Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तमिळनाडूचा ईतिहास भाग - २

अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/01/2022 - 15:43
💬 2 प्रतिसाद
ओस्लोच्या एका दुकानातील “पन्नास टक्के सवलतीत” विभागात मला एक पुस्तक दिसले. त्या पुस्तकाच्या आवरनावर एक विशाल हत्ती होता, त्याच्या डोक्यावर जाळीदार कवच आणी पाठीवर मशाली बांधल्या होत्या. ही वयोवृध्द थ्रिलर लेखक विल्बर स्मिथ ह्यांची “घोस्ट फायर” कादंबरी होती. त्यातील गोष्ट त्या काळखंडापासून आणी त्या जागेवरून सुरू होते जिथून मी ही ईतिहासकथा सुरू करतोय. आॅगस्ट १६३९ च्या एका दुपारी दोन ईंग्रज अधिकारी पुलीकट च्या दक्षीणेला समुद्राकाठच्या एका ओसाड जमीनीचे निरीक्षण करत होते. “काय वाटतं?” आपल्या कारखान्याला हा जागा ठीक राहील?” फ्रांसील डे बोलला. “आता विचारतोय? मी वेंकटाद्रीशी बोलणं फायनल करून आलोय” ऐंड्र्यू बोलला. “बर्याचदा आपण आपल्या निर्णयावर तेव्हाच शंका घेतो जेव्हा निर्णय घेतला गेलेला असतो.” “तू चंद्रगीरीच्या महाराज वेंकटराय चं वैभव पाहीलं आहेस का? काय अलिशान महाल! हत्ती, घोडे, नर्तक्या…” “आपल्याला त्याच्याशी काय? मी तर ही जागा स्वस्त कपडे बनवण्याकरता निवडलीय, २० टक्क्यांपर्यंत नफा होईल” “तुला काय वाटतंय महाराज ही जागा अशीच देताहेत?” “तो महाराज आता संपत चाललाय, त्याला आपल्या सैन्याची नी शस्त्रांची गरज आहे.” “त्याची चिंता सोड, पुलीकटात डचांनी शिरकाव केलाय, कंपनीला सांगावं लागेल की ह्या हरामींना पाय पसरू देऊ नका, त्यांच्या बाजूचीच जमीन घेऊन तू योग्य निर्णय घेतला आहेस.” “हो आपण ईथेच आपला भव्य किल्ला बनवू, महाराज आणी डचांच्या किल्ल्यापेक्षाही मोठा आणी आधूनीक. ईथे नदी किनारी आणी समूद्राकिनारी प्लाॅट कापून युरोपीय वस्ती वसवू.” “हा विचार चांगलाय, हे काळे लोक शहरापासून दूरच हवेत, फारच असंस्कृत लोक आहेत.” “ते वेंकटाद्री पाहील, मी कळवलंय त्याला कोळ्यांचं गाव रिकामं करायला.” “ते ठिकाय. पण त्या कोळ्यांत तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का?” “काय?” “ते दिसायला दुबळे असले तरी त्यांच्यात ताकद आफ्रीकी लोकांसारखी आहे” “तूला काय म्हणायचंय? ह्यांना पकडून विकायचं?” “मी तर फक्त विचार करतोय, पैसे मिळाले तर काय वाईट? तसंही कंपनी देतेच किती? थोडं फार आपणही कमवायला नको का?” “हो हो! हे पण बरोबर आहे, कमवायला ईथे भरपूर आहे आणी कंपनीला कळनारही नाही. म्हणून तर ईतक्या ऊष्ण वातावरणात ह्या काळ्या लोकांत घाम गाळतोय. पण नाव काय ठेवायचं शहराचं?” “तू सांगत होतास ना कुठलंतरी गाव आहे कोळ्यांचं?” “मदर…” “हो, हे काय लिहीलंय ना कागदात. मद्रासा..पट्टनमा..” “एखादं सोपं नाव? मैड्रास ठीक राहील.” लिही - M..A..D..R..A..S (क्रमशः) मूळ लेखक :- प्रविण झा.

प्रतिक्रिया द्या
1429 वाचन

💬 प्रतिसाद (2)
क
कपिलमुनी गुरुवार, 09/01/2022 - 20:43 नवीन
सगळे धागे जोडत रहा.. म्हणजे नवीन धाग्यात जुन्याची लिंक देत रहा.. बाकी लेख थोडे मोठे हवे होते.. अगदीच शॉर्ट आहेत.. पुलेशू
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/12/2022 - 14:25 नवीन
रोचक आहे ... त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना येतेय. इंग्रज, डच, पोर्तुगिज व्यापार्‍यांनी असंच व्यापारी आक्रमणं करायला सुरुवात केली अन एक दिवस भुमीच गिळंकृत करून बसले !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा