Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताजमहाल, लालकिल्ला यासंदर्भातील मुगल शैलीच्या पेंटिंगवर भाष्य

श
शशिकांत ओक
Tue, 05/31/2022 - 22:33
💬 72 प्रतिसाद
नमस्कार मित्रांनो, ज्ञानवापी, ताजमहाल, मथुरा श्री कृष्ण मंदिर, कुतुबमिनार वगैरे सध्या चर्चेत आहेत. संगीत ताजमहाल, व डॉ विद्याधर ओक यांनी नव्याने सादर केलेल्या पुराव्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी कोरा. कॉम वर संपर्क एका चर्चेत जस्टिन नामक व्यक्तीने ताजमहाल शिवमंदिर नाही. पुना ओक किंवा वासुदेवराव गोडबोले यांचे मुद्दे सविस्तरपणे खोडून काढले होते. त्यावर एक ई-बुक सादर केले आहे. जस्टिन यांच्या मुद्यांतून निर्माण झालेल्या वैचारिकतेवर गोडबोले यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर द्यायला टाळले. मला उत्तर द्यायला सांगता तर मग तुम्हीच का उत्तर देत नाही असे म्हटले होते. म्हणून मी जस्टिन यांच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देऊन गोडबोले पक्षी पुना ओक कसे बरोबर आहेत ते दाखवून दिले. यावर एक वेगळे ई-बुक सादर केले आहे. या घटनेला बरीच वर्षे झाली. मध्यंतरीच्या काळात बरीच नवी चित्रे माहिती गोळा झाली. विविध संदर्भ फोटो जुन्या कृष्ण धवल पेक्षा रंगीत जास्त प्रभावीपणे मिडियावर सादर करायची सोय झाली. मिपावरील धाग्यातून काही ओहापोह करायला अभ्यासू, रसिक आणि चिकित्सक वाचक मिळतात. म्हणून बऱ्याच दिवसांनी धागा प्रकट करत आहे. संदर्भ आहे शाहजहां दरबाराचे हे रंगित चित्र. २ हेच चित्र पुना ओक यांनी आपल्या ताजमहालवरील पुस्तकात इलस्ट्रेटेड वीकली मधून प्रकाशित झालेले कृष्ण धवल चित्र सादर केले होते. १ त्यात मूळ चित्र दि बोडलिन लायब्ररी ऑक्सफर्ड, मधील आहे असे म्हटले आहे. शिवाय ते १६२८ सालातील दिल्ली लालकिल्ल्यातील आहे असे वीकलीच्या मजकुरातून ध्वनित होते. १३ हे चित्र १६२८ मधील शहाजहांच्या राज्याभिषेकानिमित्तचे आहे. ही घटना दिल्लीतील लालकिल्ल्यात घडली असावी. त्यातील राजाची बैठक मागील चित्रे, दरवाज्याची दिशा पाहता दिल्लीतील लालकिल्ला असावा. १. आता प्रश्न निर्माण होतो की ओकांच्या पुस्तकातील चित्रातील लालकिल्ला दिल्लीचा नसेल तर कुठला असावा? चित्र तेच पण साल बदललेले. अली मर्दान खानला शहाजहां स्वागत करत आहे असे तेच चित्र १६४० सालचे आहे असे त्या खालील संदर्भ सांगतो. ते सांगताना हे चित्र जहांगीर पादशाह नाम्यातील असेल तर जहांगीर वारल्यावर त्याच्या नाम्यात हे चित्र १६४० सालात काढले आहे हे विसंगत वाटते. ७ Jehangir Padshah: Shahjahan receives Ali Mardan Khan in durbar. Mughal style, 17th century, c. 1640. २. त्यात वर्णन केलेला तपशील व चित्र याची गल्लत आहे का? १.ती वास्तू दिल्लीचा लालकिला का आणखी कुठला? कारण दिल्ली येथील लालकिला १६३९ मधे बांधून पूर्ण झाला असे मानले जाते. 11 यातला पर्शियन दूत कोण? कानात डूल घातलेले दोघे बादशहांच्या मर्जीतील सेवक असावेत. वय, हातात काठी, पांढरट दाढीवरून मागे उभे दूत असावेत. कादाचित शाहजहां त्यांना आधीपासून ओळखत असावा. म्हणून त्यांनी हात पुढेकरून आपले मोकळेपणा दाखवत बोलावते आहे. एका अन्य ठिकाणी मिळालेले अली मर्दान खानचे चित्र. 19 ही एक स्वैर अनुवादित तळटीप म्हणते, "आग्रा, लाहोर आणि दिल्ली येथे मोठ्या प्रेक्षक हॉलच्या आधीही, शाहजहान (r. 1628-58) ने त्याच्या दरबारी स्वागतासाठी नवीन प्रकारचे राजवाडा वास्तुकला म्हणून लाकडी कनातींचा दीवान ई खास प्रेक्षक हॉल बांधले. १९ लाकडी खांब, तुळया, व बल्ल्यांचे शोभिवंत शामियाने यातून ऐश्वर्य निर्माण करता येती याच पुस्तकात एक पिवळ्या रंगाच्या फेटेवाल्याने आपले पागोटे ढिले असल्याने त्याने उंच बसलेल्या शाहजहांकडे वर तोंड बोलले केले की ते डोक्यावरून पडायलाची भिती होती म्हणून हाताने घट्ट पकडून ठेवला आहे. या निमित्ताने आणखी काही माहिती सादर करत आहे. १२ गाय आणि सिंह एकत्र पाणी पिताना दिसतात यातून सामाजिक जीवनात जनता व शासक यांचे नाते असावे काय? शिवाय आणखी काय काय सुचवले जात आहे? मागे तराजू, त्यापुढे दोन मौलवी एकाने हातात गोल वस्तू धरली आहे. ती काही खाण्याची वस्तू असावी का? दुसऱ्याच्या हातात तलवार शौर्याचे प्रतीक दाखवले असावे. ९ ७२ पैकी काही हूरे (पऱ्या असाव्यात पण चेहरे पुरुषी वाटतात) वरून पहात आहेत... आता संदर्भ बदललेला आहे. आता शहाजहांचे वडील जहांगीराच्या दरबारात तो अजमेरची मोहिम फत्ते करून परतल्यावर त्याची भेट होत आहे. मुलगा बापाच्या 'पाय लागू' पोझ मधे आहे. शहाजहांनला अर्धा हिंदू मानतात, कदाचित त्याचा प्रभाव असावा. साल दर्शवले जाते १६१७ १५ पावलांशी झुकणाऱ्या शाहजहांशिवाय गुलाबी रंगातील फोटो समान चित्रात पिताश्री अकबर किवा प्रपिता हुमायूं ? असावेत. हिरव्या पिवळ्या चौकटीत कुठलेच सिंह किंवा कोणाचे चित्र नसून काही तरी मजकूर लिहिला आहे असे भासते. दरवाज्याच्या पोपटी चौकटीत तिथे दार असावे असे पडद्याने सूचित होते. हत्तीची वर्णी दर चित्रात प्रकर्षाने जाणवते. इथला हत्ती कार्टून मधील चित्राप्रमाणे हसरा वाटतो. विविधपातळ्यांवरील सरदार आपापसात बोलाचाल करताना दिसतात यावरून राजाचा दरारा थोडा कमी किंवा आनंदाच्या प्रसंगी सलगी पुर्ण असावा असे चित्रका राला अपेक्षित असावे. 2 १४ त्यानंतर सत्ता पालट झाला व शहाजहांने राज्यरोहणाप्रसंगी आपल्या ३ मुलांना उभे शाह शुजा १२ व औरंगजेब १० वर्षाचा व शुको १३ वर्षाचा छातीशी जवळ बोलावून सर्व उपस्थितांना आपुलकी व सौहार्द दाखवत आहे असे दृश्य आहे. हे चित्र ८ मार्च १६२८चे आहे. २ या चित्रात खाली चौकोनात मध्यात एका झेंड्याच्या पोस्टपाशी मौलवीं आनंदात आहेत. समावेत आधी सिंहासमावेत पाणी पिणारी गाय आता २ सिंहांच्यामधे मेलेली पडली आहे असे दिसते व २ हत्तींचे चित्र यांचा समावेश दिसतो. चौकटीच्या बाहेर दोन्ही बाजूला जे पुरुष दिसतात त्यांच्या कानात रिंगा आहेत. यावरून ते महत्वाच्या पदावरचे किंवा शाहजहांच्या आईच्या नात्यातले असल्याने त्यांची वर्णी इतक्या जवळ लागली असावी कि काय असे वाटते. लालकिल्ल्याबाबत चर्चा चालू आहे म्हणून ... दोन बाबींकडे लक्ष जाते... १६ वरील चित्र दिल्लीच्या लालकिल्याचे आहे. त्यात खंदकाच्या जागेत शहाजहांच्या मनोरंजना प्रित्यर्थ साठमारी करत हत्तींना झुंजवले जाताना दाखवले आहे. मधल्या पातळीवर मान्यवर सरदार तिथे जमून आनंद घेत आहेत. शाहजहां आपल्या दोन मुलांसह उंच ठिकाणी बसून त्या साठमारीचा आनंद घेत आहे. आसपासच्या सज्जातून पडदे टाकून शानदानी स्त्रिया पहात असाव्यात. यावरून मुगल राजसत्तेच्या काळात खंदक कोरडे होते. जर परकोट नुकताच बांधला गेला असेल तर यमुना नदीचे पात्रातून पाट काढून खंदक पाण्याने भरलेली ठेवला जायला पाहिजे होता. पण त्या बराच काळ आधी कदाचित नदीचे पात्र दूर गेल्याने पाटाचे पाणी तिथवर येणे शक्य होईनासे झाले असेल. यावरून बांधकाम खूप आधीपासून तयार असले पाहिजेत. या मोठमोठ्या हवेल्यात, परकोटात सुरक्षित रहिवास करणे सुलभ होते. जी गोष्ट लाल किल्लयाची तीच ताजमहालाला लागू होते. ताजमहालातील २४ कारंजी उडवायला लागणारे पाणी मिळवायला थेट अगजी जवळ एक पाट किंवा कालवा तयार केला असेल. तिथून ते मोटालावून पाणी उपसून वर नेले गेले असले पाहिजे. १८ नगारखाना ही गरज मुस्लिमांचे नसावी. कारण कुराणात वाद्ये गायकी, नृत्य या कलांना बंदी होती. तरीही नगारखाने व्यवस्थित काम करत होते. ते कसे ते इथे लक्षात येते. यावरून ताजमहालातील नगारखान्याची उपयुक्तता लक्षात येते. याशिवाय आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे.

प्रतिक्रिया द्या
19605 वाचन

💬 प्रतिसाद (72)
ग
गामा पैलवान Sun, 06/12/2022 - 09:03 नवीन
शःसिकांत ओक, याबाबत प्राडॉ आणि माझे विचार प्रचंड विभिन्न आहेत. फक्त मी ते त्यांच्यासमोर उघडपणे मांडीत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
म
मदनबाण Sat, 06/11/2022 - 19:05 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Megha Chhaye Aadhi Raat...
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 06/12/2022 - 06:33 नवीन
एक कहावत है कि जिस को सजा होनी है वह केस को जल्दी निपटने के लिए कोशिश कर रहा है. पर जिसके सबूतों के आधार पर आरोप सिद्ध हो सकता है वह आदमी गवाही याने प्रमाण देने के लिए बडा सुस्त, ढीला, या देना नहीं चाहता. ताजमहाल या अन्य प्रापर्टी जयपुर घरानों के पूर्वजों की रही थी. उन्होंने अपने को दफ्तर खानों में से दस्तावेजों खंगालना चाहिए. यह काम आजकल की महिला सांसद दिया कुमारी ने करने की बात तो की पर उसके बाद इतने दिन गुजरे कुछ हुआ नहीं. सही कहते हैं मुद्दई चुस्त गवाह सुस्त...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
S
sunil kachure Sat, 06/11/2022 - 19:28 नवीन
ताज महाल सारख्या अतिशय महत्वाच्या वास्तू चे खरे खोटे करायचे असेल तर. उथळ विचारांच्या लोकांना electronic मीडिया किंवा प्रिंट मीडिया किंवा अगदी यूट्यूब सारख्या मीडिया वर विचार व्यक्त करण्यास निर्बंध असावेत चुकीची मत,कोणाशी तरी बांधिलकी असल्या मुळे व्यक्त केली जाण्याची शक्यता जास्त असते. इतिहास तज्ञ,किंवा आता जे पुरावे आहेत त्या वर योग्य प्रयोग करून काढलेले निष्कर्ष हेच प्रसारित केले जावेत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 06/11/2022 - 20:54 नवीन
ताज महाल पहाताना बरीच हिंदू प्रतिके दिसतात. या बद्दल गाईडला विचारले तर ते सांगतात की ताजमहाल बाम्धताना हिंदू कारागीर ही होते त्यांच्यामुळे ती प्रतिके आपल्या दिसतात. क्षणभर हे तर्कट पटते पण कोणतेही बांधकाम करताना ते प्लॅन नुसार केले जाते. ताजमहाल सारखे बांधकाम ज्यात भूमितीच्या अनेक बारकाव्यांचा विचार केलेला आहे. ते बांधकाम करताना एखादा हिंदू कारागीर आराखड्यात स्वतःच्या मनाने बदल करू शकणार नाही. उदा " धोतर्‍याची फुले, कमळाची फुले , कळसाचा आकार ( हा तर बांधकामाचा शीर्ष बिंदू) , मुसलमान शासकांनी तो मूळचा कोणतातरी हिम्दू राजाचा महाल घेऊन त्यावर काही कलाकुसर केली असेल. शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही) आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 06/12/2022 - 05:54 नवीन
शिवाजी महाराज आग्र्यात होते त्यावेळेस त्यांच्या भेटीत ताजमहाल बद्दल काहीच वर्णन कुठेच येत नाही. ( आग्र्यातल्या हवेल्यांचे वर्णन आहे मात्र ताजमहालाचे नाही)
आपण म्हणता त्यात बरेच तत्थ आहे. हा घागा लालकिल्ल्यावरील घटनेच्या संदर्भातील पेंटींग वर आहे म्हणून इथे मत प्रदर्शन करणे थोडे अनुचित होईल. आग्ऱ्याहून सुटका या घाग्यावर यावर संदर्भात लिहिलेले आहे.
आणखी एक म्हणजे. ताजमहालात मुमताज ची कबर आहे त्याखाली एक मजला आहे. खाली जायला जिना देखील आहे.(पण तेथे प्रवेश बंद केलेला आहे.) हे कसे शक्य आहे. सामान्यतः कबर ही जमिनीवर असते. हे कोणालाच कसे खटकत नाही.
ती खालच्या मजल्यावरील कबर खरी व वरच्या मजल्यावरील (खोटी असे न म्हणता) दर्शनी असे म्हटले जाते. दोन कबरी (खरेतर बऱ्हाणपूरची धरून) तीन कबरी एकाच व्यक्तीला असू शकतात का? असतील तर तसे कुठे पहायला मिळतात? वगैरे प्रश्न निर्माण होतो...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 06/12/2022 - 09:18 नवीन
बर्‍हाणपूर मधे आत अकबर नाही. ती तेथून आग्र्याला हलवली. एखाद्याची कबर एका ठिकाणहून हलवून इतरत्र नेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
S
sunil kachure Sun, 06/12/2022 - 06:21 नवीन
मुघल साम्राज्य जावून अनेक राज्य आली.अगदी मराठे पण पानिपत पर्यंत गेले होते. दिल्लीवर काही काळ मराठी सत्तेचे वर्चस्व होते. नंतर इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे . त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही.. हे पण थोडे विपरीत च आहे. ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का? कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही. खुप प्रश्न आहेत.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 06/13/2022 - 12:11 नवीन
इंग्रज आले .इंग्रज तसे चोकस वृत्तीचे . त्यांना पण ताज महाल चा अभ्यास करावासा वाटला नाही.. हे पण थोडे विपरीत च आहे. ताजं महाल ह्या इमारतीला प्रसिध्दी स्वतंत्र नंतर दिली गेली का? कारण त्या वास्तू ची दाखल अगोदर कोणी घेतली च नाही.
इंग्रज सरकारने देशभरातील वास्तूंवर जितके अभ्यासपूर्ण काम केले तितके आपल्या देशात अन्य राजसत्ता कडून झाले नसावे. मुगल बादशाह आपल्या सत्ता काळातील घटना व पत्र व्यवहार वगैरे व्यवस्थित ठेवत. आपल्या सत्ता काळात ते आधीच्या बादशाहांनी त्यांच्या पुढच्या पिढीला उद्देशून केलेले वाईट किंवा निंदानालस्ती चे उल्लेख बदलले जाणे स्वाभाविक आहे. तरीही ते 'नामे' खूप माहिती सांगतात. त्यात अतिशयोक्ती, राजाची स्तुती किंवा बढाया वगैरे असणे स्वाभाविक आहे. फारसी भाषाेतील मजकुरात विराम चिन्हे नसणे, क्लिष्टता, आणि फाफटपसारा जास्त असे गुण अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आहेत. असो. इंग्रजी भाषेत, तपशीलवार वर्णन, नकाशे, पुराव्यानिशी माहिती, मुद्देसूद मांडणीतून घटनांचा अर्थ अचुक समजून घ्यायला सोपे जाते. असो त्यांच्यात अनेक सेनाधिकारी भारतीय संस्कृती, भाषा वगैरेत पारंगतता मिळवत. आपले थिसीस सादर करत. त्यातूनच कनिंगहॅम सारख्या अधिकार्‍यांच्या परिश्रमातून आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याची स्थापना झाली. याचे दरवर्षी रेकॉर्डचे स्क्रोल प्रसिद्ध होत. ताजमहाल यावर अभ्यास करून लेखन अस्तित्वात आहे. ताजमहाल मधे सायंकाळी फिरायला व चांदण्या रात्री डीनर डान्स पार्ट्या होत. नंतर ते बंद करण्यात आले. लॉर्ड कर्झन याला ताजमहालाच्या संदर्भात फार आकर्षण होते. त्याच्या पुढाकाराने इजिप्त मधून दोन वजनदार शँडलियर्स मागवले गेले पैकी एक कबरीवर लटकलेला आहे तर दुसरा प्रवेशद्वार इमारतीच्या वरील मजल्यावर लटकत आहे. एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचयात यांचे उल्लेख दिले आहेत. बागेतील झाडे, मशागत, बदलून ती युरोपियन पद्धतीने, झाडे लावली गेली. यात तत्परतेने लक्ष घालून विविध नाम्यांचा इंग्रजी तर्जुमा करण्यात आला. फक्त शाहजहां च्या बादशाह नामा राहून गेला. म्हणून आता निर्माण झालेल्या राजकीय व धार्मिक परिस्थिती मुळे त्यातील फारसी भाषांतर करायला व योग्य अर्थ काढायला फारसे कोणी उत्सुक नाहीत. मला तसा दोन जणांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. राहिला प्रश्न तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले आहे ते इंग्रजी सत्ता असताना का उघडून पाहिले गेले नाही यावर नेमके उत्तर मिळत नाही. इंग्रज इतकी उचक पाचक करत पण ताजमहालाच्या लांबी रुंदी, डिझाईन, याचे नकाशे आर्किऑलॉजिकल रेकॉर्ड मधे नाहीत. कनिंगहॅम कदाचित स्वतः ते काम करणार असावा, जसे कुतुबमिनार चे त्यांनी केले, पण नंतर राहून गेले. असो... डॉ वासुदेव गोडबोले यांच्या मते त्यात इंग्रजांची कॉन्स्पिरसी होती. यावर त्यांचे पुस्तकातून माहिती थक्क करणारी आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 13:31 नवीन
आज युट्युबवर बर्मुडा ट्रँगल संबंधित चित्रफिती बघत असताना ध्रुव राठी नावाच्या एका युवकाची चित्रफीत विशेष आवडली. कुठलाही अभिनिवेष नसलेली , अभ्यासपुर्वक बनवलेली चित्रफीत होती. मग चांगला युट्युबर दिसत आहे असा विचार करता त्याच्या आणखी चित्रफिती बघू लागलो तेव्हा ताजमहालचे रहस्य उलगडणारी चित्रफीत समोर आली. ही चित्रफीतही अभ्यासपुर्वक बनवलेली आहे. पु ना अओक यांच्या संशोधनावरही त्यात भाष्य आहे. जिज्ञासूंनी ही चित्रफीत आवर्जुन पहावी.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 06/15/2022 - 15:18 नवीन
पुना ओक यांच्या म्हणण्यानुसार ताजमहाल चे वास्तव नाही असे म्हणणारे अनेक विचारक होते, आहेत. महामहोपाध्याय वा वि मिराशी, ग ह खरे, वाकणकर वगैरे नावे मला आठवतात. ध्रुव यांनी पुरावा म्हणून जे पुरातत्व विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेले फोटो दाखवले आहेत यावर असाही विचार करता येईल. १ . नव्याने चकाचक टाईल्स लावून आधीच्या डागाळलेल्या भिंतींना लपवण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. जर २२ खोल्यांना साफसफाई करून नकाशा काढून त्यावर त्या २२ खोल्या खरोखरच कुठे आहेत ते दाखवून देणे आवश्यक होते. २.जर एका खोलीला असे जणू आपल्या घरात ओल येणाऱ्या भिंतांना टाईल्स लावून लिपापोती करून दृष्टि आड सृष्टि करून लपवले जाते. तसेच काहीसे इथे केलेले आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे. ३. बाकीच्या २१ खोल्यांचे फोटो सादर केले आहेत असे पुरातत्व विभाग म्हणत असेल तर ते फोटो कुठे आहेत? ४. पुरातन वास्तूंवर असे टाईल्स चे गिलावे करायला परवानगी कोणी कधी, कोणाच्या अखत्यारीत दिली? टेंडर केंव्हा निघाले? इतर बांधकाम व्यावसायिकांना ते कसे माहित झाले नाही? खर्चाचा तपशील कोणी ते पास केले. ५. हे फोटो प्रसिद्ध करावे अशी ऑर्डर कुणी कधी काढली या बाबतचे सर्व फाईल मधील नोटिंग व पत्रव्यवहार अभ्यासांना पहायला मिळाला पाहिजे. ६. तळघरातील बंद खोल्या अभ्यासकांना व सामान्य जनतेला पहायला मिडिया आणि कोर्टचे अधिकारात उघडून पहा म्हणून गेली कित्येक वर्षे कोर्ट कचेऱ्यांचे दरवाजे ठोठावत लाखो लोक तिष्ठत आहेत. त्यांना सर्वा समक्ष पुराव्यानिशी सिद्ध करायचे सोडून गुपचूप अशी उठाठेव करणारे कोण आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
ग
गामा पैलवान Wed, 06/15/2022 - 21:48 नवीन
शशिकांत ओक, ASI चा काही भरवसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजवर ताजमहालचं अधिकृत सर्वेक्षण ( official survey ) प्रकाशित झालेला नाहीये. लपवाछपवी जोरात चालू दिसते आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
ग
गामा पैलवान Wed, 06/15/2022 - 22:12 नवीन
तर्कवादी, पु.ना.ओक हे इतिहासकार नाहीत अशी मल्लीनाथी ध्रुव राठी करतात. ताजमहाल वगैरे मीमांसा ( थियरी ) त्यांनी स्वत:च्या डोक्यातनं उत्पन्न केली असं राठींचं म्हणणं आहे. राठींच्या या मतास छेद देणारा एक ढळढळीत प्रसंग उपलब्ध आहे. कर्णावती येथील जामा मशिदीच्या जवळ एका हिंदूने ( कांतीचंद्र ब्रदर्स ) आपल्या स्वत:च्या जागेवर एक टोलेजंग इमारत बांधायला घेतली. मशिदीचा इमाम ( का आजून कोणी ) पिसाळला. माशिदिपेक्षा उंच काहीही बांधकाम असता कामा नये म्हणून त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावून उंच वास्तू बांधण्यावर निर्बंध आणले. शिवाय त्याला ही हिंदूंची वास्तू पाडून टाकायची होती. हिंदू मालकाची हालत खराब झाली. कोणीतरी त्यास ओकांचं नाव सुचवलं. त्याने व्यथित मानाने अतिशय करूण असं पत्र ओकांना पाठवलं. काही करता येईल का याची पृच्छा केली. ओक म्हणाले की सरळ जामा मशीदीवर दावा ठोका की ते भद्रकाली देवीचं मंदिर आहे म्हणून. जाउद्या कोर्टाची माणसं आत तपासणी करायला. इमामाने ताबडतोब आपला दावा मागे घेतला. ओक आणि ताजमहाल यांच्या बाबतीत ध्रुव राठी यांचं मत पार गंडलेलं आहे. पु.ना.ओक बकवास लिहितात की मुद्देसूद, हे वाचक ठरवतील. ध्रुव राठी नव्हे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
म
मदनबाण गुरुवार, 06/16/2022 - 09:09 नवीन
जाता जाता :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. त्याच्या अनेक व्हिडियोज मधले प्रतिसादांचे निरिक्षण केल्यास साधारण एकाच आशयाचे / प्रकारचे प्रतिसाद त्याला दिले जातात हे उघड होते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 06/16/2022 - 14:47 नवीन
धन्यवाद, मदनबाण जी, आपल्या या सादरीकरणामुळे हा धागा अधिक माहितीपूर्ण आणि वाचनीय झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 06/16/2022 - 20:04 नवीन
धन्यवाद ओक काका. _/\_ पायर्‍या :- ताज महाल चे अनेक फोटो पाहताना, मला एक वेगळा फोटो दिसला तो मी खाली देत आहे :- Image removed. या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही. अजुन एक फोटो :- Image removed. अशाच अजुन पायर्‍या आहेत ज्याच्यावर पाय देऊन लोक आत जातात, या नंतर तिथे लावल्या गेल्या असाव्यात. पायर्‍यांच्या मागचे नक्षिकाम हे स्पष्ट करते की ते संपूर्ण नक्षिकाम असुन त्याच्या पुढे नंतर पायर्‍या बसवल्या गेल्या आहेत. खुल जा सिम सिम ? Image removed. बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ] जरासे अवांतर :- केरळ मधल्या पद्मनाभस्वामी मंदिरातील अशाच्या गुप्त तळघरातुन सुमारे २ लाख कोटी ची संपती बाहेर काढण्यात आली होती. [ साल बहुतेक २०११ ] आता मला पडलेले प्रश्न :- १] ती संपत्ती आता कुठे आहे ? मागच्या सरकारने ती कुठे ठेवली आहे ? २] जर मंदीरा खालची भुयारे उघडली जाऊ शकतात तर मग ताज महालची उघडुन ती का पाहिली जाऊ शकत नाहीत ? ३] पद्मनाभस्वामी मंदिरातील एक गुप्त दालन आजही उघडण्यात आलेले नाही, त्याला विरोध केला गेलेला आहे. या मागे नक्की काय कारण आहे ? [ त्याचा दारावर कालसर्पाचे चिन्ह इं असुन विशिष्ठ सर्प मंत्र म्हणुनच तो बंद करण्यात आलेला असुन तश्याच प्रकारे कोणा सिद्धा कडुन तो त्याच प्रकारे उघडला गेला पाहिजे इइइ. फार पूर्वी वाचनात आले होते,पण तेच खरं का ? हे मात्र ठावूक नाही. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Michael Jackson's Drummer Jonathan Moffett Performs "Smooth Criminal"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
श
शशिकांत ओक गुरुवार, 06/23/2022 - 20:36 नवीन
या फोटोत २ स्त्रियांच्या मध्ये पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या कुठे जातात ? त्या कुठे जात नसतील तर मग त्या तिथे का आहेत ? इंजिनिअरिंग मार्व्हल असलेल्या इमारतीत अशी चूक तर असुच शकत नाही, मग त्या पायर्‍या तिथे का आहेत ? हे समजण्यास वाव नाही.
Taj Mahal is not a Shiv Temple या पुस्तकात हाच फोटो मी पण माझ्या उत्तरात दिला आहे. ताज कबरींच्या बाजूला असलेल्या मशीद इमारतीत गालिचा बिछान्या प्रमाणे नमाज पढायला डिझाईन केले आहे. तिथे खुदबा पढायला एक ३ पायऱ्यांचा उंचवटा बनवला जातो. तो कार्पेटवर स्टूल ठेवल्या प्रमाणे दिसतो कारण तो नंतर लावला गेला आहे. असे दिसते.
बादवे... याही पायर्‍या नंतरच्याच असाव्यात काय ? [ संपूर्ण नक्षिकामावरच त्या असुन, पायर्‍यांचे जोड चांगल्या प्रतीचे नाहीत आणि दोन्ही पायर्‍यांवर वेगवेगळे आहेत. ]
पायऱ्यांचे फिनिशिंग गलथान आहे हे आपले निरीक्षण बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
त
तर्कवादी Sat, 06/25/2022 - 13:15 नवीन
परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
त
तर्कवादी गुरुवार, 06/16/2022 - 14:43 नवीन
https://www.loksatta.com/vishesh/shiva-temple-taj-mahal-history-discussion-world-famous-historical-building-ysh-95-2969727/
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 06/16/2022 - 16:29 नवीन
तर्कवादी, 'तुमचं बोटंच वाकडं' अशा अर्थीचे अनेक आरोप ओकांवर झाले आहेत. ते आपापल्या परीने खरे असतीलही. पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Fri, 06/17/2022 - 15:38 नवीन
पण वाकड्या बोटाने ओक जो चांदोबा दाखवताहेत तो कोणी पहायचा?
ठीक आहे .. पुरातत्च विभाग केंद्र सरकारच्याच अखत्यारीत येतो. त्या विभागानेही मंदिर असण्याची शक्यता फेटाळली होतीच पण तरीहि पुन्हा एकदा एखादी समिती स्थापन करुन सरकारने एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायला हरकत नाही. बाकी मंदिर असेल नाहीतर कबर .. मी तरी अजून ताजमहाल बघितला नाही आणि जेव्हा बघेन तेव्हा तो फक्त एक प्रेक्षणीय स्थळ, एक जागतिक आश्चर्य म्हणूनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
शशिकांत ओक गुरुवार, 06/16/2022 - 14:50 नवीन
नमस्कार महोबा या शहराच्या आसपास त्यांनी सुचवलेले गाव आणि तिथे मंदिर आहे का याचा शोध घेतला जावा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा