Welcome to misalpav.com
लेखक: तुषार काळभोर | प्रसिद्ध:
चला चर्चा करूयात..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आवाहन कधी प्रकाशित करावे?
आवाहन शक्य तितक्या लवकरात लवकर करावे लागेल.
विषय असावा का/कोणता असावा?
विषयाला/एखाद्या विशिष्ट थीमविषयी माझे मत नेहमीच प्रतिकूल आहे, लेखन मुक्त/प्रवाही असावे असे वाटते. काही मान्यवर लेखकांना व्यनि पाठवून त्यांचे लेखन मागवून घेतले पाहिजे असे वाटते. शिवाय आपल्या घरचा बाप्पा वगैरे स्पर्धा/ फोटोयुक्त धागाही आला पाहिजे असे वाटते.

याला +१ ___________________ थीमविषयी मत प्रतिकूल नसले तरी, लेखन मुक्त/प्रवाही असावे याच्याशी सहमत. ___________________ आवाहन शनिवार-सोमवारपर्यंत प्रकाशित करू. (९-११ जुलै)

काही मान्यवर लेखकांना व्यनि पाठवून त्यांचे लेखन मागवून घेतले पाहिजे असे वाटते.
यस्सर. नावं सुचवणं, आवाहनाचा खर्डा करून व्यनि करणं हे आता करू या.
शिवाय आपल्या घरचा बाप्पा वगैरे स्पर्धा/ फोटोयुक्त धागाही आला पाहिजे असे वाटते.
व्हय जी!

अगदीच साधं लिहिलंय. याला थोडं सजवता येईल का? गणेश चतुर्थी हा आपल्या मिपाचा स्थापना दिन. त्यानिमित्ताने दरवर्षी आपण गणेशोत्सवादरम्यान श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो. विषयाचे काहीही बंधन नाही. लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा. sahityasampadak डॉट mipa ऍट gmail डॉट com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. आलेल्या लेखनातील लेखमालेला साजेसे लेखन निवडून ते प्रकाशित केले जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय आयोजक मंडळाचा असेल. श्रीगणेश लेखमाला गणेश चतुर्थीला म्हणजे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशपर्यंत सुरू राहील. लेखन पाठवण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२२. काही शंका असल्यास याच धाग्यावर प्रतिसादातून विचारू शकता.

ते पूर्व प्रकाशित नको वगैरे लिहायचे का? माझा बप्पा ची घोषणा पण यातच करायची की त्याचा वेगळा धागा? बाप्पाचा नैवेद्य म्हणून 10 दिवस 10 पाकृ जमवता आल्या तर रोज एक लेख आणि एक पाकृ प्रसिद्ध करता येईल पैजारबुवा

गणेश चतुर्थी हा आपल्या मिपाचा स्थापना दिन. त्यानिमित्ताने दरवर्षी आपण गणेशोत्सवादरम्यान श्रीगणेश लेखमाला आयोजित करतो. विषयाचे काहीही बंधन नाही. फक्त श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेले लेखन हे इतर संकेतस्थळे वा सामाजिक माध्यमांवर पूर्वप्रकाशित नको. लेखमालेसाठी प्रवेशिका साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेश करून पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा. sahityasampadak डॉट mipa ऍट gmail डॉट com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. आपल्या घरच्या गणपतीचे फोटो, नैवेद्याच्या पाककृती, मिपाकरांनी किंवा कुटुंबीयांनी काढलेली चित्रे, गौरीपुजनाची सजावट हे नक्की पाठवा. आलेल्या लेखनातील लेखमालेला साजेसे लेखन निवडून ते प्रकाशित केले जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय आयोजक मंडळाचा असेल. श्रीगणेश लेखमाला गणेश चतुर्थीला म्हणजे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहील. लेखन पाठवण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२२. लेख अथवा फोटो पाठवण्यात काही अडचणी किंवा काही शंका असल्यास याच धाग्यावर प्रतिसादातून विचारू शकता.

या वर्षीही मिपा सांख्यिकी प्रकाशित करायची का?, जर हो उत्तर असेल तर....मागच्या लेखा पेक्षा अजून काय नविन देता येईल? पैजारबुवा,

जर काही NLP आल्गोरीदम असेल तर, साधारण कोणत्या टॉप विषयांवर लिहीले गेले (जनातल्ं, कविता अशा क्याटेगरीज नव्हेत). किती लेखात पॉजिटिव्ह सेंटीमेंट, कितीमधे निगेटीव्ह. असे काहीतरी. सर्वाधिक गाजलेले प्रतिसाद (सर्वाधिक उपप्रतिसाद ज्याला असतील असा प्रतिसाद). सर्वात लांब प्रतिसादमालिका. कमीतकमी वेळात अधिक प्रतिसाद घेणारा लेख. सर्वाधिक मेगाबायटी प्रतिसाद. एकूण डेटाचा बाईट्समधे आकार आणि त्याचे सर्वांना अपील होईल असे तुलनात्मक उदाहरण. उदा. सर्व लेखांची अक्षरे मिळून किती पानी ग्रंथ होईल, किती लांब ओळ होईल. हे सर्व अर्थात extrapolated टॉप प्रतिसादक, टॉप खफ स्टार वगैरे.

मागच्या वेळी अनुक्रमणिकेची पाने एक्सेल मधे उतरवुन घेउन सांख्यिकीचा विदा बनवला होता. एन एल पी अल्गोरिदम एक्सेल मधे वापरता येतात का? तसे असेल तर कसे तेही सुचवा, खव एक्सेल मधे कशा उतरवुन घेता येतील ते पहातो. पैजारबुवा,

बादवे, खफ नुकताच साफ झाला असल्याने वर्षभराचा कंटेंट मिळणार नाही.
तसेही खफ एक्सेल मधे उतरवुन घेणे आणि त्याची चिरफाड करणे अवघड जात होते, मी दोन दिवसांचा डेटा कॉपी केला होता पण फारसे काही जमले नाही. पैजारबुवा,