Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अलक १५ ऑगस्ट

म
मालविका
Mon, 08/15/2022 - 13:25
💬 12 प्रतिसाद
अलक १ नेहमी सिग्नल वर सिझनप्रमाणे काही ना काही विकणारा १०/१२ वर्षाचा तो मुलगा. कधी पुस्तक, कधी फुगे तर कधी फुलं. १५ ऑगस्ट जवळ आला तशी १० तारखेपासून झेंडे विकायला लागला. कधी नव्हे ते यावेळी जास्तच झेंडे विकले जात होते.इतके की त्याला दोनदा नवीन गठ्ठा विकत घ्यावा लागला. बरेच जण त्याच्याकडून घेवून गाड्यांवर झेंडे लावत होते. यावेळी लोकं एवढे का खरेदी करत आहे समजत नव्हतं. न राहवून त्याने सिग्नल वरच्या टपरी वाल्याला विचारलं तेव्हा ' हर घर तिरंगा ' बद्दल समजलं. २ दिवस झाले आपण झेंडे विकतोय पण आपल्या घरावर आपण झेंडाच नाही लावला ही जाणीव झाली आणि तडक तो पुलाखालच्या आपल्या पत्र्याच्या घरात आला. वर चढून एका काठीच्या साहाय्याने त्याच्याकडे असलेला झेंडा त्याने दिमाखात फडकवला. त्याच्या नजरेत समाधान तरळल. आजूबाजूच्या पोरांनी ते बघून टाळ्या वाजवल्या. खुश झालेला तो प्रसन्न मनाने परत आपल्या कामाला चालू पडला. अलक २ ' हर घर तिरंगा ' अभियान सुरू झालं तश्या घरात चर्चा सुरू झाल्या. झेंडा कुठून आणायचा, कुठे लावायचा, किती मोठा आणायचा आणि बरंच काही. आजोबा कान देऊन सगळं ऐकत होते. सगळ्यांचं ऐकून घेवून शेवटी ते उठले. त्यांनी जपून ठेवलेली जुनी ट्रंक उघडली. त्यात असलेला खादीचा जरा पिवळट पडलेला राष्ट्रध्वज त्यांनी मुलांच्या हातात दिला. नातवंडांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्यांना दिसले. त्यांनी सांगितलं, " माझ्या वडिलांच्या वेळचा झेंडा आहे हा. अजून पर्यंत जपून ठेवला कदाचित याच दिवसासाठी." स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या पणजोबांच्या वेळचा ध्वज हाती आल्यावर अभिमानाने सर्वांचेच डोळे पाणावले. - धनश्रीनिवास

प्रतिक्रिया द्या
3497 वाचन

💬 प्रतिसाद (12)
य
यश राज Mon, 08/15/2022 - 15:07 नवीन
दोन्ही आवडल्या
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 08/15/2022 - 15:19 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 08/15/2022 - 15:25 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 08/15/2022 - 16:48 नवीन
खूप छान.
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Mon, 08/15/2022 - 17:14 नवीन
मस्त लिहीलं आहे.
  • Log in or register to post comments
स
सुजित जाधव Mon, 08/15/2022 - 18:17 नवीन
आवडले....
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 08/15/2022 - 19:24 नवीन
दोन्ही आवडल्या
  • Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर Tue, 08/16/2022 - 03:44 नवीन
दोन्ही कथा छान आहेत!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 08/16/2022 - 08:31 नवीन
छान आहेत दोन्ही गोष्टी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 08/16/2022 - 10:54 नवीन
दोन्ही मस्त. गल्लीत पतंग ( दिल्लीत १५ ऑगस्ट रक्षाबंधन लोक पतंग उडवितात)विकणारा झेंडे ही विकत होता. मला म्हणाला, मोदीजी आमच्या सारख्यांचीही चिंता करतात. दोन ते तीन हजार रुपये त्याने तीन दिवसात कमविले असतील.
  • Log in or register to post comments
प
पर्णिका Wed, 08/17/2022 - 00:59 नवीन
अलक २ फार आवडली. लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
ए
एकनाथ जाधव Wed, 08/24/2022 - 15:21 नवीन
दोनिहि अलक आवडल्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा