सारे प्रवासी घडीचे हे जयवंत दळवींचे पुस्तक सगळ्यांना भेट म्हणून द्या..
फारच सुरेख व निखळ मनोरंजन करणारे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने तुमची एक छान आठवण नेहमीच सर्वांपाशी राहील.. :)
आपला,
(दळवीप्रेमी) तात्या.
दळवींच्या लहानपणीच्या आठवणी, त्यातून रंगणारी भावल्या किलिंडर, नरू, पावटेमास्तर, वामनदाजी, बाबुली, आबा, झिलू केदार, केशा चांभार, काळ्या माठाला पाय फुटून तो तुरूतुरू चालत आहे असं वाटणारा तात्या रेडकर इत्यादी व्यक्तिचित्र, याचं वर्णन करणारं हे एक छोटेखानी पुस्तक आहे! :)
आपला,
(मालवणी) नरूतात्या.
सर्वांना एकच पुस्तक देण्यापेक्षा २५ जणांना २५ वेगवेगळी पुस्तके द्या. म्हणजे आपापसात देवाण-घेवाण (वाचण्यापुरती) होऊन, सर्वांना २५ निरनिराळ्या पुस्तकांचा आस्वाद घेता येईल.
पुल, जयवंत दलवी, वपु ही नावे चटकन सुचतात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मनोहर जोशी लिखित 1B
मनोहर जोशी वारंवार विमान प्रवास करतात.
1A हि त्यांची आवडती सीट.
त्यांच्या शेजारच्या म्हणजे 1B सीट वर अनेक नामांकीत व सामान्य व्यक्ती बसतात.
त्या पैकी निवडक व्यक्तींशी मारलेल्या गप्पांवरून लिहिलेले हे व्यक्तिचित्रांचे हे पुस्तक आहे.
विविध वयाची, विविध क्षेत्रातल्या मात्तबर मंडळींबद्दल तसेच सामान्य परंतू काही वैशिष्ट्य पूर्ण व्यक्ती (जसे त्यांना भेटलेली एक चिमुरडी) ह्यांच्या बद्दल लिहिलेले एक सुंदर पुस्तक.
अगदी भेट देण्या योग्य!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
पु.लंचे कुठलेहि (खरंतर इथेच २०-२५ उत्तम पुस्तकं झाली :) .. त्यातहि अपूर्वाई, पुर्वरंग, जावे त्यांच्या देशा
अनिल अवचट यांचे "कार्यरत"
प्रकाश नारायण संतांचे कुठलेहि (झुंबर,पंखा, ....वगैरे वगैरे)
वि.सा. खांडेकरांच्या क्रौंचवध / ययाती
वीणा गवाणकरांचे "एक होता कार्व्हर"
रारंगढांग
हि झाली काहि (माझ्याकडून इतरांना) साधारणतः भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके. अजून अनेक अनवट सुंदर पुस्तके आहेत.. परंतु ज्याच्या आवडीनिवडी माहित नसतात त्यांना वरील पैकी एक पुस्तक देतो :)
-(गोंधळलेला) ऋषिकेश
अजून काही पुस्तके :
१. शाळा - मिलिंद बोकिल
२. हसवणूक - पु.ल. देशपांडे (संकलन - जयवंत दळवी )
३. तोत्तोचान
४. चीपर बाय द डझन - अनुवाद : मंगला निरगुडकर
५. मिरासदारी - द. मा. मिरासदार
६. नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे
७. छंदाविषयी - अनिल अवचट
८. कोसबाडच्या जंगलात - अनुताई वाघ
९. माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग
अजून बरीच आहेत . . .
... "सुखी माणसाचा सदरा" दिलंत तरी चालेल.
मूळ लेखक: बर्ट्रांड रसल
मराठी भाषांतरः करूणा गोखले.
प्रकाशकः राजहंस (?)
आणि हो, अभिनंदन. भेटवस्तू म्हणून पुस्तक देण्याची कल्पना तशी नवीन नाही, पण ती पुढे सुरु ठेवल्याबद्दल!
साने गुरुजी लिखीत
श्याम ची आई , The best one I have ever read
धडपडणारी मुले
जयन्त नार लीकर लिखीत
GANIT ANI VIDNYAN
YAKSHANCHI DENAGI
KHAGOLSHASTRACHE VISHVA
~ वाहीदा
मिन्टे.... साधारण पन्नाशीनन्तर... मनुष्याचा वानप्रस्थाश्रम सुरु होतो.....
त्यामुळे काही पुस्तकांची नावे सुचवत आहे.. अर्थात ज्यांना अध्यात्म किन्वा तत्सम आवड असेल्..आणि विचारांची खोली असेल... त्यांना ही पुस्तके द्यायला हरकत नाही...
१. ""मृत्यूनन्तरचे जीवन"" .
ले.: श्री. अरविंद देशपांडे.
२. ""साद देती हिमशिखरे""
ले.: श्री. आनंद प्रधान.
३. ""पृथ्वीवर माणूस उपराच""
ले.: श्री. सुरेशचंद्र नाडकर्णी.
आणि अजुन.. पुल., व.पु... जयवन्त दळवी...'तें'.. बेस्टच आहेत..
:)
३. "पृथ्वीवर माणूस उपराच"
ले.: श्री. सुरेशचंद्र नाडकर्णी.
उपरा का उपडाच?
मला हे पुस्तक अजिबातच पटलं नाही, त्यामुळे आवडलं नाही. माझं या पुस्तकाबद्दलचं मतः लेखकाची "गोष्ट" सांगण्याची पद्धत फार चांगली आहे. पण आवड प्रत्येकाची, कसं?
मी डॉ. ठाकूर यांचे "संगीत सरिता" हे पुस्तक सुचवितो. यांत शंभरावर रागांची अगदी जुजबी माहिति दिली आहे. मुख्य म्हणजे त्या रागांमध्ये असलेली मराठी आणि हिंदी गाणी दिली आहेत. त्यामुळे सामन्यांना शास्त्रीय संगिताची गोडी लागेल.
सुभाष
लेखक डॉ. विश्वास पाटील. (नेताजींचा संपूर्ण जीवनपट व संघर्ष उत्तम साकारला आहे)
साक्षिदेवा, तुझी सूचना उत्तमच आहे, अरे पण त्या अमृता अमितचा काहितरी विचार कर! नेताजी या पुस्तकाची किंमत जवळपास ६०० रुपये आहे आणि तिला २५ लोकांना हे पुस्तक द्यायचे आहे!
म्हणजे २५ गुणीले ६००?
साक्षिदेवा, कर पाहू गुणाकार! शिकवलाय ना शाळेत? :)
आपला,
(गणीतज्ञ!) तात्या.
उपनिषदांचा आभ्यास
लेखक : प्रा. के वी बेलसरे.
प्रकाशक : त्रिदल प्रकाशन.
छपाई उत्तम आणि अक्षरे सुबक.
पुस्तकामध्ये प्रचलित मुख्य अश्या उपनिषदांचे सुंदर विवेचन आहे.
-- लिखाळ.
मुक्तसंगः अनहंवादि
श्री ज्ञानेश्वरी अनुवाद: प्रकाशक - श्री स्वामी वरदानंद भारती प्रतिष्ठान, पंढरपूर
अनुवादकः श्री स्वामी वरदानंद भारती (अनंतराव आठवले)
प्रचलित मराठीत, रसाळ व प्रासादिक ओवीबद्ध अनुवाद. वाचक, अभ्यासक व साधक या सर्वांना उपयुक्त!
वाचनसुलभ - डाव्या पानावर मूळ ज्ञानेश्वरी व समोर उजव्या पानावर त्याच ओव्यांचा समर्थ अनुवाद. अक्षरे मोठी.
अवांतरः स्वामींची अन्य ग्रंथसंपदाही खूप आहे. (तिचा परिचय - सविस्तार लिहायचाय! पण पुन्हा केव्हातरी)
- पु.लंचे कुठलेहि (खरंतर इथेच २०-२५ उत्तम पुस्तकं झाली :) .. त्यातहि अपूर्वाई, पुर्वरंग, जावे त्यांच्या देशा
- अनिल अवचट यांचे "कार्यरत"
- प्रकाश नारायण संतांचे कुठलेहि (झुंबर,पंखा, ....वगैरे वगैरे)
- वि.सा. खांडेकरांच्या क्रौंचवध / ययाती
- वीणा गवाणकरांचे "एक होता कार्व्हर"
- रारंगढांग
हि झाली काहि (माझ्याकडून इतरांना) साधारणतः भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके. अजून अनेक अनवट सुंदर पुस्तके आहेत.. परंतु ज्याच्या आवडीनिवडी माहित नसतात त्यांना वरील पैकी एक पुस्तक देतो :) -(गोंधळलेला) ऋषिकेश