जे न देखे रवी...
सन्तूर
Primary tabs
स्वरतत्वाचे तुषार अगणित
भवतालाला व्यापुनी उरले
रोमरोम पुलकित करणार्या
स्वरपुंजांनी गारूड केले
स्वरचित्रातील अवकाशाच्या
सुप्त मितीचे दर्शन झाले
स्वरलहरींचे जललहरींशी
निगूढ नाते पुनश्च कळले
स्वरशिल्पातील अमूर्ततेचा
चिरंतनाशी घालुनी मेळ
शब्दावाचून सहज रंगला
विलक्षणाचा अद्भुत खेळ
अशीच काहीशी अवस्था काही वर्षांपूर्वी चिंतामणी जयंती समारोहाच्या वेळी उस्ताद रईसखान यांचे सतार वादन ऐकताना झाली होती.
ते दोन तासांहुन अधिक काळ वाजवत होते आणि श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते, इतके की मैफिल संपली तरी टाळ्या वाजवण्याचेही कोणाला भान उरले नव्हते.
तुम्ही ती भावना शब्दात चपखल उतरवली आहे.
पैजारबुवा,
आवडली.
भान हरपून जायला लावतात.
उदा. महेश काळे यांनी (सारेगमप दरम्यान) सादर केलेलं कानडा राजा पंढरीचा.
किंवा आशा भोसलेंचं जीवलगा..
किंवा भीमसेन जोशींचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
किंवा लता मंगेशकरांचं सख्या रे घायाळ मी हरिणी