Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निवडणूक नियम ४९-०

म
माझी दुनिया
Fri, 12/12/2008 - 12:33
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2108 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ल
लिखाळ Fri, 12/12/2008 - 12:56 नवीन
यावर मिपावर आधीसुद्धा चर्चा झालेली दिसते. तसेच ४९-० असे काही सध्या अस्थित्वात नाही असा ही सूर दिसतो. ते असो. या सर्व चर्चांत एक मह्त्वाचा भाग दिसतो तो म्हणजे 'मतदानाला जाऊन मत कुणालाच न देणे'. आपले मत दोन शिक्के मारुन वाया घालवणे हा त्यावर काढलेला उपाय. सर्व राजकारणी वाईट म्हणून तुम्ही मत देणार नाही. मग मतदान केंद्रात जाऊन मत वाया घालवणे आणि मतदानाला न जाणे यात अंतर ते काय? दोन्ही एकच. या उलट अमुक अमुक उमेदवार लायक नाही म्हणून मी तो उमेदवार नको असे मत नोंदवले तर ते योग्य मतदान ठरेल. आणि ४९-० या धर्तीवर आहे अशी अपेक्षा दिसते. ४९-० अस्तित्वातच नाही असे गृहीत धरता - मतदानाला जाणे आणि त्यातल्यात्यात बर्‍या उमेदवाराला मत देणे हाच ठीक पर्याय वाटतो. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 12/12/2008 - 13:30 नवीन
मतदानाला जाणे आणि त्यातल्यात्यात बर्‍या उमेदवाराला मत देणे हाच ठीक पर्याय वाटतो. सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
क
केदार Fri, 12/12/2008 - 16:14 नवीन
अहो मी इथेच लिहीले आहे की ही नुसती भंकस आहे. ४९-० घटनेतले कलम नाही. (त्या वाहिदांचा पानावर) आणि कूठलाही उमेदवार मान्य नाही म्हणून मत वाय घालविने पळपुटे पणाचे लक्षन आहे. जर हिम्मत असेल तर स्वत: राजकारणात पडावे व निवडनूकीला उभे राहावे.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 02/01/2009 - 02:02 नवीन
आज म.टा. मधे खालील बातमी वाचनात आली आणि या धाग्याची परत एकदा आठवण झाली. एका वाक्यात सांगायचे तर जेंव्हा "राजकारण विरुद्ध जनता" असा लढा चालू होतो/होऊ शकतो तेंव्हा तमाम राजकारणी, एकदम सर्व "वैचारीक" मतभेद बाजूस ठेवून जनतेच्या विरोधात जाऊ शकतात... राजकीय पक्षांनाच नको मतदारांचा 'नकाराधिकार' (संपूर्ण बातमी या दुव्यावर. खाली फक्त मुद्याची गोष्ट ;) )
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सवर 'कोणीही नाही' असा पर्याय देण्यास राजकीय पक्षांचाच सर्वाधिक विरोध असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी राजकीय आणि निवडणूकविषयक सुधारणांची चर्चा करण्यासाठी आयोजित एका परिसंवादात सांगितले. .... सद्यस्थितीत नकाराधिकार वापरणाऱ्या मतदाराची गोपनियता राखणे कठीण आहे. पूवीर् मतपत्रिका असताना मतदाराचे नाव गुप्त राहात होते. आता तसे होत नाही. एकूण मतसंख्या नोंदविण्यासाठी नकाराधिकार वापरणाऱ्या मतदाराला रजिस्टरमध्ये सही करावी लागते. त्यामुळेच मतदानयंत्रावर नकाराधिकाराचे बटन ठेवावे, अशी सूचना आयोगाने केली आहे. 'वरीलपैकी कोणी नाही' या पर्यायापेक्षा नकाराधिकाराचे बटन जास्त व्यवहार्य ठरू शकेल, असाही विचार गोपालस्वामी यांनी मांडला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/01/2009 - 03:49 नवीन
राजकीय पक्षांना नकाराधिकार नको आहे. निवडणूक आयोगाने विविध पक्षांशी चर्चा करुन नकाराधिकाराबाबत निर्णय घेऊ असे नुकत्याच 'नकाराधिकाराबाबत'च्या एका प्रकरणात उच्च न्यायालयात सांगितल्याची बातमी नुकतीच वाचनात आली होती. कोणत्या दैनिकात बातमी होती आता काही आठवेना ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा