सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे ! त्रास होत असला तरी देखील इथे मिपावर येऊन डोळे किलकिले करुन अधुन मधुन येऊन एखादा प्रतिसाद देऊन मग परत विश्रांती घेत होतो. आज जरा डोळ्याची सूज कमी झाली आणि मघाशी मुविंचा प्रतिसाद वाचला त्यांनी माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना फाॅरेस्ट गम्पचा उल्लेख केला आहे.कराचीवुड मधील खानावळीतील एक असलेला आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट येणार आहे हे जेव्हा मला समजले होते तेव्हाच फाॅरेस्ट गम्प बद्धल देखील अर्थातच कळले होते,पण तो मी वेळ मिळेल तेव्हा पाहु किंवा आरामात पाहु असा विचार करुन ठेवला होता. मधल्या काळात काही चित्रपट आणि वेब सिरीज देखील पाहिल्या आहेत पण फाॅरेस्ट गम्पचा पाहण्याचा मुहुर्त मुविंच्या प्रतिसादामुळे निघालाच शेवटी !
हा चित्रपट अतिशय सुंदर आहे... ६ अॅकॅडमी / ऑस्कर पुरसकार मिळालेला हा चित्रपट काळजात उतरणारा आणि मनाला भिडणारा असुन हा चित्रपट पाहणे हा एक उत्तम अनुभुती आहे असे म्हणायला हवे.
या चित्रपटातील ३ संवाद मला फार आवडले.खरं तर हे निवडणे देखील कठीण, पण माझ्या मनाला विशेष आवडले म्हणुन ते इथे देत आहे.
"Well, I happen to believe you make your own destiny. You have to do the best with what god gave you."
" Life is a box of chocolates,Forrest. You never know what you're gonna get.'"
"My Mama always said, you got to put the past behind you before you can move on."
या चित्रपटाच्या ट्रेलर मधुनच या चित्रपटा बद्धलची कल्पना येते. मी यावर अधिक काही लिहणार नसुन इतकेच सांगेन बर्याच काळाने मला एक उत्तम अमेरिकन चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Songमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Ghar TirangaInvictus
९०च्या दशकातील साऊथ आफ्रिका, वर्णद्वेषी एपर्थाईड उचकटून नेल्सन मंडेला पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, कृष्णवर्णीय जनता मूठभर गोऱ्यांचा सुड उगवून त्यांना दक्षिण आफ्रिका देशाच्या सार्वजनिक आयुष्यातून हद्दपार करायला उतावीळ झाली आहे, रँडचे दर पडतच जातायत, गुन्हेगारी दर वाढतच जातायत, अश्यात, नव-निर्वाचित प्रेसिडेंट मंडेला आपली पूर्ण स्किल पणाला लावून रग्बी सारखा खेळ अख्खा देश एकत्र बांधायला वापरण्यास सुरुवात करतात. रग्बी टीम ही typical गोऱ्यांची सद्दी मानली गेलेली, नवनिर्वाचित कृष्णवर्णीय बहुसंख्य असलेली राष्ट्रीय क्रीडा कार्यकारणी दक्षिण आफ्रिकन रग्बी टीम खालसा करण्यावर उतावीळ, अन् त्याचा ठराव घेणाऱ्या सभेत मंडेलाचे आगमन "This is not the time for retribution but cooperation, you have chosen me your leader now let me lead you" असा काहीसा अंगावर काटा डायलॉग आहे त्या प्रसंगी, असेच शंकासुर गोऱ्यांच्या मनात, ते दूर करण्याची मंडेलाची धडपड. त्या रग्बी टीमचा कप्तान अन् त्याची लीडरशिप, सगळेच प्रेक्षणीय. प्रेसिडेंट नेल्सन मंडेला - Morgan Freeman रग्बी टीम कॅप्टन फ्रांस्वा पिना - Matt Damonमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I Love My India :- Pardesमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “No one is more hated than he who speaks the truth.” :- Platoमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh