जे न देखे रवी...

लढवय्या

Primary tabs

मी लढवय्या सैनिक आहे
चतुरस्र ही सेना माझी
राजकुमार मी बाबांचा
हे साम्राज्य ही माझेच आहे

मी फोन उचलला नाही
मी भेटही दिली नाही
इंद्रापदा करता सुद्धा
कधी दंगा केला नाही

काकांनी मज समजावले
सिंहासन,बाळा तुझेच आहे
सुखेनैव राज्य कर तू आता
मी तुझ्याच बरोबर आहे

सर्वत्र सुखशांती आहे
काकांनी मज सांगीतले
जा बाळा तू झोपी
मी जागा आहे

उघडले खडकन डोळे
मग सैरभैर मी झालो
सेनेने बंड केले, हे
मज कुणी सांगीतलेही नाही

मग लढता लढता काका
दुर निघूनी गेले
कधी अभिमन्यू झाला माझा
हे मलाच उमगले नाही

मी लढवय्या सैनिक आहे
चतुरस्र ही सेना माझी......
२८-६-२०२२

कृपया हल्के घ्या, मनोरंजनाव्यतिरिक्त याच्या मागे कुठलाच उद्देश नाही.कुणाचाही उपमर्द करण्याचा तर अजीबात हेतूच नाही.
तरीसुद्धा कुणास आसे प्रतीत झाले तर क्षमस्व.