जे न देखे रवी...

श्रावण

Primary tabs

काळ्याशार पाटीवर
पांढरी शुभ्र रेघ
ग्रीष्माच्या पाठीवर
काळे काळे मेघ
खरपुस ताबुंस मातीवर
हिरवी चंद्रकळा
प्राजक्ताच्या झाडाखाली
मोतीयाचा सडा

सुखावली धरती
सुखावली मने
इवल्या इवल्या रोपानी
डुलती हिरवी राने

चिंब झाले मन
रुंजी घालतो साजण
उभा भाऊ दारी म्हणे
आला पंचमीचा सण

मन पाखरू पाखरू
पोचले आईच्या पायाशी
डोळ्यात श्रावण भरून
उभा साजण दाराशी

२९-७-२०२२

चित्रगुप्त

खूपच सुघड, अर्थगर्भ कवन.
एक समजले नाही:

उभा भाऊ दारी म्हणे

आणि

उभा साजण दाराशी...

हे दोन्ही एकदमच, म्हणजे एका दारात भाऊ आणि दुसर्‍यात साजण, असे म्हणायचे किंवा कसे ? किंवा आमच्या बालबुद्धीला उमगलेले नाही असे ?

उभा भाऊ दारी म्हणे

आणि

उभा साजण दाराशी...

चित्रगुप्त जी धन्यवाद.

तीचा भाऊ तीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलाय.ती मनाने केव्हाच आईकडे पोहोचली असून, तीला भावाबरोबर जाताना पाहून पाणावलेल्या डोळ्यानी तीचा साजण दाराशी उभा आहे. जणू म्हणतोय लवकर ये मले तुझ्याविना करमणार नाही.

आसे दृश्य आहे.

" चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा,
न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा "
शांताबाई शेळके

श्रीगणेशा

मन पाखरू पाखरू
पोचले आईच्या पायाशी
डोळ्यात श्रावण भरून
उभा साजण दाराशी

खूप छान!

वामन देशमुख

आवडले श्रावण गीत!

---

(बालकवींची क्षमा मागून)

तपस्वी कर्नल लिहितो सुंदर
श्रावण महिन्याचे गीत,
मिपा वरती वाचुनिया
मग हर्ष माइना हृदयात!