Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्रपट समीक्षण - एकदा काय झालं...

श
श्रीगणेशा
Sat, 08/13/2022 - 19:49
---- "एकदा काय झालं..." ही एक गोष्टींची गोष्ट -- https://youtu.be/WTxGpSs5UaY ---- ही कथा म्हणजे वडील-मुलाच्या नात्यावर खूप वेगळं, नवीन काहीतरी असावं, अशी अपेक्षा ट्रेलर मधून निर्माण होते. गोष्टींतून जगणं शिकणारा, शिकविणारा बाप, आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या सर्वस्वी अवलंबून असणारा मुलगा, गोष्टींतून चालणारं शाळेतलं शिक्षण, सर्व काही उत्सुकता ताणणारं! तशी कथा थोडी अनपेक्षित वळण घेते मध्यावर, पण एवढीही नवीन वाटत नाही. कथेची मांडणी अजून प्रभावीपणे करता आली असती, अशी हुरहूर राहते मनात! सर्वच पात्रांच्या चांगल्या अभिनयामुळे कथेच्या आणि मांडणीतल्या उणीवा झाकल्या जातात, थोड्यातरी! सिनेमॅटोग्राफी चांगली आहे पण ती आता एक सामान्य अपेक्षा झाली आहे. गाण्यातून सादर केलेल्या एक दोन कथाही चांगल्या जमल्या आहेत, तो एक नवीन प्रयोगही म्हणता येईल इतक्या! चित्रपटाचा शेवट आपल्याला गुंतवून ठेवतो, भावनिक करतो खरा, पण तिथपर्यंतचा प्रवास त्या शेवटाला साजेसा करता आला असता. थोडक्यात -- खूप अपेक्षा न ठेवता, जे चांगलं ते वेचावं, असं म्हणून चित्रपट एकदा तरी पाहायला हरकत नाही. आणि चांगलं, वेचून घेण्यासारखं असं बरंच काही आहे तिथे. ---- शेवटी -- चित्रपटातील गाणी, शब्दांची उधळण, श्रवणीय, कथेला साजेशी! "भीमरूपी महारुद्रा..." मारुती स्तोत्रात जोडलेले नवीन शब्द, त्यात एकरूप होऊन मनाला प्रसन्न करतात. https://youtu.be/teOk8Hk_AmU "रे क्षणा, थांब ना..." या गाण्यातील अंतरा तर मनाला स्पर्शून जातो -- "ही वादळे हृदयातली, देतो तुला, घेशील ना..." https://youtu.be/_86Awmd7hz8 ----

प्रतिक्रिया द्या
1292 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा