जे न देखे रवी...
कान्हा
Primary tabs
पैलतीरावर तुझी बासरी
घुमते ..कान्हा, वेड लावते
निळे मोरपीस ,श्यामल अंगी
खुलते आणिक हळू खुणवते
अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर
मी ही होते राधा , मीरा
घनश्याम ,मनमोहन ओठी
निळाईत ही विरे दिठी.
निळा जलाशय निळ्या नभाशी
करीतो हितगुज हळवे,कोमल
सारे होई एकरूप अन्
व्यापून उरतो केवळ कृष्ण
"व्यापून उरतो केवळ कृष्ण" .... च्या ऐवजी "व्यापुन उरतो कृष्णचि केवळ" असे लिहायचे होते का ?
हे जास्त छान आहे..धन्यवाद.
कविता आवडली. चित्रगुप्त यांचा छोटा बदल खुप भावला.
खरं आहे..सुचवलेला बदल चांगला आहे.
धन्यवाद
ही कविता कशी सुटली म्हणायची!
सुंदर, नेहमीप्रमाणेच! आवडली!! :-)
ही कविता कशी सुटली म्हणायची!
सुंदर, नेहमीप्रमाणेच! आवडली!! :-)
व्वा, खुप सुंदर कविता!
अगदी चित्रदर्शी ! निळ्या रंगात फिरवून आणलेत!
केवळ कृष्ण आणि कृष्णचि केवळ दोन्ही समर्पक वाटतात.
सुंदर!