जे न देखे रवी...
अंतर !
Primary tabs
अंतर !
आज तो परत तेच म्हणाला,
"तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये
बरंच अंतर आहे "
.
.
.
.
.
.
.
" हो , कदाचित ....
समजून घेणे ,
आणि
सहन करणे ,
यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !"
डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल
....एव्हढंच ती उत्तरली !
..................नेहमीसारखंच !
------------फिझा
वाह! एकही प्रतिसाद कसा नाही यावर? छाश आहे आठोळी!
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
ही कविता ,भाव कसे काय सुटले!
मस्तच!
सबकी दासता !
छान आहे
समजून घेणे ,
आणि
सहन करणे ,
यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच
अंतराची व्याख्या पण आवडली
पैजारबुवा,
नेहमीसारखंच .. असचं चालु द्या लिखाण!