Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

म
मदनबाण
Sat, 07/30/2022 - 21:33
💬 77 प्रतिसाद
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे ! त्रास होत असला तरी देखील इथे मिपावर येऊन डोळे किलकिले करुन अधुन मधुन येऊन एखादा प्रतिसाद देऊन मग परत विश्रांती घेत होतो. आज जरा डोळ्याची सूज कमी झाली आणि मघाशी मुविंचा प्रतिसाद वाचला त्यांनी माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना फाॅरेस्ट गम्पचा उल्लेख केला आहे.कराचीवुड मधील खानावळीतील एक असलेला आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट येणार आहे हे जेव्हा मला समजले होते तेव्हाच फाॅरेस्ट गम्प बद्धल देखील अर्थातच कळले होते,पण तो मी वेळ मिळेल तेव्हा पाहु किंवा आरामात पाहु असा विचार करुन ठेवला होता. मधल्या काळात काही चित्रपट आणि वेब सिरीज देखील पाहिल्या आहेत पण फाॅरेस्ट गम्पचा पाहण्याचा मुहुर्त मुविंच्या प्रतिसादामुळे निघालाच शेवटी ! हा चित्रपट अतिशय सुंदर आहे... ६ अ‍ॅकॅडमी / ऑस्कर पुरसकार मिळालेला हा चित्रपट काळजात उतरणारा आणि मनाला भिडणारा असुन हा चित्रपट पाहणे हा एक उत्तम अनुभुती आहे असे म्हणायला हवे. या चित्रपटातील ३ संवाद मला फार आवडले.खरं तर हे निवडणे देखील कठीण, पण माझ्या मनाला विशेष आवडले म्हणुन ते इथे देत आहे. "Well, I happen to believe you make your own destiny. You have to do the best with what god gave you." " Life is a box of chocolates,Forrest. You never know what you're gonna get.'" "My Mama always said, you got to put the past behind you before you can move on." या चित्रपटाच्या ट्रेलर मधुनच या चित्रपटा बद्धलची कल्पना येते. मी यावर अधिक काही लिहणार नसुन इतकेच सांगेन बर्‍याच काळाने मला एक उत्तम अमेरिकन चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले आहे. :)

प्रतिक्रिया द्या
23559 वाचन

💬 प्रतिसाद (77)
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/15/2022 - 04:47 नवीन
जॉगर्स पार्क हा हिंदी चित्रपट प्राईम वर पाहिला हलकाफुलका सहकुटुंब बघण्याजोगा एक निवृत्त न्यायाधीश एका तरुणीच्या प्रेमात पडतात त्याची मजेशीर गोष्ट व्हिक्टर बॅनर्जी ज्येष्ठ अभिनेत्यांची सुरेख भूमिका
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 09/26/2022 - 18:20 नवीन
सध्या अनेक सिरिज वा चित्रपट वर वर चाळतो व काही रोचक वाटले तर मग फास्ट फॉरवर्ड करुन पाहतो. असे असताना ही Vezham ह्या तमिळ चित्रपटाने खिळवुन ठेवले. पहिला अर्धा भाग फास्ट फॉरवर्ड करुन पाहिला पण उत्तरार्ध जबरदस्त आहे. तमिळ चित्रपटात चक्क मोहन आगाशे पण काही सेकंदांपुरते आहेत. तसेच काल दगडी चाळ २ ही पाहिला. अंकुश चौधरी कुठल्याही अँगलने अ‍ॅक्शन स्टार वाटत नाही. पळताना तर पुढे खड्डा आहे अथवा पाणी सांडले आहे आणि पळलो तर घसरुन पडु कि काय अश्याच मनोवस्थेत पळतो. चित्रपटात साऊथ दणादण चित्रपटात हाणामारी च्या प्रसंगत संस्कृत श्लोक वापरतात ना ( संदर्भ बाहुबली) तश्या प्ध्दतीचे श्लोक ऐकु येतात पण ते ही काही प्रभावी वाटत नाही. एकुण चित्रपत फारसा प्रभावी नाही आहे. extraordinary attorney woo ही लॉ-कोरियन -ड्रामा अशीच फास्ट फॉरवर्ड करत व १.५X वेगाने बघितली. ऑटिझम असलेली वु ही लॉयर हे ह्या सिरिज चे मध्यवर्ती पात्र आहे. एकुण सिरिज पाहण्यासारखी झाली आहे. आजकाल ऑटिझम पात्र असलेले बर्याच सिरिज पाहण्यात आल्या. गुड डॉक्टर. मॉन्क ह्या सिरिज त्यापैकी काही पाहण्यासारख्या. तसेच कायद्यावर आधारीत ही बर्याच सिरिज आहेत.
  • Log in or register to post comments
D
diggi12 गुरुवार, 09/29/2022 - 15:12 नवीन
Flowers of war मस्त आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/29/2022 - 15:56 नवीन
अ‍ॅमॅझॉन प्राईमवर पाहिला... केवळ अप्रतिम ! सध्य काळात थेटर मध्ये जाऊन पहावा असा उत्तम मराठी चित्रपट कोणता ? असे कोणी मला विचारले तर त्याचे उत्तर म्हणजे हा चित्रपट. [ मला संधी आणि वेळ मिळाला तर मी परत हा चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघेन हे नक्की ! ] चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत [ गुरु ठाकुर चे शब्द आणि अजय-अतुलचे संगीत आणि तितकेच उत्तम सर्व गायक ] पण बाई गं... पार काळाजाच्या आत गेल आहे ! एक उत्तम मराठी चित्रपट बर्‍याच काळाने पाहिल्याचे प्रचंड समाधान मला मिळाले आहे, या चित्रपटासाठी कष्ट घेणार्‍या सर्वांना _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 09/29/2022 - 22:58 नवीन
अगदी खरे !! मी ही कादंबरी कही वर्षांपुर्वी वाचली होती. त्यामुळे कथानक माहीत होते. परंतु गाणी अगदी खास आहेत. कथानकाला अगदी अनुरुप. बाई गं गाण्यावर घेतलेली मेहेनत अगदी स्पष्ट दिसते. गीतकार, संगीतकार, गायिका, नृत्य दिग्दर्शक आणी नृत्यांगना या सगळ्यांची एकत्रीत मेहेनत पाहता हे गाणे मैलाचा दगड आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 09/30/2022 - 08:43 नवीन
बाई गं गाण्यावर घेतलेली मेहेनत अगदी स्पष्ट दिसते. गीतकार, संगीतकार, गायिका, नृत्य दिग्दर्शक आणी नृत्यांगना या सगळ्यांची एकत्रीत मेहेनत पाहता हे गाणे मैलाचा दगड आहे हे नक्की. जाता जाता :- ओरिजीनल Vikram Vedha आता हिंदीत डब केलेला पुर्णपणे चकटफु उपलब्ध आहे ! :) ऑफिशीअली ऑन एमएक्स प्लेअर. :) तुमच्यासाठी लिंक :- https://www.mxplayer.in/movie/watch-vikram-vedha-hindi-dubbed-movie-online-3019dcb5345073d3e2fb1104adedc356 ओरिजीनल मुव्ही देखो, जिहादी कॉपिवूड बॉयकॉट करना जरुरी है भाई ! जय भवानी जय शिवाजी ! :) तैमुरच्या अब्बाच्या बैलाला ढोल ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
म
मदनबाण गुरुवार, 09/29/2022 - 18:56 नवीन
हिंदुत्व चॅप्टर वन :- मैं हुं हिंदु चा ट्रेलर पाहण्यात आला आहे. जाता जाता :- कल जिहादी सोच रखनेवाले तैमुर के आब्बा का मुव्ही आ रहा है ना ? आप तो जाओगे ही ना ?

कल आना मत भूलना। #VikramVedha pic.twitter.com/oXkROVFiIA

— Kreately.in (@KreatelyMedia) September 29, 2022

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/29/2022 - 18:58 नवीन
हिंदुत्व चॅप्टर वन :- मैं हुं हिंदु चा ट्रेलर पाहण्यात आला आहे. हे हिंदुत्व चॅप्टर वन :- में हिंदु हुं असे वाचावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टिनटिन Fri, 09/30/2022 - 08:56 नवीन
सध्या बऱ्याच ऍनिमेशन सिरीज/ चित्रपट बघतोय १. the summit of gods (नेटफ्लिक्स ) - हाबु जोजी या fictional गिर्यारोहकांच्या जीवनावर आधारित ऍनिमेशन आहे . फुकूमाची नावाचा वार्ताहर त्याच्या शोधात असतो. हाबुचा जीवनप्रवास , एकटेच गिर्यारोहण करायची वृत्ती , george मॉलोरी चा मिळालेला कॅमेरा आणि त्याचा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न याची कथा आहे. चित्रपट बघताना एक प्रकारचा मेडिटेशन फील येतो २. The Liberators (नेटफ्लिक्स ) - बॅण्ड ऑफ ब्रदर्स सारखी आहे. फेलिक्स स्पार्क्स ह्या आर्मी ऑफिसरच्या अनुभवांवर आहे ३. बॅटमॅन (Hush ) Prime - ज्यांना जुने कार्टून नेटवर्कवाले बॅटमॅन आवडते त्यांना हा ऍनिमेशनपट आवडेल ४. साऊथ पार्कचे रिविजन चालूच असते पण सगळ्यांना नाही आवडणार . फारच satarical वाटते कधी कधी. काही रिऍलिटी सिरीजचा पण नाद लागला आहे . १. बिग टिम्बर (नेटफ्लिक्स ) - कॅनडामध्ये टिम्बर मिल चालवणाऱ्या कुटुंबाची थिम आहे. निसर्ग बघायला खूप छान वाटते. वेगवेगळी अवाढव्य यंत्रे , त्यांचे प्रॉब्लेम्स , या क्षेत्रातील धोके यांचे चांगले चित्रण आहे २. Below Deck (नेटफ्लिक्स ) - luxury yacht वर काम करणाऱ्या टीमचे चित्रण आहे . त्यांचे पाहुणे आणि त्यांचे नखरे , आपापसातील रोमान्स असा सगळा मसाला आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/30/2022 - 10:19 नवीन
हा सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम सुंदर असतो. मी अधून मधून पाहतो परवा डॉ. सिसिलिया कारवालो यांची मुलाखत पाहिली. त्या अतिशय सुंदर मराठी बोलतात. लक्षपूर्वक ऐकल्यावर हे दिसले की त्यांनी बोलताना एकही इंग्लिश शब्द (गरज नसताना) वापरला नव्हता.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 10/03/2022 - 17:11 नवीन
छान धागा . अनेक नवीन चित्रपटांची माहिती मिळाली . काही या आधी माहित असलेल्या चित्रपटांची नव्याने ओळख झाली . काही गाजलेल्या चित्रपटांची माहिती लिहिलेल्या धाग्यांची लिंक खाली देत आहे . ( जाहिरात ) . http://www.misalpav.com/node/46978 http://www.misalpav.com/node/49670 http://www.misalpav.com/node/46533 http://www.misalpav.com/node/42653 http://www.misalpav.com/node/40694 http://www.misalpav.com/node/39435 http://www.misalpav.com/node/36903
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 10/03/2022 - 17:25 नवीन
सध्या यु ट्युबवर "दिल के करीब" या कार्यक्रमात सुलेखा तळवळकर यांनी अनेक नामवंत कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत . हे सर्व भाग लोकप्रिय आहेत . https://www.youtube.com/watch?v=gPeq_vUabMY https://www.youtube.com/watch?v=6YGvONb8PjE
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 10/21/2022 - 18:34 नवीन
हल्लीच क्रिमिनल जस्टिस: अधूरा सच सीजन 3 पाहुन पूर्ण केली. माझे फ्वेरेट माधव मिश्रा उर्फ पंकज त्रिपाठी यात असल्याने उत्तम अभिनय असलेले कथानक पाहिला मिळेल याची खात्री होती, ती अर्थातच पूर्ण झाली ! मकडी चित्रपटातुन झळकलेली आणि त्या चित्रपटासाठीच सर्वोत्कृष्ट बाल कलाकार हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली श्वेता बसु प्रसाद हिला या वेब सिरीज मध्ये पाहिले तेव्हा ओळखलेच नाही ! तीने ठिक-ठाक अभिनय केला आहे. [ ही काही वर्षांपुर्वी सेक्स रॅकेट मध्ये अडकली होती ? आणि बहुतेक हैद्राबाद मधील बंजारा हिल्स या हाय प्रॉफाईल भागातुन तिला एका मोठ्या व्यवसायिकाच्या बरोबर नको त्या स्थितीत पकडले गेले होते असे मला आठवते. ती या सर्वातुन बाहेर आलेली दिसतेय ते एका प्रकार उत्तम म्हणावे ! ] सध्या कांतारा ची हवा आणि चर्चा सगळीकडे आहे, हा पाहण्याची माझी इच्छा आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 10/30/2022 - 04:02 नवीन
सुमारे चार वर्षांनी रंगमंदिरात जाऊन नाटक पाहिले. खरं खरं सांग..’! फ्रेंच नाटककार फ्लॉरियन झेलरच्या "the truth’वर आधारित नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नाटक. हलकेफुलके धमाल मनोरंजन. विवाहबाह्य प्रेम प्रकरण हा नेहमीचा विषय छान फुलवला आहे. आनंद इंगळे यांच्या बहुरंगी अभिनयावर नाटक पेललेले आहे. अन्य कलाकार: रुजुता देशमुख, सुलेखा तळवलकर आणि राहुल मेहंदळे. नाटक संपल्यानंतर चारही कलाकार उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन करतात तसेच ते त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही करतात. "
नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास
जरूर सांगा", असे आवाहन इंगळे यांनी केले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 10/30/2022 - 05:03 नवीन
व्हायकिंग्स नुकतीच पाहून झाली आता द एक्स्पान्स सुरू केलीय.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 12/11/2022 - 14:29 नवीन
"रघुपती राघव राजाराम " हे नाटक इथे पाहिले. छान, आवडलेच.. त्या नावाचा भजनाशी काही संबंध नाही ! नाटकातल्या तीन भावांची नावे आहेत ती .
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 12/11/2022 - 15:55 नवीन
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.
आणि लेखाचे नाव, शिर्षक काय आहे?

सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

हा विरोधाभास आहे. जोक्स अपार्ट, आयुर्वेदीक औषधे सांगु का? हाच रीप्लाय व्यनि करतो.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 12/11/2022 - 16:11 नवीन
जर पिक्चरमधला हीरोच असा यडा (अ‍ॅक्चुली खुप घाण शब्द लिहायचा होता) असेल तर स्वःतला हीरो समजणारा प्रत्येकजण असाच यडा बनेल. ह्यांच्याकडुन काय प्रेरणा घ्यायची? हे पुरूष आतली कडी लावतात व बोलतात मी नाही त्यातला! ह्या पिक्चरवरुन निघालेला अमिर(?)च्या भावाचे विचार युट्युब वर माहीती करा, तुम्हाला त्या हीरोला %%&&&&**** अस काहीतरी बोलावस वाटेल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/24/2022 - 16:30 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/24/2022 - 16:31 नवीन
सुंदर. प्रेरणादायी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 02/04/2023 - 12:15 नवीन
लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नृत्य आणि शेती यांत कार्यरत चतुरस्त्र !
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 02/04/2023 - 13:36 नवीन
गेल्या रविवारी परेश मोकाशी यांचा मराठी चित्रपट 'वाळवी' पाहिला आणि अपेक्षेप्रमाणे धमाल होता, फक्त २ तासाचा आहे WFM आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 02/12/2023 - 05:57 नवीन
हलकं फुलकं, नवे चेहरे. एकंदरीत मला आवडले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 02/12/2023 - 06:00 नवीन
दत्तक मूल या विषयाची सुरेख हाताळणी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 02/12/2023 - 06:01 नवीन
https://www.youtube.com/watch?v=nLqF-JfNKzE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
च
चौकस२१२ Mon, 02/13/2023 - 00:53 नवीन
नेटफ्लिक्स वर " वध ", संजय मिश्रा आणि नीना गुप्ता ... "आंखो देखी" मधला परस्थितीने वैतागलेला मध्यमवर्गीय बाप किंवा मिर्झापूर मधील गावातील सरळ आयुष्य जगणारा वकील पांडे ... यांची आठवण झाली .. नीना गुप्ता यानं त्यांच्या वयाला आणि आवाज / देहयष्टी ला शोभनार्या अशा छान भूमिका मिळत आहेत , पंचायत मधील मंजुदेवी , किंवा "बधाई हो" मधील आई ...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/02/2023 - 07:36 नवीन
2019 चा डोंबिवली रिटर्न (प्रमुख भूमिका संदीप कुलकर्णी) हा पाहिला. पूर्वार्ध ठीक आहे; उत्तरार्ध भरकटलेला. मुळात पूर्वीच्या डोंबिवली फास्टशी याचा काही संबंध नाही. पूर्ण वेगळ्या धर्तीवरची कथा आहे. एक पापभीरु मध्यमवर्गीय, भाई- दादा आणि राजकारणी यांच्या नादी लागून भराभर श्रीमंत होत जातो आणि अखेरीस त्याचे पूर्ण पतन होते हा सारांश. हॉटस्टारवर आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा