शशक - भूल भुलैय्या २
तिला पटत नव्हतं तरी आमच्या दोघांच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी मला तिथे जायचं होतं.
अवघड प्रवासानंतर मी तिथे पोहोचलो.
ती गाणं ऐकत होती "कसे सांगू " ? ती धावत मला बिलगली.
"आता पुन्हा जायचं नाहीस." क्षणार्धात तिनं माझ्या हातातलं मशीन बाल्कनीतून भिरकावून दिलं
"मूर्ख झालीस का ?" तिच्यासोबत मला आता रहायचं नव्हतं.
" इतकी वर्षे मी तुझीच वाट पाहिली , तुझ्यावरच प्रेम केलं. आता वयस्कर झालेली मी तुला नकोय ?" तिच्या डोळ्यात पाणी होतं.
" . . . . "
" तु गेल्यावर मी एकटीनेच घर चालवलं. तुझी संपत्ती आणि विम्याची रक्कम मला मिळाली; पण सात वर्षानंतर..
तुझ्याकडे आता एकही पैसा नाहीये. त्यामुळे तु तसलं काहीही करु शकणार नाहीस.आता मीच तुझं वर्तमान आहे"
तसंही स्पर्धेतली माझी धडपड विजयी न झाल्यानेजे जिंकले त्यांचा आयडी ब्लाॅक मारून त्यांना बक्षीस देण्यात आलं. तुम्हालाही हवंय का बक्षीस?