि लेका तु खुप बोलु लागला आहेस. अशी कशी रे वेडगळ स्वप्ने तुला पडतात.जरा विप्र ना भेट नीट मार्गदर्शन घे त्याचे. वेताळ
  • Log in or register to post comments
व
वर्षा गुरुवार, 12/11/2008 - 17:34 नवीन
>>सगळ्या बाया माधुरीवर जळतात,दुसरे काय काहीही! माधुरीच्या पहिल्या पहिल्या फिल्म्स बघा. मला तरी ती त्यात सुंदर वाटत नाही. ती राजा, हम आपकेच्या काळात सुंदर दिसल्ये! पण मधुबाला कायमच सुंदर दिसल्ये. त्यातून तो कृष्णधवल चित्रपटांचा जमाना, मेकप कौशल्यही पुढारलेलं नव्हतं तरीही ती इतकी मोहक दिसायची! मधुबालाच्या चेहेर्‍यात जो गोडवा आहे तो माधुरीत नाही असं आपलं माझं मत.:) मधुबालाचं माझं अत्यंत आवडतं गाणं http://www.youtube.com/watch?v=VQ8CcUH266U (मधुबाला नामक अफगाणी सौंदर्याची चाहती) वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विसोबा खेचर Fri, 12/12/2008 - 03:55 नवीन
वर्षाशी सहमत आहे.. माधुरी काय किंवा इतर कुणी काय, बर्‍याच नट्या आपापल्या जागी सुरेख आहेत. परंतु मधुबाला ही सौंदर्याची व्याख्या आहे असं आम्ही मागेच म्हटलेलं आहे.. असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा